मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|श्रीचित्रापुरगुरुपरंपराचरित्र| अध्याय ॥४८॥ श्रीचित्रापुरगुरुपरंपराचरित्र ग्रंथानुक्रम विषयानुक्रमणिका कृताञ्जलिः प्रस्तावना सारस्वतांचें मूळ श्रीगुरुपरम्परा अध्याय ॥१॥ अध्याय ॥२॥ अध्याय ॥३॥ अध्याय ॥४॥ अध्याय ॥५॥ अध्याय ॥६॥ अध्याय ॥७॥ अध्याय ॥८॥ अध्याय ॥९॥ अध्याय ॥१०॥ अध्याय ॥११॥ अध्याय ॥१२॥ अध्याय ॥१३॥ अध्याय ॥१४॥ अध्याय ॥१५॥ अध्याय ॥१६॥ अध्याय ॥१७॥ अध्याय ॥१८॥ अध्याय ॥१९॥ अध्याय ॥२०॥ अध्याय ॥२१॥ अध्याय ॥२२॥ अध्याय ॥२३॥ अध्याय ॥२४॥ अध्याय ॥२५॥ अध्याय ॥२६॥ अध्याय ॥२७॥ अध्याय ॥२८॥ अध्याय ॥२९॥ अध्याय ॥३०॥ अध्याय ॥३१॥ अध्याय ॥३२॥ अध्याय ॥३३॥ अध्याय ॥३४॥ अध्याय ॥३५॥ अध्याय ॥३६॥ अध्याय ॥३७॥ अध्याय ॥३८॥ अध्याय ॥३९॥ अध्याय ॥४०॥ अध्याय ॥४१॥ अध्याय ॥४२॥ अध्याय ॥४३॥ अध्याय ॥४४॥ अध्याय ॥४५॥ अध्याय ॥४६॥ अध्याय ॥४७॥ अध्याय ॥४८॥ अध्याय ॥४९॥ अध्याय ॥५०॥ अध्याय ॥५१॥ अध्याय ॥५२॥ अध्याय ॥५३॥ अध्याय ॥५४॥ अध्याय ॥५५॥ अध्याय ॥५६॥ अध्याय ॥५७॥ अध्याय ॥५८॥ अध्याय ॥५९॥ अध्याय ॥६०॥ अध्याय ॥६१॥ अध्याय ॥६२॥ अध्याय ॥६३॥ आरती श्री सद्गुरुंची मंगल पद चित्रारपुरगुरुपरम्परावन्दनम् श्रीशंकरनारायणगीतम् शरणाष्टकम् आरती श्रीगुरुपरंपरेची श्रीमत् पांडुरंगाश्रम स्वामींजी आरती सद्गुरुंची आरती चित्रापुरगुरुपरंपरा - अध्याय ॥४८॥ सुबोधाचा भाग तर अमोल आहे. तशीच प्रश्नोत्तरी ही ह्या गुरुचरित्राचें अपूर्व वैशिष्ट्य होय. Tags : chitrapurpothiचित्रापुरगुरुपरंपरापोथी अध्याय ॥४८॥ Translation - भाषांतर ॥ श्रीगणेशाय नमः ॥ श्रीसरस्वत्यै नमः ॥ श्रीमदानंदाश्रमगुरुभ्यो नमः ॥ श्रीभवानीशंकराय नमः ॥ॐ॥ जय जय सद्गुरो दयासागरा । तूंचि सर्व सारस्वतां आसरा । तुजवांचोनि कवणही विचारा । न होय पात्र कदापिही ॥१॥ तूंचि सर्व जगीं एक । सर्व जनांचा रक्षक । ऐसे असतां आम्ही सकळिक । कासया जाऊं अन्य स्थळीं ॥२॥ जेथे असे तुझी प्रीति । तेथें कैंची सांगें भीति । परी देवा नसतां दृढ भक्ति । कैसा प्राप्त होसी तूं ॥३॥ म्हणोनि देईं तुझी भक्ति । त्यावीण नलगे अन्य मजप्रति । हेंचि देवा आतां निश्चितीं । मागणें तुजपाशीं करुणाळा ॥४॥नाहीं मानसीं भक्ति - प्रेम । तेव्हां कैंचा जोडेल राम । परी देवा तुझें नाम । गातां सारें लाभतसे ॥५॥काय तुझ्या नामाची महिमा । नलगे त्यासी कवणही उपमा । वर्णन कराया अज्ञांसि आम्हां । न कळे जाण निश्चयेंसीं ॥६॥ तुझ्या कृपेवीण सर्वथा । न ये स्फूर्ति निश्चयें ग्रंथा । म्हणोनि देवा ये ये आतां । धांवोनि वेगें मम हृदयीं ॥७॥ भावहीन भक्तिहीन । म्हणोनि न टाकीं मजलागोन । तूंचि अव्हेरितां येथून । कोण पावेल मज देवा ॥८॥ जरी नाहींत अंगीं सद्गुण । तरी असती बहुत दुर्गुण । ते कैसेनि जातील तव कृपेवीण । सांगें देवा कृपाघना ॥९॥धरितां देवा तुझी कांस । तूं न टाकिसी आपुला दास । कैसा मज चढे उल्हास । करितां करितां स्तवन तुझें ॥१०॥ मातेच्या मांडीवरी बालक । लडिबाळें जाऊनि बैसतां देख । पाजी पान्हा निश्चयात्मक । प्रेमकटाक्षें पाहूनियां ॥११॥ तैशी तूं मम सद्गुरुमाउली । निजभक्त येतां जवळी । परम प्रीतीनें तयां सांभळी । नाहीं संशय यामाजीं ॥१२॥ असो आतां ऐका सज्जन । तुम्ही श्रोते हो सावधान । मागील अध्यायीं केलें निरूपण । सगुणवर्णन श्रीगुरूंचें ॥१३॥ आतां ऐका आणिक सकल । चरित्र त्यांचें परम प्रेमळ । ऐकतां वृत्ति तल्लीन होईल । काय सांगूं श्रोते हो ॥१४॥ असे ती कथा बहु रसाळ । शांतमूर्ति परम प्रेमळ । सात्त्विक वृत्ति हृदय सरळ । किती वानूं त्यांचें हो ॥१५॥ जरी असे बालक आपण । बुद्धि चतुर अधिकचि जाण । लाजती बघुनी वडील जन । म्हणती धन्य धन्य तयासी ॥१६॥ एकमेकां वदती हैं कैंचें । बुद्धिचातुर्य अमितचि याचें । सद्गुण अंगीं भरले याचे । बालपणींच कैसे हे ॥१७॥ अजुनी दहा वरुषांचे बाळ । किती याचें अंतःकरण कोमल । साक्षात् श्रीधरचि हा वेल्हाळ । मुखकमळ कैसें शोभे पहा ॥१८॥ जी कां साक्षात् विष्णुमूर्ति । धन्य त्यांची जगीं कीर्ति । काय वर्णील हा मंदमति । अज्ञ पामर मी असें ॥१९॥ कार्यावांचून न करी भाषण । न दुखवी कदापि कवणाचें मन । सदा करी देवाचें ध्यान । अंतरापासोनि प्रेमानें ॥२०॥ असो ऐसे लोटले दिन । त्रयोदश वरुषें भरलीं पूर्ण । आतां ऐका सावधान । तुम्ही सज्जन श्रोते हो ॥२१॥ श्रीपांडुरंगाश्रमस्वामी । यांच्या चरित्रीं कथिलें आम्हीं । नवम आश्रम ऐकिला तुम्हीं । सावधचित्तेंकरोनियां ॥२२॥ आणिक सांगावें नलगे विवरण । आनंदाश्रम - नामाभिधान । शिष्यस्वीकार झाल्यापासून । पुढील वृत्त ऐका हो ॥२३॥ गुरूपदेश झालियावरी । सद्गुरु पांडुरंगाश्रम झडकरी । मुक्त झाले म्हणोनि भारी । दुःख झालें तयांना ॥२४॥ गुरुप्रेमाची आली भरती । सदा अंतरीं सद्गुरुमूर्ति । अणुमात्र विषयवासना चित्तीं । नुरली निश्चयें त्यांच्या हो ॥२५॥ अज्ञ बालक असतांही । वैराग्य अंगीं त्यांच्या येई । न सांपडे आप्तांच्या मोहीं । मठींच राहती प्रेमानें ॥२६॥ निज भगिनीची कन्या एक । खेळविली करुनि बहु कौतुक । ती येई 'मामा' म्हणूनि सन्मुख । परी न ढुंकती तिजकडे ॥२७॥ पहा कैसें आपुल्या मनासी । आवरिलें त्यांनीं निजधैर्येंसीं । कवणें कथिलें सांगा त्यांसी । मोह तो दूर साराया ॥२८॥ संन्यासधर्म परम कठिण । तशांत अजुनी बालपण । तरीही पाळिती प्रेमेंकरोन । विधियुक्त न चुकतां ॥२९॥ उपजल्यापासोनि गुरूंचा सहवास । संन्यासधर्म कोणता हें त्यांस । विदित असल्यानें करिती साहस । पाळाया धर्म यथार्थत्वें ॥३०॥ असे जैसा संन्यासधर्म । त्यापरी करिती कडक नेम । परी सद्गुरु पांडुरंगाश्रम - । संग ना म्हणोनि तळमळती ॥३१॥ कीं आतां आमुचे कर्तव्य काय । स्वधर्म रक्षणें हेंचि होय । तरी आतां काय उपाय । करावा कैसा करण्यापरी ॥३२॥ जनासी बोध कराया आपण । आधीं करावें धर्माचे अध्ययन । तेंचि सद्गुरूंच्या मुखेंकरोन । नाहीं घडलें दैववशें ॥३३॥ पहा श्रोते हो साधुजनांची । वृत्ति निरभिमानी असे साची । साक्षात् अवतरे श्रीविष्णूचि । त्यासी काय शिकणें असे ॥३४॥ परी म्हणे आपुल्या मानसीं । उपासना वाढवावी निश्चयेंसीं । धरीतसे गुरुमूर्ति दिननिशीं । हृदयीं आपुल्या प्रेमानें ॥३५॥ ऐका तुम्हीं सावधचित्तें । खरे साधु कैसे असती तें । जीवन्मुक्त जरी असती ते । सद्गुरुप्रेम त्यां अनिवार ॥३६॥ गुरुप्रेमेंचि सकल कार्य । करिती निश्चयें साधुवर्य । गुरुवीण जगीं अन्य विषय । न दिसे त्यांसी अणुमात्र ॥३७॥ सार्या जगामाजीं भरलें । गुरुप्रेम एकचि चांगलें । त्याविण आणिक कांहीं नुरलें । ऐसें गुरुप्रेम अगाध ॥३८॥ म्हणोनि सद्गुरुस्वामींलागीं । दोष द्यावया ठावचि ना जगीं । गुरुप्रेमावीण त्यांच्या अंगीं । नसे कल्पना अन्य पहा ॥३९॥ सद्गुरुसन्मुख अज्ञचि आपण । करुणा भाकिती रात्रंदिन । परी त्यां समजूं नये अज्ञ । कदापिही आम्हीं हो ॥४०॥ श्रीरामें केला वसिष्ठ गुरु । पुसिला प्रेमें त्या आत्मविचारु । सांदीपनीसि श्रीकृष्ण थोरू । गेला शरण सद्भावें ॥४१॥ असो आतां ऐका सावध । आनंदाश्रम स्वामी प्रसिद्ध । ध्याउनी नमिती सद्गुरुपद । म्हणती रक्षीं दयाळा ॥४२॥ मग करोनि विचार मानसीं । तेथील शास्त्री सद्गुणराशी । कायकिणी सुब्राय भटजी यांसी । पाचारिलें प्रेमभरें ॥४३॥ परम आतुर होऊनि म्हणती । विद्याभ्यास सारा मजप्रति । करवावा आतां तूंचि निश्चितीं । अवश्य म्हणती शास्त्री तैं ॥४४॥ संस्कृत व्याकरण तर्कशास्त्र । काव्यआदिकरोनि पवित्र । अभ्यास करावया श्रोत्र । उत्सुक झाले स्वामींचे ॥४५॥ आळस सारा करोनि दूरी । विद्याभ्यास करिती निरंतरीं । असतां तीव्र बुद्धि निर्धारीं । काय त्यांसी कठिण असे ॥४६॥ सकल विद्येमाजीं प्रवीण । होते झाले पहा पूर्ण । श्रीगुरुकृपा असतां पूर्ण । काय अवघड तयांसी ॥४७॥ जरी ना घडलें गुरुमुखें अध्ययन । तरी सद्गुरु न टाकिती कृपाघन । सुब्रायभटजी - मुखीं प्रगटोन । करविला अभ्यास विद्येचा ॥४८॥ येणेंपरी सर्वांमाजीं । निपुण जाहले गुरुकृपें सहजीं । गुरुस्मरणावीण ना दुजी । कल्पना जाणा तयांसी ॥४९॥ येथें संशय येईल श्रोत्यांसी । कीं श्रीस्वामींच्या मानसीं ॥ गुरुवीण चिंतन अन्य ना म्हणसी । तरी हें आम्हां न पटेचि ॥५०॥ कल्पना नसतां कैसा घडे । व्यापार, सांगा आम्हांपुढें । तरी आतां बोलांकडे । चित्त देऊनि ऐकावें ॥५१॥ जे असती खरे गुरुभक्त । ते असती सदा विरक्त । गुरुवीण तयां अन्य ना दिसत । पांचही विषयांत श्रीगुरुचि ॥५२॥ विषयांचे ज्ञान झालियावीण । कल्पना येतील केवीं कोठून । सद्गुरूचि एक दिसतसे पूर्ण । मग कल्पना त्या अन्य कैशा ॥५३॥ जरी उठे अन्य कल्पना । गुरुप्रेमावीण ती नाहीं जाणा । मूळ कारण सद्गुरुराणा । कैसें तें बोलूं दृष्टांतें ॥५४॥ प्रपंचामाजीं हरएक प्राणी । करिती धडपड बहुविध जनीं । उदरभरणास्तव दिनरजनीं । काळ घालविती सारे हो॥५५॥ कीं धनावांचुनी न घडे जीवन । तेंचि मिळवाया सारे यत्न । म्हणोनि जगीं आपुलें तनुमन । त्याचि कार्या लाविती ॥५६॥ कवण्याही द्वारें जो कां यत्न । धनचि मिळवायाकारण । म्हणोनि सकल जनांलागून । तेंचि ध्यानीं मनीं स्वप्नीं ॥५७॥ कोणत्या ठायीं मिळेल पैसा । कवण उपाय करावा कैसा । उगीच बसतां न मिळे आपैसा । काबाड कष्टांवांचुनियां ॥५८॥ऐशा विचारें सकल जन । करिती नानापरी प्रयत्न । मनामाजीं राहे धन । गुप्तपणें पहा पां ॥५९॥ जरी करिती नाना कष्ट । आणि करिती कार्यें नीट । परी धनाचा हेतु घट्ट । सर्व कार्यांतीं गुप्त असे ॥६०॥ नानापरी कर्में करितां । कल्पनेविण न घडती सर्वथा । एक कल्पना मानसीं असतां । दुजी कैंची येईल ती ॥६१॥ तेव्हां कैंचेंही करो कर्म । त्यांतचि मन रमे हा नेम । तेव्हां नाठवी धनाचें नाम । एकाग्र मनें कर्म करी ॥६२॥ समजा एक शिक्षक उत्तम । मुलांसी शिकवी धरोनि प्रेम । तेव्हां मानसीं न जपे तो मम । पैसा अडका कांहींएक ॥६३॥ शिकविण्याचें करितां कार्य । कैसा आठवील अन्य विषय । तैसें करितां बंद होय । क्रिया सारी त्याची पैं ॥६४॥ म्हणोनि कवणही कार्य करितां । धन ऐसें न जपे सर्वथा । परी गुप्तरूपें त्याचिया चित्ता । हेतु असे धनाचा ॥६५॥ तद्वत् जरी स्वामिराय चतुर । चालणें बोलणें इत्यादि समग्र । व्यापार करिती अव्यग्र । तरी गुरुपाय न विसंबती ॥६६॥जैसा आम्हांसी धनाचा गुप्त । हेतु असे मनीं सदोदित । तैसे आमुचे सद्गुरुनाथ । धरिती गुरुचरण हृत्कमलीं ॥६७॥ करोत नाना विचार तर्क । येवोत कल्पना त्या अनेक । घडो व्यवहार सकळिक । परी गुप्त अंतरीं गुरुप्रेम ॥६८॥ तें कैसें जाईल सांगा । प्रेमनिश्चय असे दांडगा । अन्य पसारा सारा वावुगा । कल्पनादिक पहा हो ॥६९॥ बालक जरी मातेसी सोडुनी । इकडे तिकडे खेळायालागुनी । धांवत जाय परी निजमनीं । ध्यास असे तो मातेचा ॥७०॥पडतां अथवा कुणींही मारितां । 'आई' म्हणोनि धांवे तत्त्वतां । माता तयाच्या सर्वदा चित्ता । म्हणोनि माय धांवत ये ॥७१॥ तैसे स्वामी सद्गुरुराय । करोत व्यवहार पहा अन्य । अणुमात्र न विसंबती पाय । पांडुरंगाश्रम-सद्गुरूंचे ॥७२॥ येथे 'व्यवहार' म्हणतां मानसीं । प्रपंच समजूं नका त्यासी । व्यापार म्हणती सकल क्रियेसी । चालणें बोलणें इत्यादिकां ॥७३॥ असो यापरी सद्गुरुराय । गुरुवीण नाठविती अन्य विषय । दुजी कल्पना जरी येय । तरी न विसंविती गुरुमूर्ति ॥७४॥ यापरी स्मरण सतत । करितां होती परम विरक्त । संन्यासधर्म कडक पाळित । प्रीतीनें निर्धारें ॥७५॥ पांचही विषय जिंकोनि सारे । मन परमार्थीं लाविलें त्वरें । ग्रंथ वेदांताचे बरे । वाचिती परम प्रीतीनें ॥७६॥ विवेक वैराग्य आदिकरोनि । चारी साधनीं युक्त असोनि । झिजविती सदा तनु मन वाणी । परमार्थीं ते रात्रंदिन ॥७७॥साक्षात् श्रीराम अवतरे निश्चितीं । तेव्हां साधनें सहजचि असती । आणावीं न लागती त्यांप्रति । साधनें अथवा सद्गुण ते ॥७८॥ केवळ शुद्ध परिपूर्ण ब्रह्म । तेथें कैंचीं साधनें उत्तम । हा आम्हां अज्ञांचा भ्रम । असो पुढें परिसा हो ॥७९॥ सारे सद्गुण अंगीं पूर्ण । नसती अणुमात्रही दुर्गुण । स्मरणीं गुंगले रात्रंदिन । श्री सद्गुरूंच्या ते पाहीं ॥८०॥ ध्यानीं मनीं स्वप्नीं जाणा । न विसंबिती सद्गुरुराणा । त्यावांचोनि अंतःकरणा । न शिवे अन्य विषय कधीं ॥८१॥ श्रीसद्गुरुचरणांविण । जरी अन्य चिंतील मन । तरी करी त्यासी ताडण । काय तें ऐका प्रेमानें ॥८२॥ विवेकाची करोनि छडी । उगारीतसे त्यावरी घडी घडी । विषयीं मारूं नको उडी । म्हणोनि ताडण करिताती ॥८३॥ ऐसें करोनि रात्रंदिन । ओढिलें परमार्थीं आपुलें मन । सदा धरी अनुसंधान । निजस्वरूपाचें पहा हो ॥८४॥ ऐसें असतां क्षणोक्षण । लोटले सहजचि अनेक दिन । तेव्हां करिती स्वामी सघन । मानसीं विचार एकचि पैं ॥८५॥ कीं जन्मा आलियाचें काज । कवण असे आमुचें आज । याचा पडावा मजला उमज । तरी उपाय काय करूं ॥८६॥ म्हणोनि आळविती सद्गुरूलागीं । पुढील अध्यायीं सांगूं वेगीं । कैसे झाले ते विरागी । तेंही बोलूं गुरुकृपेंचि ॥८७॥ आनंदाश्रम - परमहंस । शिवानंदतीर्थ पुण्यपुरुष । यांच्या कृपाप्रसादें अष्टचत्वारिंश । अध्याय गुरुदासें संपविला ॥८८॥ स्वस्ति श्रीचित्रापुर । गुरुपरंपराचरित्र सुंदर । ऐकतां भेटेल श्रीसद्गुरुवर । अष्टचत्वारिंशाध्याय रसाळ हा ॥८९॥ अध्याय ४८॥ ओव्या ८९॥ ॐ तत्सत्- श्रीसद्गुरुनाथचरणारविंदार्पणमस्तु ॥ ॥ इति अष्टचत्वारिंशोऽध्यायः समाप्तः ॥ N/A References : N/A Last Updated : January 20, 2024 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP