मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|श्रीचित्रापुरगुरुपरंपराचरित्र| अध्याय ॥२५॥ श्रीचित्रापुरगुरुपरंपराचरित्र ग्रंथानुक्रम विषयानुक्रमणिका कृताञ्जलिः प्रस्तावना सारस्वतांचें मूळ श्रीगुरुपरम्परा अध्याय ॥१॥ अध्याय ॥२॥ अध्याय ॥३॥ अध्याय ॥४॥ अध्याय ॥५॥ अध्याय ॥६॥ अध्याय ॥७॥ अध्याय ॥८॥ अध्याय ॥९॥ अध्याय ॥१०॥ अध्याय ॥११॥ अध्याय ॥१२॥ अध्याय ॥१३॥ अध्याय ॥१४॥ अध्याय ॥१५॥ अध्याय ॥१६॥ अध्याय ॥१७॥ अध्याय ॥१८॥ अध्याय ॥१९॥ अध्याय ॥२०॥ अध्याय ॥२१॥ अध्याय ॥२२॥ अध्याय ॥२३॥ अध्याय ॥२४॥ अध्याय ॥२५॥ अध्याय ॥२६॥ अध्याय ॥२७॥ अध्याय ॥२८॥ अध्याय ॥२९॥ अध्याय ॥३०॥ अध्याय ॥३१॥ अध्याय ॥३२॥ अध्याय ॥३३॥ अध्याय ॥३४॥ अध्याय ॥३५॥ अध्याय ॥३६॥ अध्याय ॥३७॥ अध्याय ॥३८॥ अध्याय ॥३९॥ अध्याय ॥४०॥ अध्याय ॥४१॥ अध्याय ॥४२॥ अध्याय ॥४३॥ अध्याय ॥४४॥ अध्याय ॥४५॥ अध्याय ॥४६॥ अध्याय ॥४७॥ अध्याय ॥४८॥ अध्याय ॥४९॥ अध्याय ॥५०॥ अध्याय ॥५१॥ अध्याय ॥५२॥ अध्याय ॥५३॥ अध्याय ॥५४॥ अध्याय ॥५५॥ अध्याय ॥५६॥ अध्याय ॥५७॥ अध्याय ॥५८॥ अध्याय ॥५९॥ अध्याय ॥६०॥ अध्याय ॥६१॥ अध्याय ॥६२॥ अध्याय ॥६३॥ आरती श्री सद्गुरुंची मंगल पद चित्रारपुरगुरुपरम्परावन्दनम् श्रीशंकरनारायणगीतम् शरणाष्टकम् आरती श्रीगुरुपरंपरेची श्रीमत् पांडुरंगाश्रम स्वामींजी आरती सद्गुरुंची आरती चित्रापुरगुरुपरंपरा - अध्याय ॥२५॥ सुबोधाचा भाग तर अमोल आहे. तशीच प्रश्नोत्तरी ही ह्या गुरुचरित्राचें अपूर्व वैशिष्ट्य होय. Tags : chitrapurpothiचित्रापुरगुरुपरंपरापोथी अध्याय ॥२५॥ Translation - भाषांतर ॥ श्रीगणेशाय नमः ॥ श्रीसरस्वत्यै नमः ॥ श्रीकृष्णाश्रमस्वामीगुरुभ्यो नमः ॥ श्री भवानीशंकराय नमः ॥ॐ॥जय जय सप्तम कृष्णाश्रमा । देईं सुमति लिहाया आम्हां । अंतरी धरोनि भक्तप्रेमा । पार करावें मजला पैं ॥१॥ बालकें सांगावें नलगे मातेसी । जतन करीं तूं आई मजसी । आपण होऊनि करी ती जैसी । तैसी तूं रक्षिसी आपणचि ॥२॥ परी तें बालक लागतां भूक । पाजवी तोंवरी रडे तें देख । तैसें मी हें अज्ञ बालक । विनवित तुजला बा देवा ॥३॥ मातेहुनी तुझें प्रेम । अधिक असे पाहीं अनुपम । म्हणोनि गुरुनाथ मातेसम । हेंही म्हणतां शोभेना ॥४॥ ऐसें मजला वाटे खचित । मातेचें प्रेम कृत्रिम असत । कैसें तें हें असे विदित । तुजला देवा दयाळा ॥५॥ परी मी बोलतों किंचित् ताता । प्रेमाचे उद्गार म्हणोनि आतां । तूंचि देवा वक्ता वदविता । मी काय बोलतों तुजपाशीं ॥६॥ असो मातेचें प्रेम तें जाण । कृत्रिम हें खचितचि पूर्ण । आपुल्यासि सुख व्हावें म्हणून । करी ती प्रीति निर्धारें ॥७॥ हरएक मनुष्याची प्रीति । केवळ स्वार्थासाठीं असे ती । म्हणोनि खोटी ती प्रीति । ऐसें बोलती साधु पैं ॥८॥ परी देवा तूं बा खचित । नाहीं धरिसी अणुमात्र स्वार्थ । केवळ जगाचें करावया हित । प्रेम करिसी भक्तांवरी ॥९॥ एक एकावरी करी जें प्रेम । तें अंतरी धरोनि काम । तूं कामा छेदिलें घरोनि नेम । विवेक - धनुष्य लावोनि ॥१०॥ आपुल्यासी व्हावें सुख । म्हणोनि दुज्यावरी प्रेम देख । करिती अतिशय सकळिक । एकमेकांवरी सारें हें ॥११॥ परी तूं अससी सुखदुःखरहित । मग कैंची सुखाची इच्छा तुजप्रत । तेवींच तुझे प्रेम खचित । असे अकृत्रिम बा देवा ॥१२॥ तुझ्या मानसीं अणुमात्र स्वार्थ । नाहीं हो देवा हें खचित । म्हणोनि तूं मातेहुनी निश्र्चित श्रेष्ठ अससी गुरुराया ॥१३॥ मातेचें प्रेम अपार ऐसें । जगामाजीं प्रख्यात असे । म्हणोनि गुरुरायातेंही तैसें । म्हणती मातेसम जगांत ॥१४॥ विचार केलिया तीही उपमा । न साजे तुझ्या खऱ्या प्रेमा । ऐसी तुझी अगाध महिमा । तूंचि वर्णविसी गुरुराया ॥१५॥ सप्तम 'दास्य' हीचि भक्ति । देऊनि करीं भवबंधमुक्ति । आणिक सांगुनी सुलभ युक्ति । पार करीं ही प्रार्थना ॥१६॥ असो आतां श्रोते हो सज्जन । पुढें परिसा सावधान। मागील अध्यायीं केलें निरूपण । भक्तसंकट तें हरिलें ॥१७॥ लाभादाय - रामरावासी । कल्ले - मंजनाथय्या दोघांसी । दोषमुक्त केलें परियेसीं । वामनाश्रमस्वामींनीं ॥१८॥ आतां सांगूं सप्तम आश्रम । यांचे सारे सद्गुण परम । उत्कृष्ट शांत अति उत्तम । परिसा चित्त देऊनियां ॥१९॥ यांच्या समयीं पारिपत्यगार । होता तो बहुत हुशार । लाज्मी वेंकटरमणय्या साचार । नाम तयाचें हो पाहीं ॥२०॥ त्याच्या साहाय्यें मठाचे काम । योग्य प्रकारें होय तें सुगम । नवीन शेतें घेतलीं उत्तम । वाढली आस्ति सहजचि ॥२१॥ तेव्हां भवानीशंकर देवासी । सुवर्णालंकार केले बहुवसी । मठाची व्यवस्था योग्य परियेसीं । सुंदर करोनि ठेवियली ॥२२॥ साक्षात् विष्णूचा अवतार । 'कृष्णाश्रम' नाम हें थोर । घेउनी जनांचा केला उद्धार । परम प्रीतीनें निर्धारें ॥२३॥ जमाखर्च हिशोब सारा । ठेविला व्यवस्थेशीर तो खरा । परम निपुण मठाच्या व्यवहारा । करिती मितव्यय चातुर्यें ॥२४॥ हरएक कार्य तें आपण । न करिती विचारावांचून । परम शांतचित्तें जाण । राहाती प्रेमळ गुरुराय ॥२५॥ परम सात्त्विक रसाळ वाणी । ऐकतां भक्तजनांच्या नयनीं । आनंदाश्रु येती झणीं । ऐशी मूर्ति ती पाहें ॥२६॥ कवणही जरी येई संनिध । त्यासी प्रेमानें करिती बोध । ऐकतां होय तया आनंद । परम गोडी वाणींत ॥२७॥ ऐशी ही आनंदमूर्ति । काय वानूं त्यांची कीर्ति । त्यांच्या वाक्यामाजी निश्र्चितीं । भरला आनंद परिपूर्ण ॥२८॥ भाषण ऐकतां इतुका आनंद । होतसे न बोलवे आणिक शब्द । निःशब्द - स्थितीचा तात्काळ बोध । हो सच्छिष्यालागुनी ॥२९॥ ऐशी ती मूर्ति सुंदर । कृष्णाश्रमस्वामींची थोर । वर्णूं शकेंना मी अज्ञ पामर । वदवी तोचि मजकडुनी ॥३०॥ सूर्यप्रकाशेंचि आपण । सूर्य ऐसा आहे म्हणोन । सांगतों त्याचें करोनि वर्णन । तैसेंच वर्णितों हें सारें ॥३१॥ सद्गुरुस्वरूप सूर्य जाण । त्या कृपेच्या प्रभेनेंचि आपण । करितों त्यांचे सद्गुण-वर्णन । मग काय अभिमान धरावा ॥३२॥ असो ऐशी सद्गुरुमूर्ति । ब्रह्मज्ञान झालें त्यांप्रति । जीवन्मुक्तदशाप्राप्ति । झाली तयांलागून ॥३३॥ गीर्वाणभाषेंत परम निपुण । जाणती न्याय तर्क व्याकरण । अहाहा कैसें करावें त्यांचें वर्णन । सांगा श्रोते तुम्ही हो ॥३४॥ ऐसें असतां एके दिनीं । लोक 'मुलकी' ग्रामांतुनी । बोलवावया स्वामींलागुनी । आले महत्कार्यास्तव ॥३५॥ तरी कार्य काय तें आतां । सांगू तुम्हांलागीं तत्त्वतां । पहा कैसी मूर्ति समस्तां । होय प्रियकर ती पाहीं ॥३६॥ जेथें असे शर्करा गोड । तेथें मुंग्यांची सहज धडपड । तैसें धांवुनी जाती दुडदुड । सद्गुरुमंनिध सद्भक्त ॥३७॥ नच सांगावें लागे कोणीं । जाती आपणचि धांवुनी । खऱ्या सद्भक्तालागुनी । सद्गुरूपुढें अन्य नसे ॥३८॥ यापरी मुलकी - ग्रामांतून । आले भक्त प्रेमेंकरून । कृष्णाश्रमसंनिधीं जाण । करिती प्रार्थना मृदुवचनें ॥३९॥ जय जय देवा स्वामीराया । आलों आपणां बोलवावया । आमुच्या ग्रामीं यावें सदया । भक्तवत्सला करुणाळा ॥४०॥ आम्ही आलों मुलकीहून । तया स्थानीं देवस्थान । बांधावें ऐसा विचार करोन । आलों बोलवावया ये ठायीं ॥४१॥ 'उमामहेश्वर' ऐशा देवाची । स्थापना करावी म्हणतों साची । सर्व कार्य आपुल्या कृपेंचि । सिद्ध होईल तें पाहीं ॥४२॥ आपुल्या हस्तेंचि घालावा पाया । ऐशी इच्छा भक्तांसी या । पूर्ण करावी आपण सदया । ऐशी प्रार्थना या चरणीं ॥४३॥तेव्हां बोले सुहास्यवदन । अवश्य येऊं आम्ही जाण । भवानीशंकर तोचि आपण । कर्ता करविता समजावें ॥४४॥ जगामाजीं तयावीण । वस्तु नाहीं सांगतों खूण । तोचि एक सच्चिदानंदघन । भरला परिपूर्ण ओतप्रोत ॥४५॥ त्यावीण सारे विषय शून्य । म्हणोनि पाहूं नये वस्तु अन्य । कदाही न करावी मान्य । असत्य असे ती पाहीं ॥४६॥ प्रभुपरमेश्वरावांचोन । वस्तु पाहूं नये आन । सदा बघावा आपण । तोचि एक सर्वत्र ॥४७॥ जरी नाहीं आपणां ज्ञान । तरी धरावें एकचि वचन । "सर्वत्र भरला तो दयाघन । अस्ति-भाति-प्रियरूपें ॥४८॥ नामरूप याचा त्याग । करितां तेथे काय उरे मग । अस्ति - भाति प्रियरूपेंचि जग । अनुभवा येईल सत्य पहा ॥४९॥ म्हणोनि हाचि करावा अभ्यास । नामरूपासी त्यागुनी खास । बघतां येईल अनुभवास । सच्चिदानंद - स्वरूपचि ॥५०॥ नामरूप त्यागावयास । नच कष्ट लागती त्यास । कैसें तें सांगूं तुम्हांस । अवधारा चित्त देऊनियां ॥५१॥ अलंकार असती बहुत । सुवर्णचि एक भरलें त्यांत । बालकां सुवर्ण नाहीं कळत । हें अनुभवसिद्ध सकलांसी ॥५२॥ जो घ्यावया गेला सुवर्ण । तो न बघे अलंकार आपण । केवळ सुवर्णचि बघे तो पूर्ण । हें सकलांसी विदितचि ॥५३॥ तैसें येथें साऱ्या विषयीं । नामरूप त्यागावें पाहीं । तेव्हां दिसेल ब्रह्मचि सर्वही । भवानीशंकर तोचि पैं ॥५४॥ जैसे अलंकाराचे नामरूप । त्यागितां उरे सुवर्णचि अमूप । तैसें येथें अस्ति - भाति - प्रियरूप । उरे आत्मा सहजचि ॥५५॥ 'अस्ति' म्हणजे आहेपणा । आहे हें कळणे 'भाति' जाणा । कळतांचि तेथें होय मना । प्रीति उत्पन्न 'प्रिय' तेंचि ॥५६॥ या तिन्हींसी नाहीं नाश । नामरूप हें नासे खास । हें कैसें दावितों तुम्हांस । लावा चित्त येथेंचि ॥५७॥ पहा असती साळ्या सुंदर । त्यांचे नामरूप नासे साचार । अस्ति - भाति - प्रियत्व थोर । याचा नाश ना होय ॥५८॥ एवं अस्ति - भाति - प्रिय । याचा नाश सर्वथा न होय । नामरूप नासुनी जाय । म्हणोनि त्यागावें त्यासी पैं ॥५९॥ नामरूपाचा करोनि त्याग । अस्ति-भाति-प्रियत्वें पहावें जग । त्याचि रूपें तो हिमनग - । जामात शंकर भरियेला ॥६०॥ तो जैशाचा तैसाचि असे । सर्व वस्तूंमाजीं विलसे । इतुकें तरी धरावें साहसें । अज्ञ भक्तानेंही तें ॥६१॥ इतुकेंचि धरितां दृढ । हळू हळू आत्मा कळेल उघड । आणिक न धरावी चाड । मनामाजीं कांहीं एक ॥६२॥ यावरी कराल प्रश्न । कांहीं जरी न केलें आपण । तरी कैसें होईल संरक्षण । सांगा आमुचें स्वामी हो ॥६३॥ तरी नव्हे तैसें वचन । व्यवहार करूं नये ऐसें आपण । कथिलें नाहीं तुम्हांलागून । तरी सावधान परिसावें ॥६४॥ व्यवहार करा सारा नेटका । भोजनादि टाकूं नका । परी एक धरा निका । सांगतों तें मानसीं हो ॥६५॥ हृदयीं येती नाना कल्पना । त्या सोडुनी धरावें एकासी जाणा । त्यासी न लागे आणावा उसणा । आहे आपुल्याचि जवळी तो ॥६६॥ तो कोण तरी ऐका । विवेक एक, हाचि सारिखा । धरितां घट्ट, बघाल देखा । भवानीशंकर सर्वत्रचि ॥६७॥ विवेकेंचि होय ज्ञान । नलगे सोडावें प्रपंचभान । कार्य करितांचि आपण । लक्ष ठेवा तयावरी ॥६८॥ तुम्ही जें बांधवितां देऊळ । हें करितां कार्य उत्तमचि ये वेळ । ऐसें परमार्थासी स्थळ । योग्य असे बहुतचि ॥६९॥ याचि कारणें मठ-देउळादि । तेथें पावती सकल सिद्धि । गृहांतरीं नच होय कधीं । सुरळीतपणें परमार्थ ॥७०॥ म्हणोनि तुम्हीं केली जी योजना । उत्तम या केली निश्चयें जाणा । ऐसें म्हणोनि सद्गुरुराणा । परम संतोषे निजमानसीं ॥७१॥ ऐकतां स्वामींचा सुंदर बोध । जाहला तयां बहुत आनंद । प्रेमभावें वंदिले पद । मुलकीच्या भक्तवृंदांनीं ॥७२॥ आणिक घेउनी गेले स्वामींसी । परिवारासहित निजग्रामासी । तेथील जन संतोषले मानसीं । बघतां प्रेमळ गुरुमूर्ति ॥७३॥ मग पाहुनी सुमुहर्त । पाया घातला लावुनी हस्त । श्रीस्वामींचा, प्रेमभरित । देवस्थानाचा तो पाहीं ॥७४॥ केला उत्सव समारंभ । गौरविला स्वामी भक्तवल्लभ । आम्हांसी लाभला सुलभ । म्हणोनि टाळ्या वाजविती ॥७५॥ असो नानापरी करोनि उत्सव । संतोषविला श्रीगुरुदेव । परतले माघारे सर्व । चित्रापुर - मठासी ॥७६॥ मग पुढें प्रतिष्ठाही । त्यांच्याचि हस्तें करविली पाहीं । मुलकी ग्रामामाजीं नाहीं । तोटा तेव्हां आनंदा ॥७७॥ हें वेगळे सांगावें नलगे । सद्गुरुदर्शनें आनंद भोंगे । गुरुभक्तासी कळेल वेगें । कवण आनंद ये ठायीं ॥७८॥ सद्गुरुदर्शनें कोणतें सुख । हें वाचेनें सांगतां न ये देख। ज्यासी त्यासीच पारख । आम्हां अज्ञांसी न कळे तें ॥७९॥ असो ऐशी सद्गुरुमाउली । भूतळीं जगदोद्धारा पातली । ज्यांचे भाग्य उदेलें तेचि स्वस्थळीं । जाती घेउनी श्रीगुरूंसी ॥८०॥ लाभाया ऐसें सद्गुरुरत्न । पदरीं पुण्य असावें जाण । पुण्यावांचोनि न होय दर्शन । सत्य सांगतों तुम्हांसी ॥८१॥ धन्य धन्य तें चित्रापुर नगर । धन्य तेथील रहिवासी नर । त्यामाजीं मठाचे द्विजवर । अगणित पुण्य त्यांचे हो ॥८२॥असो आतां आम्हींही जाण । परम साहसें करितां यत्न । आम्हांसीही होय दर्शन । कधीं कधीं स्वामी सद्गुरुंचें ॥८३॥यावरी सांगूं पुढें विवरण । आतां अध्याय संपवूं येथून । पुढील अध्यायीं निरूपण । परम रसाळ तें पाहीं ॥८४॥आनंदाश्रम-परमहंस । शिवानंदतीर्थ पुण्यपुरुष । यांच्या कृपाप्रसादें पंचविश । अध्याय गुरुदासें संपविला ॥८५॥स्वस्ति श्रीचित्रापुर - । गुरुपरंपराचरित्र सुंदर । ऐकतां निजस्वरूपीं मिळती शीघ्र । पंचविशाध्याय रसाळ हा ॥८६॥ अध्याय २५॥ ओंव्या ८६॥ ॐ तत्सत् - श्रीसद्गुरुनाथचरणारविंदार्पणमस्तु ॥ ॥छ॥॥ इति पंचविंशोऽध्यायः समासः ॥ N/A References : N/A Last Updated : January 19, 2024 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP