दमयंती स्वयंवर - पृष्ठ २०

रघुनाथ पंडित यांच्या काव्यात इतके माधुर्य व इतका रस आहे की, ते आरंभापासून शेवटापर्यंत वाचल्यावाचून मनाची तृप्ति होत नाही व एकदा वाचले म्हणजे पुनः वाचावेसे वाटते.


वोव्या

इंद्र त्रैलोक्यनायक । तोही जालासे याचक ।

दाक्षिण्याने भूपालक । त्याच्या वाक्ये गुंतला ॥१९०॥

'बरे' म्हणोनि उत्तरे । रथावरोनि उतरे ।

तया राजपुरी भरे । शोभा तेथील पाहे ॥१९१॥

वसंततिलका

तो जाहला नृपवर स्थिर दूतभावि । मानीचना युवतिच्या विरहास भावी ॥

कुंभोद्भवे तरि महोदधिपान केले । दुर्वारवाडवशिखेस न मानिजेले ॥१९२॥

प्राणांपरीच ह्रदयी नगरांतरी तो । गुप्तस्वरूप नळभूप तदा धरीतो ॥

बंकी रिघे तव तया दिसताति बंके । पंकेरुहाक्ष न दिसेच तयांस, शंके ॥१९३॥

वोवी

तया राजसौधांतरी । शोभा पाहे परोपरी ॥

कोठे आहे ते सुंदरी । धुंडावया लागला ॥१९४॥

वसंततिलका

स्तंभी हिरे झळकती जडितांग केले । ते की अतैलक नवेच दिवे उदेले ॥

होती तमे मरकतात्मक भित्तिसंगी । जाले तयास हरिते सततप्रसंगी ॥१९५॥

मालिनी

अभिनव कुरुविंदे रंजल्या अंजलीशी- ।

सहित कनककन्या स्तंभल्या स्तंभदेशी ॥

नरपतिस कराया काय नीराजनाते ।

निरखिति पथ ऐसा भाव देती जनाते ॥१९६॥

वसंततिलका

आलेखिला विशद विस्तृत दुग्ध-सिंधु । शेषावरी पहुडला सुजनैक-बंधु ॥

चोळी पदांस कमला कमलायताक्षी । चोळीस आणिक निरीस हरी निरीक्षी ॥१९७॥

वोव्या

कोण्ही येक दोघी दूती । तेथे अन्योन्य बोलती ॥

"येथे आहे दमयंती । जाई बोलूनि येई" ॥१९८॥

तिजसवे सौधांतरी । राजा जाय अन्तःपुरी ॥

तेथे देखिली सुंदरी । कामसोमपूर्णिमा ॥१९९॥

सुमनसेजेच्या पलंगी । बैसलीसे ते तन्वंगी ॥

सख्या खेळती तीसंगी । बहु अप्सरा जैशा ॥२००॥

N/A

References : N/A
Last Updated : October 11, 2012

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP