मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|श्रीचित्रापुरगुरुपरंपराचरित्र| अध्याय ॥१॥ श्रीचित्रापुरगुरुपरंपराचरित्र ग्रंथानुक्रम विषयानुक्रमणिका कृताञ्जलिः प्रस्तावना सारस्वतांचें मूळ श्रीगुरुपरम्परा अध्याय ॥१॥ अध्याय ॥२॥ अध्याय ॥३॥ अध्याय ॥४॥ अध्याय ॥५॥ अध्याय ॥६॥ अध्याय ॥७॥ अध्याय ॥८॥ अध्याय ॥९॥ अध्याय ॥१०॥ अध्याय ॥११॥ अध्याय ॥१२॥ अध्याय ॥१३॥ अध्याय ॥१४॥ अध्याय ॥१५॥ अध्याय ॥१६॥ अध्याय ॥१७॥ अध्याय ॥१८॥ अध्याय ॥१९॥ अध्याय ॥२०॥ अध्याय ॥२१॥ अध्याय ॥२२॥ अध्याय ॥२३॥ अध्याय ॥२४॥ अध्याय ॥२५॥ अध्याय ॥२६॥ अध्याय ॥२७॥ अध्याय ॥२८॥ अध्याय ॥२९॥ अध्याय ॥३०॥ अध्याय ॥३१॥ अध्याय ॥३२॥ अध्याय ॥३३॥ अध्याय ॥३४॥ अध्याय ॥३५॥ अध्याय ॥३६॥ अध्याय ॥३७॥ अध्याय ॥३८॥ अध्याय ॥३९॥ अध्याय ॥४०॥ अध्याय ॥४१॥ अध्याय ॥४२॥ अध्याय ॥४३॥ अध्याय ॥४४॥ अध्याय ॥४५॥ अध्याय ॥४६॥ अध्याय ॥४७॥ अध्याय ॥४८॥ अध्याय ॥४९॥ अध्याय ॥५०॥ अध्याय ॥५१॥ अध्याय ॥५२॥ अध्याय ॥५३॥ अध्याय ॥५४॥ अध्याय ॥५५॥ अध्याय ॥५६॥ अध्याय ॥५७॥ अध्याय ॥५८॥ अध्याय ॥५९॥ अध्याय ॥६०॥ अध्याय ॥६१॥ अध्याय ॥६२॥ अध्याय ॥६३॥ आरती श्री सद्गुरुंची मंगल पद चित्रारपुरगुरुपरम्परावन्दनम् श्रीशंकरनारायणगीतम् शरणाष्टकम् आरती श्रीगुरुपरंपरेची श्रीमत् पांडुरंगाश्रम स्वामींजी आरती सद्गुरुंची आरती चित्रापुरगुरुपरंपरा - अध्याय ॥१॥ सुबोधाचा भाग तर अमोल आहे. तशीच प्रश्नोत्तरी ही ह्या गुरुचरित्राचें अपूर्व वैशिष्ट्य होय. Tags : chitrapurpothiचित्रापुरगुरुपरंपरापोथी अध्याय ॥१॥ Translation - भाषांतर अथ श्रीचित्रापुरगुरुपरंपराचरित्र प्रारंभ: ।ॐॐ प रि ज्ञा ना श्र म श्री गु रु शं कर ।प रि ज्ञा ना श्र म शं कर स द्गु रु ॥के श व वा म न कृ ष्ण पां डु रं ग ।आ नं द प रि ज्ञा न गु रु ॥ ॐ ॥श्रीचित्रापुरगुरुपरंपराचरित्र॥ श्रीगणेशाय नमः ॥ श्रीशारदांबायै नमः ॥ श्रीगुरुभ्यो नमः ॥ श्रीभवानीशंकराय नमः ॥ श्रीमत्परमहंसश्रीपांडुरंगाश्रमस्वामीगुरुभ्यो नमः ॥ श्रीमत्परमहंस श्री आनंदाश्रमस्वामीगुरुभ्यो नमः ॥ श्रीमत्परमहंसश्रीपद्मनाभतीर्थस्वामीगुरुभ्यो नमः ॥ श्रीमत्परमहंसश्रीसच्चिदानंदस्वरूपश्रीशिवानंदतीर्थस्वामीगुरुभ्यो नमः ॥गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुर्गुरुर्देवो महेश्वरः । गुरुः साक्षात्परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः ॥ॐ॥ जय जया जी श्रीगणनाथा । निरसे सकल भवभयचिंता । ऐकूनि तव गुणकीर्ति आतां । आलों ताता शरण मी ॥१॥ प्रथम करितों तुझें स्तवन । सकलही होऊनि विघ्ननिरसन । यश ये कार्या न लागतां क्षण । करितों वंदन तुजलागीं ॥२॥ तुझें नाम गातां मन । होय उत्सुक कराया ध्यान । मग सत्वर समाधान । होय परिपूर्ण ज्ञान पैं ॥३॥ आतां करूं सरस्वतीवंदन । दुरितें सर्व जाती पळून । आठवितां तुज आमुचें मन । होय तल्लीन चरणीं या ॥४॥ जय जय जय जय शारदादेवी । स्तवितों तुजला करितां ओवी । दिव्यमति देऊनि दावीं । सुपंथातें मजलागीं ॥५॥ शुद्ध निर्विकल्प शांति । नाम घेवोनि 'सरस्वती' । प्रख्यात अससी तूं या जगतीं । देसी विद्या सकलांसी ॥६॥ संत-साधु-सद्गुरुस्वामी । 'ब्रह्मविद्या' या प्रसिद्ध नामीं । स्तविती तुजला ग्रामोग्रामीं । अतिउल्हासें दिनरजनीं ॥७॥ हे सरस्वति काश्मीरवासिनी । तूं सारस्वतांची अससी जननी । प्रसन्न हो या मंदमतीलागुनी । करीं सुमति माझी ही ॥८॥ असो आतां सद्गुरुनाथा । नमन करूनि सुखवूं चित्ता । तूंचि सकल जगाची माता । निरसीं चिंता या समयीं ॥९॥ जय जय सद्गुरु करुणाकरु । तूंचि सर्वांसी आधारु । तुजवांचोनि पैलपारु । नाहीं कोणी पावविता ॥१०॥ तुझी देवा महिमा अपार । नेणें मी तो अज्ञ पामर । वर्णन कराया सविस्तर । मंदप्रज्ञ असें मी ॥११॥ कृपा करीं बालकावरी । भक्ति नाहीं मम अंतरीं । म्हणोनि नच मज धिक्कारीं । ऐसी प्रार्थना माझी ही ॥१२॥ तूंचि देऊनि स्फूर्ति मजला । मजकडुनी करवीं ग्रंथाला । वंदन करितों तव पदाला । देवा समर्था गुरुराया ॥१३॥ असो आतां गोमांतक प्रांत सुंदर । सारस्वतांचे कुलदेव थोर । वसती तेथें साचार । आठवू सकलां या समयीं ॥१४॥जय जय शांतादुर्गादेवी । तव पद माझ्या मस्तकीं ठेवीं । वेगें मोक्षपदासी दावीं । आई माझ्या कुलदेवते ॥१५॥ तूं आलीस शोधावयासी । श्रीहरसांबसदाशिवासी । प्राप्त झालीस भक्तजनांसी । अपार महिमा तुझी गे ॥१६॥'शांतादुर्गा' घेऊनि नाम । प्रकटलीस गिरिजे पाहूनि प्रेम । भक्तजनांचा पुरविसी काम । कवळें - ग्रामीं राहोनि ॥१७॥ गोत्र कौशिक आणि भारद्वाज । तुझे भक्त होऊनि सहज । सेवा करिती सोडूनि लाज । करिती पूजा प्रेमानें ॥१८॥महारुद्र नवचंडिका । हवन करितां सकल लोकां । इच्छित फळें देसी भाविकां । किती वानूं तव करणी ॥१९॥ तूंचि माझ्या जिव्हेवरी । बैसूनि वदवीं तुझी थोरी । कांहीं नेणे वाळ हा जरी । देईं थारा तव पायीं ॥२०॥ नमितों आतां तव पदकनळां । क्षमुनी पदरीं घे तव बाळा । हेचि प्रार्थना करितों तुजला । शांत सगुणे वेल्हाळे ॥२१॥ असो आतां चित्रापुर सारस्वत-- । कुलदेव आमुचे परम विख्यात । करोनि वंदन तयांप्रत । आठवू चित्त स्थिर करोनि ॥२२॥ नमूं हा श्रीमंगेश सुखकर । देवी शांतादुर्गेचा भ्रतार । तोचि भक्तांसी आधार । विननूं आतां त्या देवा ॥२३॥ जय जय जय जय श्रीमांगिरीशा । नमितों तुजला तोडीं पाशा । सोडूनि आलासी निज कैलासा । रुसुनी तूं अंबेवरी ॥२४॥ करोनि ढोंग भक्तकाजा । पळवुनी आणी संगें गिरिजा । प्रियोळ-ग्रामीं वास समजा । करोनि सकलां तोषविसी ॥२५॥ वत्स आणि कौंडिण्य गोत्री । तुझे भक्त अहोरात्रीं । स्तविती तुजला सतत धरित्रीं । येती तुझिया दरुशना ॥२६॥ करिती लघुरुद्र - आवर्तन । महारुद्र त्रिदारीं अर्चन । कोणी करिती प्रेमें कीर्तन । काय वानूं तव महिमा ॥२७॥ कित्येक धरोनि हेतु का मानसीं । पुसती लावोनि प्रसाद तुजसी । उत्तर देसी त्यांच्या प्रश्नासी । सत्य होय सांगसी तें ॥२८॥ ऐसी तुझी महिमा ऐकुनी । प्रार्थना करितों तुजलागुनी । भजनीं लावीं माझी वाणी । शिव - हर - शंकर - मंगेशा ॥२९॥ आतां नमूं महालक्ष्मी । बांदिवडें या सुंदर ग्रामीं । स्तवितों तुजला सेवक हा मी । करुणा करीं गे तूं आई ॥३०॥ जय जय महालक्ष्मी देवी । मंगीश शांतादुर्गा कुळावी । असती तुजला बहुत पालवी । सकलां रक्षीं शिशूपरी तूं ॥३१॥ पापी हीन दीन हा मी । देह झिजविला नाहीं धर्मीं । विषयीं बुडालों सारा नेहमीं । जन्म वायां गेला हा ॥३२॥ अपराध सारे घालुनी पोटीं । सत्वर मजला देईं भेटी । ठेवूनि मजवरी कृपादृष्टी । उद्धरीं माते करुणाळे ॥३३॥ आतां नमूं या महालसांबे । म्हाडदोळ बिदी अति शोभे । ऐशा स्थानीं राहोनि जगदंबे । वाट तूं पाहसी भक्तांची ॥३४॥ जय माते महालसादेवी । अससी तूं महालाघवी । जनीं घेउनी उत्तम पदवी । होसी प्रसन्न सकलांसी ॥३५॥ अत्रि-गोत्री असती भक्त । तुझिया संनिधीं येती सतत । त्यांवरी त्वां धरिला हस्त । कृपारूप वरद तो ॥३६॥ न कळे मजला कवन कराया । परी तूं देईं मजसी अभया । क्षमा करूनि निजदासा या । देईं सद्भक्ति गुणसरिते ॥३७॥ आतां प्रार्थूं श्रीनागेशा । निजभक्तांच्या पुरवूनि आशा । सकलही ओढूनि तोडिसी क्लेशा । ऐशा तुजला नमन असो ॥३८॥ कांहीं भक्त सारस्वत । तुजला भजताति प्रख्यात । आतां धरूनि माझा हात । दावीं सुपंथ तूं ताता ॥३९॥ आतां नमूं लक्ष्मीनृसिंहा । वंदितों तुजला मी पहा । मजला देईं भक्ति महा । येतों शरण तुजलागीं ॥४०॥ तुझी महिमा असे अपार । नच जाणे हा अज्ञानी नर । तूंचि देऊनि बरवा विचार । सांभाळीं या निजबाळा ॥४१॥ कांहीं सारस्वत हे तुजसी । भजती प्रेमानें दिवसनिशीं । इच्छित फलें तूं बा त्यांसी । देसी झडकरी तूं देवा ॥४२॥ ऐसा तूं परमप कृपाघन । तुजला भजतां होय निरसन । द्वैतभाव सकलही जाण । प्रल्हादापरी तयांचा ॥४३॥जय लक्ष्मीनारायण देवा । वंदन करितों धरुनी भावा । देई आतां निजपद - ठेवा । दीनदयाळा तूं ताता ॥४४॥ तुझें स्थान अंकोलेसी । आर्यादुर्गा - जवळी घेसी । कांहीं सारस्वत तुजसी । भजती प्रेमें दिनरजनीं ॥४५॥ एवं सारस्वतांचे कुलदेव । सकल एकरूप स्वयमेव । भक्तां आवडे जें जें नांव । तें तें दिधलें त्यांनीं तुज ॥४६॥ आतां आमुचे चरित्रनायक । मुख्य सारस्वतांचे सन्मार्गदर्शक । सांगती सकलां सद्विवेक । म्हणती त्यांसी 'धर्मगुरु' ॥४७॥चित्रापुर - मठाधीश । नाहीं त्यांच्या अंगीं दोष । नऊ आश्रम जाहले खास । जीवन्मुक्त सकलही ॥४८॥ ऐसी ही गुरुपरंपरा । यांचे नाम घेतांचि त्वरा । येईल स्फूर्ति लिहिण्या चरित्रा । सत्य सत्य त्रिवाचा ॥४९॥ असो आतां तयां आश्रमां । चित्तीं धरूनि निर्मल प्रेमा । वंदन स्तवन करूनि कामा । जाळूनि टाकूं निर्लोभें ॥५०॥ मग येईल सहज चित्तीं । सुंदर सुखकर सद्गुरुमूर्ति । कैसी वानूं आपुली कीर्ति । तूंचि शिकवीं दयाळा ॥५१॥ आय सद्गुरु प्रथम आश्रम । 'परिज्ञानाश्रम' धरोनि नाम । पुरवावयासी भक्तकाम । येईं धांवूनि लवलाहीं ॥५२॥ जय जय 'परिज्ञानाश्रम' स्वामी । वंदन करितों दृढभावें मी । धरिली इच्छा अंतर्यामीं । ती तूं पुरवीं समजोनि ॥५३॥ धरोनि नाना अवतार । करिसी जनांचा उद्धार । कैलासवासी श्रीशंकर । येसी अवनीं तूं ताता ॥५४॥ आतां नमूं द्वितीय आश्रमा । धैर्य येईल स्तवनीं आम्हां । भक्तकामकल्पद्रुमा । नमो नमो गुरुनाथा ॥५५॥ जय जय देवा श्रीगुरुराया । 'शंकराश्रम' स्वामी सदया । वंदन करितों मी तव पायां । तारीं तारीं करुणाकरा ॥५६॥ ध्यातां तुजला वा दिनरजनीं । अज्ञान सारें जाय निपटोनी । वर्णाया ही माझी वाणी । न शके देवा खचित पैं ॥५७॥ तृतीय आश्रमा करितों नमन । आतां प्रेमभावें जाण । नाम घेतां पाप दहन । होईल सारें निश्चयें ॥५८॥ जय जय जय जय करुणासिंधु । 'परिज्ञानाश्रम' आपत्-बंधु । तुजवांचोनि कवणा वंदूं । ठायीं ठायीं तूंचि अससी ॥५९॥ परी हा बालक नेणे कांहीं । म्हणुनि बडवडे व्यर्थचि पाहीं । मातेलागीं वीट न येई । तैसी तूं मम माउली गे ॥६०॥ आतां करूं सत्वर नमन । चतुर्थ या आश्रमालागुन । धरोनि अंतरी सद्गुरुवचन । करितों आतां वाक्सेवा ॥६१॥ जय जया जी सद्गुरुराजा । 'शंकराश्रमा' स्वामी माझ्या । सकल अपराध क्षमूनियां काजा । देईं यश तूं विनवितसें ॥६२॥ मज ना कांहीं भक्तिश्रद्धा । कैसा पोंचू निज आनंदा । सदा करोनि प्रपंच-धंदा । श्रमलों आतां मज तारीं ॥६३॥ पंचम आश्रमा आतां वंदूं। सकल तोडिती भेदाभेदु । चित्तीं नुरवी अल्पही खेदु । ऐसा सद्गुरु सुखमूर्ती ॥६४॥ जय जय 'श्रीकेशवाश्रम' गुरवे । वंदन करितों तुजला भावें । देईं मातें सज्जन बरवे । भजन कराया सप्रेमें ॥६५॥ आतां नमूं षष्ठआश्रमा । तुजला ध्याऊं कैसें आम्हां । न कळे, परी तूं शिकवूनि धर्मा । नेईं हळू हळू निजमार्गा ॥६६॥जय जय स्वामी गुरुदेवा । 'वामनाश्रमा' या जडजीवा । उद्धरीं आतां घेईं सेवा । दीन दुर्बल दासाची ॥६७॥ आतां करावा नमस्कार । सप्तम आश्रम महाथोर । करूं सर्वही जयजयकार । थै थै नाचू आनंदें ॥६८॥ जय जय 'कृष्णाश्रम' - गुरुराया । लागे पाठीं दुस्तर माया । विषयानंदें फुले ही काया । रक्षीं रक्षीं दयाळा ॥६९॥ या आतां नमूं अष्टमाश्रमा । बोलूं त्यांच्या सुंदर नामा । असे तयांचा अगाध महिमा । पुढती वर्णूं चरित्रीं ॥७०॥ जय जय जय जय श्रीगुरुनाथा । 'पांडुरंगाश्रमा' नमितों ताता । सकल जनांसी तुजवीण त्राता । न दिने कोणी या जगतीं ॥७१॥ श्रीदत्तात्रेय - अवतार । अससी तूं हा आमुचा निर्धार । धर्मजागृति दिधली साचार । निजभक्तांसी सप्रेमें ॥७२॥ बालपणीं मला का झालें । तुझें दरुशन परम कृपाळे । परी मज आठवतें वेल्हाळे । शांत कांति ती मुखकमळीं ॥७३॥ ऐसा तूं देवाधिदेव । तुझें वदनीं वदतां नांव । दग्ध होय अहंभाव । खचित मजला वाटतें ॥७४॥ जे तुजला म्हणती नर । तयांसी होय नरक थोर । परी ऐकतां तुझें चरित्र । जळती पापें सर्वही ॥७५॥ आतां नमूं या नवम आश्रमा । परिचय सकलां आहे आम्हां । युक्ति साधूनि लाविती धर्मा । सकल जनांसी प्रेमानें ॥७६॥ ऐसा हा नवम आश्रम । असे परम सुंदर सुगम । 'आनंदाश्रम' घेऊनि नाम । साक्षात् विष्णु अवतरला ॥७७॥ जयजयाजी सद्गुरु राया । आनंदाश्रम - स्वामीपायां । वंदन करितों दे मज अभया । क्षमूनि सर्व अपराध ॥७८॥त्वां केली भक्ति थोर । आपण तरूनि जनउद्धार । केला, झिजवूनि काया समग्र । जनकल्याणा निर्लोभें ॥७९॥ ऐशा तुजला वारंवार । स्मरतां पळती पापें दूर । भेटतां येई सद्विचार । पूजितां होय निष्कामी ॥८०॥ देईं मजला आशीर्वचन । चरित्र कराया उत्सुक हें मन । कर्ता करविता तूं एक जाण । सद्गुरुराया दयाळा ॥८१॥ नाहीं मज वक्तृत्वशक्ति मोठी । असती अंतरीं अपराध कोटी । परी तूं करूनि कृपादृष्टी । वदवीं तूंचि मजकडुनी ॥८२॥ असो आतां नमूं भवानीशंकरा । चित्रापुरग्रामीं अससी प्रभुवरा । तारीं तारीं निजकिंकरा । धांव दयाळा लवलाहीं ॥८३॥ जय जय भवानीशंकरा । चुकवीं जन्ममरणाचा फेरा । घेईं पदरीं क्षमूनि पुत्रा । करितों नमन तुजलागीं ॥८४॥ सारस्वत - चित्रापुरमठासी । तूंचि सर्वां अधिष्ठान होसी । समुद्रामाजीं लहरी जैसी । तैसे आहों सकलही ॥८५॥ कित्येक कवि थोर थोर । करिती तुझें श्रवर्णन अपार । तयांपुढें हा अज्ञ पामर । काय वर्णील तव महिमा ॥८६॥ आतां नंया दत्तात्रेय-अवधूत । श्रीसद्गुरूचें आराध्य दैवत । 'बाड' ग्रामीं राहे सतत । होय उद्धार जनांचा ॥८७॥ जय जय दत्तात्रेय देवा । देईं शाश्वत दृढतर भावा । दिव्य मति देऊनि घ्यावा । पदरीं आपुल्या हा दास ॥८८॥ तुझी कीर्ति महाथोर । अनसूया पतिव्रता सुंदर । कसासी लाविली येऊनि सत्वर । जाहलासि बाळ तियेचा ॥८९॥ तूं काय बघसी कसोटी । नाहीं तुजला मत्सर पोटीं । वाढविण्या भक्तकीर्ति गोमटी । केलें ढोंग छळण्याचें ॥९०॥ कराया जनांचा उद्धार । आलासि निमित्त करोनि भूवर । तुझी महिमा असे अपार । असमर्थ मी वर्णाया ॥९१॥ देवा आतां दो परम कृपाळा । तुझें स्वरूप वेळोवेळां । दावीं दत्ता माझ्या डोळां । करीं खंडन द्वैताचें ॥९२॥ संसार दुस्तर लागला पाठीं । हेचि लागली चिंता मोठी । करोनियां कृपादृष्टी । तारीं तारीं निजदासा ॥९३॥ आतां नमूं 'स्वयंप्रकाश' । माझा परात्पर गुरु जगदीश । काय वानूं करी विध्वंस । अज्ञानाचा क्षणमात्रें ॥९४॥ जय जय सद्गुरो स्वयंप्रकाशा । देईं तूंचि मजला मोक्षा । तेवींच या निजदासा । दे वैराग्य - विवेकादि ॥९५॥ लक्ष चौऱ्यांशीं फिरूनि योनी । आलों नरजन्मासी अवनीं । परी वय दवडिलें मीं दिनरजनीं । विषयीं सारें व्यर्थचि ॥९६॥ तूंचि माझा करिसी सांभाळ । ऐसा निश्चय धरिला सबळ । तो तूं दृढतर करूनि सकळ । निवारी संकट ही प्रार्थना ॥९७॥ आतां नमूं परमगुरूसी । 'पद्मनाभतीर्थ' स्वामीसी । महिमा अपार त्यांची मजसी । अशक्य वर्णन करावया ॥९८॥ जय जय पद्मनाभतीर्था । करितों वंदन तुजला ताता । निरसीं माझी मोहममता । कृपा करोनि बा देवा ॥९९॥ तीव्र वैराग्य तुझे अमित । भलें सांगसी जना अद्वैत । तुझी कीर्ति परम विख्यात । न जाणें मी अज्ञ असें ॥१००॥ द्वादशदिन तूं उभा राहसी । शिळेवरी तिष्ठत गुरुचरणापाशीं । शीत उष्ण साहुनी दिननिशीं । गुरुआज्ञेपरी बा ॥१०१॥ बालपणींच संन्यासग्रहण । करुनी केलें जनांसी पावन । देह झिजविला न भक्तांलागुन । अगणित उपकार तव देवा ॥१०२॥ साक्षात् दत्तात्रेय-अवतार । नसे संशय यांत अणुमात्र । नाहीं मजला तुझें चरित्र । विदित कांहीं देवा हो ॥१०३॥ मी असें एक पापी हीन । नाहीं झालें तव सत्य दर्शन । म्हणोनि मजला न कळे महिमान । कैसी वर्णावी तव लीला ॥१०४॥ आतां नमूंया आद्य सद्गुरु । 'शंकराचार्य' करुणासागरु । वैदिक मार्ग स्थापण्या सुंदरु । अवतरे तो महादेव ॥१०५॥ जया जया जी शंकराचार्या । नमितों तुजला श्रीगुरुवर्या । बोधूनि आपुल्या निजदासा या । पार करीं तूं झडकरीं ॥१०६॥ बघुनी जगतीं स्वेच्छाचरण । लगबगें येसी तूं धांवून । वेदधर्मस्थापना करून । केलें पावन भारतियां ॥१०७॥ तूंचि देवा 'शिवानंद'। नाम धरोनि परम सुखद । बघूनि आम्हां मतिमंद । येसी मागुती आतां तूं ॥१०८॥ ऐसा माझा मोक्षदायक । श्रीशिवानंदतीर्थ सम्यक । स्वामी सद्गुरु तोचि एक । सकलार्थदाता ईश्वरु ॥ १०९॥ असो आतां नमन स्तवन । त्या सद्गुरूचें करुनी स्मरण । पुढें आरंभू चरित्र कथन । त्याच्याच कृपाप्रसादें ॥ ११०॥ जय जय स्वामी परमहंसा । शिवानंदतीर्था सद्गुरु-महेशा । भक्तजनांच्या संकटनाशा । अवतरसी तूं या जगतीं ॥१११॥ 'शिवानंदतीर्थ' धरोनि नांव । साक्षात् अवतरे महादेव । ऐसा तूं मम सद्गुरुराव । देईं ठाव तव पायीं ॥११२॥ करितों तुजला नमस्कार । सद्भावें ना प्रेमपुरःसर । तुजवांचोनि कराया उद्धार । कोणी नाहीं मज ताता ॥११३॥ तूंचि सकल कार्या आधार । ऐसा असे वा निर्धार । ग्रंथारंभा येईल धीर । तुज आठवितां गुरुमाये ॥११४॥ निजभक्तांच्या कार्यालागीं। किती झिजविला देह हा जगीं। कंठ शोषूनि बोधूनि सुमार्गी । लाविलें सकळां प्रेमानें ॥११५॥ नाहीं अणुमात्र क्रोध अंगीं । करिसी भक्तांचे समाधान वेगीं । श्री निंदक वंदक अथवा ढोंगी । सारे तुजला एकचि ॥११६॥ स्तवितां नाहीं मनासी हर्ष । निंदितां खेद नव्हे चित्तास । सर्वही आत्मरूपचि खास । पाहसी तूं निर्धारें ॥११७॥ नाहीं किंचित् तुजला आळस । पुराण प्रवचन रात्रंदिवस । सांगण्या मनासी अति हौस । किती कनवाळू तूं देवा ॥११८॥ राजा रंक सकळ जनांसी । शिशूपरी बघसी आपुल्या मानसीं । तव गुण वर्णाया मजसी । योग्यता नाहीं गुरुराया ॥११९॥ मजला करोनि निमित्त । तूंचि वदविसी प्रेमळ ग्रंथ । परी अभिमान मानसीं गुप्त । धरितों व्यर्थ मी पाहीं ॥१२०॥ श्रीकृष्णानें द्वापारयुगीं । उचलिला गोवर्धन तो वेगीं । लावूनि वेळू म्हणती ढोंगी । आम्हीं उचलिला निजबळें ॥१२१॥ तैसा मी तव विसरूनि महिमा । मीचि कर्ता होउनी कामा । सिद्ध जाहलों, परी तूं आम्हां । जाऊं नेदीं कुपंथा ॥१२२॥ तूंचि देवा सकल कर्ता । करविता आणि ज्ञेय ज्ञाता । ज्ञान सर्वही एकचि ताता । मी तूं ऐसा भेद नाहीं ॥१२३॥ परी मज कांहीं नाहीं विदित । देहचि मी हा असे खचित । ऐसें म्हणे माझें चित्त । म्हणोनि अभिमानें हुंबरे ॥१२४॥ नाठवी जरी तुजलागोन । न कळे कांहीं कराया कवन । अनुभवसिद्ध असे हें वचन । नव्हे असत्य कदापि ॥१२५॥ असो आतां श्रीगुरुमाये । घडिघडीं स्मरतों तुजला पाहें । चरित्रारंभा धांवत ये ये । स्फूर्ति द्याया दयाळा ॥१२६॥तूंचि देवा मजला ताता । पार घालीं सत्वरीं आतां । हेचि प्रार्थना सद्गुरुनाथा । चरणीं माथा ठेवितों ॥१२७॥ असो आतां श्रोतयां सकलां । भाविक सज्जन भक्तप्रेमळां । वंदन करितों आपुला चेला । चुकलों तरी मज सांभाळा ॥१२८॥ चित्रापुर - श्रीगुरुचरित्र । करूं कथन परम पवित्र । अवधारावें देऊनि श्रोत्र । चित्तीं धरूनि गुरुमूर्ति ॥१२९॥ नऊ आश्रम न नवरत्न सोज्वळ । किमपि नाहीं यांत बाष्कळ । त्यांचे ऐकतां चरित्र सकळ । पापें जाती नासोनि ॥१३०॥ इंग्रजी कर्नाटकी फार । ग्रंथ एकाहूनि एक सुंदर । असतां किमर्थ हा म्हणाल तर । सांगतों कारण त्यांचें मी ॥१३१॥ इंग्रजी भाषेचा जो ग्रंथ । असे चांगलाच तो खचित । परी उपयोगा नाहीं येत । भोळ्या भाबड्या स्त्रियांसी ॥१३२॥ आणिक कर्नाटक भाषेचें । पुस्तक जाहलें असे साचें । तरी तें नित्य पारायणाचे । उपयोगा न ये पहा हो ॥१३३॥ असो आतां सकलां वंदन । करोनि पावलों समाधान । पुढील अध्यायीं निरूपण । आळविती सारस्वत शंकरासी ॥१३४॥ मग कळवळोनि त्रिनयन । अवतार घ्यावया ये धांवोन । ऐकतां पापें होती दहन । होउनी सावधान परिसावें ॥१३५॥ श्रीसद्गुरु - आनंदाश्रम । शिवानंदतीर्थ हे एकरूप ब्रह्म । यांच्या कृपाप्रसादें प्रथम । अध्याय गुरुदासें संपविला ॥१३६॥ स्वस्ति श्रीचित्रापुर । गुरुपरंपराचरित्र सुंदर । ऐकतां पापें जळती समग्र । प्रथमाध्याय रसाळ हा ॥१३७॥ अध्याय ॥१॥ ओंव्या ॥१३७॥ ॐ तत्सत्-श्रीसद्गुरुनाथचरणारविंदार्पणमस्तु ॥ ॥ इति प्रथमोऽध्यायः समाप्तः ॥ N/A References : N/A Last Updated : January 19, 2024 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP