मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|श्रीचित्रापुरगुरुपरंपराचरित्र| अध्याय ॥२२॥ श्रीचित्रापुरगुरुपरंपराचरित्र ग्रंथानुक्रम विषयानुक्रमणिका कृताञ्जलिः प्रस्तावना सारस्वतांचें मूळ श्रीगुरुपरम्परा अध्याय ॥१॥ अध्याय ॥२॥ अध्याय ॥३॥ अध्याय ॥४॥ अध्याय ॥५॥ अध्याय ॥६॥ अध्याय ॥७॥ अध्याय ॥८॥ अध्याय ॥९॥ अध्याय ॥१०॥ अध्याय ॥११॥ अध्याय ॥१२॥ अध्याय ॥१३॥ अध्याय ॥१४॥ अध्याय ॥१५॥ अध्याय ॥१६॥ अध्याय ॥१७॥ अध्याय ॥१८॥ अध्याय ॥१९॥ अध्याय ॥२०॥ अध्याय ॥२१॥ अध्याय ॥२२॥ अध्याय ॥२३॥ अध्याय ॥२४॥ अध्याय ॥२५॥ अध्याय ॥२६॥ अध्याय ॥२७॥ अध्याय ॥२८॥ अध्याय ॥२९॥ अध्याय ॥३०॥ अध्याय ॥३१॥ अध्याय ॥३२॥ अध्याय ॥३३॥ अध्याय ॥३४॥ अध्याय ॥३५॥ अध्याय ॥३६॥ अध्याय ॥३७॥ अध्याय ॥३८॥ अध्याय ॥३९॥ अध्याय ॥४०॥ अध्याय ॥४१॥ अध्याय ॥४२॥ अध्याय ॥४३॥ अध्याय ॥४४॥ अध्याय ॥४५॥ अध्याय ॥४६॥ अध्याय ॥४७॥ अध्याय ॥४८॥ अध्याय ॥४९॥ अध्याय ॥५०॥ अध्याय ॥५१॥ अध्याय ॥५२॥ अध्याय ॥५३॥ अध्याय ॥५४॥ अध्याय ॥५५॥ अध्याय ॥५६॥ अध्याय ॥५७॥ अध्याय ॥५८॥ अध्याय ॥५९॥ अध्याय ॥६०॥ अध्याय ॥६१॥ अध्याय ॥६२॥ अध्याय ॥६३॥ आरती श्री सद्गुरुंची मंगल पद चित्रारपुरगुरुपरम्परावन्दनम् श्रीशंकरनारायणगीतम् शरणाष्टकम् आरती श्रीगुरुपरंपरेची श्रीमत् पांडुरंगाश्रम स्वामींजी आरती सद्गुरुंची आरती चित्रापुरगुरुपरंपरा - अध्याय ॥२२॥ सुबोधाचा भाग तर अमोल आहे. तशीच प्रश्नोत्तरी ही ह्या गुरुचरित्राचें अपूर्व वैशिष्ट्य होय. Tags : chitrapurpothiचित्रापुरगुरुपरंपरापोथी अध्याय ॥२२॥ Translation - भाषांतर श्रीगणेशाय नमः । श्रीसरस्वत्यै नमः ॥ श्रीवामनाश्रमगुरुभ्यो नमः ॥ श्रीभवानीशंकराय नमः ॥ ॥ॐ॥ जय जय षष्ठ वामनाश्रमा । कैसें गाऊं तुझिया नामा । अंतरीं नसतां निर्मल प्रेमा । सांगें वा तूं मजलागीं ॥१॥ मज एक असे संशय । चमत्कारिक नामाचा विषय । नामें होय पापक्षय । सहजचि जाण निर्मल तें ॥२॥ जेव्हां होय निर्मल मन । मग कैंचा संशय आन । निःसंशय होतां जाण । प्रेम पूर्ण ये अंगीं ॥३॥ देवा सद्गुरो तुझ्या नामेंचि । होय मति शुद्ध साची । मति शुद्ध न झालिया आमुची । केवीं ठसेल नाम मनीं ॥४॥ हेंचि कोडें असे गहन । परी नामेंचि होय सकल निरसन । नामावांचुनी आणिक साधन । नाहीं अन्य सुलभ पैं ॥५॥ नामें होय शुद्ध मति । तेव्हां ठसे प्रेम चित्तीं । प्रेमेंचि येई सद्गुरुमूर्ति । अंतःकरणीं दृढ बापा ॥६॥ ऐशी तुझ्या नामाची महिमा । कैसी वर्णावी न कळे आम्हां । तूंचि वदवीं वामनाश्रमा । सद्गुरो स्वामी दयाळा ॥७॥ आतां देवा षष्ठ भक्ति । 'वंदन' हेंचि देई चित्तीं । ऐसी प्रार्थना चरणांप्रती । करितो दास हा पाहीं ॥८॥ आठवा आतां तुम्ही सज्जन । मागील अध्यायीं केलें निरूपण । मंगळूर - ग्रामींचा भक्त जाण । उद्धरिला केशवाश्रम स्वामींनीं ॥९॥ आतां परिसा षष्ठ आश्रम । स्वामी सद्गुरु वामनाश्रम । असती जे सद्गुणग्राम । त्यांची महिमा सांगूं पैं ॥१०॥ दया - क्षमा - शांति अंगीं । असुनी, असती परम विरागी । निजात्मसुखभोक्ते योगी । निष्कपट प्रेमळ कनवाळू ॥११॥ आपुलें चित्त सारा दिवस । घालिती परमार्थी विशेष । मठाच्या व्यवहारीं न देती लक्ष । कासया आम्हांसी म्हणोनि ॥१२॥ शुक्लभट्ट यांच्या कुळींचा । मणेगार होता मठाचा । त्याकडेच अधिकार साचा । सोपविला स्वामींनी त्या काळीं ॥१३॥ ऐसे लोटतां कांहीं दिन । खर्च अधिकचि मठालागून । झाला ऐसें लोकांनीं जाणून । उद्विन जाहले ते बहु ॥१४॥ मग सकल भक्त मिळोनि । मणेगारासी पाचारूनि । पुसते झाले त्यालागोनि । दाखवा आम्हांसी जमाखर्च ॥१५॥ तेव्हां दावाया जमाखर्च । कबूल न होय मणेगार साच । बैसला स्वस्थ अनिर्वाच्य । स्थिती झाली तयाची ॥१६॥ ऐसें व्हावया काय कारण । मंदमति असे तो पूर्ण । यावीण नसे आणिक दुर्गुण । खचितचि जाणा निर्धारें ॥ १७ ॥ जमाखर्च व्यवस्थित । ठेवितां दोष न येई त्याप्रत । परी जे कोणी दुर्लक्ष करीत । शब्द ठेविती त्यांवरी ॥१८॥ असो यापरी भक्तजनांसी । विपरीत वाटलें त्याच्याविषीं । तेव्हां विचार केला आपापसीं । शिष्य - स्वीकार करवावा ॥९॥ आणि त्या शिष्याकडे सर्व । मठाचें आधिपत्य आणि देवघेव । अर्पावी, ऐसा करोनि ठराव । लागले ते शिष्य शोधाया ॥२०॥ वामनाश्रम - सद्गुरुस्वामी । न देती लक्ष मठाच्या कामीं । म्हणोनि सकलांनीं अंतर्यामीं । योजुनी विचार केला हा ॥२१॥ आणि केली प्रार्थना तेव्हां । म्हणती शिष्य-स्वीकार करावा देवा । इतुझ्यामाजीं गेले गांवा । मंगळूर - ग्रामीं श्रीस्वामी ॥२२॥ कांहीं दिन राहुनी तेथ । जनांसी बोधुनी तोषविलें बहुत । मग निघाले तेथूनि शांत । सद्गुरु माउली ती पाहीं ॥२३॥ परिवारसहित विठ्ठल - ग्रामीं । 'अनंतेश्वर' ऐशा नामीं । देउळीं उत्तरले सद्गुरुस्वामी । भक्तोद्धारालागीं पैं ॥२४॥ परिवारासंगें आला एक । मंगळूराहुनी परम सुरेख । मुलगा उत्तमलक्षणी देख । तेज विलसे मुखावरी ॥२५॥ तो कोण कुठील मुलगा । हें सांगूं तुम्हां आतांचि गा । नका करूं श्रोते हो दंगा । तुम्ही प्रेममदानें ॥२६॥ सांगतों आतां ऐका प्रेमळ । वृत्तांत मुलाचा तो सकळ । ऐकतां मन होईल निर्मळ । भाविक भक्तजनांचें ॥२७॥मंगळूर - ग्रामीं होता एक । सारस्वत चिटणीस देख । परम सद्गुणी आणि भाविक । नाम तयाचें 'देवप्पय्या' ॥२८॥ त्याच्या गृहीं 'परमेश्वर' । या नामें एक परम सुंदर । भाविक सुलक्षणी चतुर । गरीब मुलगा होता पैं ।॥२९॥ तो एक नगरकुळींचा । गरीब बिचारा होता साचा । राहिला चिटणीस देवप्पय्याच्या । गृहीं चाकरी करीत ॥३०॥ ऐसें असतां एके दिनीं । देवप्पय्या यांच्या सदनीं । आला मलबार देशाहुनी । प्रख्यात एक ज्योतिषी ॥ ३१॥ तया समयीं परमेश्वर । याजकडोनि देवप्पय्या थोर । पाय आवळोनि घेतां, सत्वर । देखिलें ज्योतिषी यानें पैं ॥३२॥ पाहिलें त्यासी न्याहाळुनी । भविष्य जाणिलें अंतःकरणीं । तेव्हां बोले मधुर वचनीं । देवप्पय्यालागीं तो ॥३३॥ अहो तुम्ही ऐका वचन । ह्या सुलक्षणी मुलाकडोन । सेवा करवूं नका हीन । काय कारण सांगूं तें ॥३४॥ याच्या मुखावरी खास । राजचिन्हें दिसती विशेष । म्हणोनि सन्मान द्यावा यास । ऐसें वाटतें मजलागीं ॥३५॥ ऐकतां ज्योतिष्याचें उत्तर । देवप्पय्याचें कळवळलें अंतर । म्हणे म्यां अपराध केला थोर । अज्ञानपणें ऐसा हा ॥३६॥ मग त्यानें परमेश्वरासी । ठेवुनी घेतलें सन्मानेंसीं । ही कथा अद्भुत परियेसीं । पुढें समजेल सकलांतें ॥३७॥ ऐसा तो मुलगा परमेश्वर । सद्गुरुपरिवारासमेत सत्वर । येऊनि राहिला देउळामाझार । शांत सद्गुणी सुंदर तो ॥३८॥ तेव्हां तेथील अर्चक थोर । परमभाविक आणि चतुर । श्रीस्वामी - मठाचा भक्त साचार । होता ते वेळीं त्या स्थानीं ॥३९॥ त्या मुलाची मुखचर्या । अति सुलक्षण पाहूनियां । म्हणे मानसीं स्वामींच्या ठाया । योग्य होईल हें पात्र ॥४०॥ ऐसा विचार करोनि मानसीं । बोलिला भक्तवृंदांपाशीं । हें पात्र योग्य होय मठासी । पुढील स्वामी कराया ॥४१॥ याच्या मुखावरील बघतां लक्षण । ब्रह्मज्ञान हा पावेल पूर्ण । म्हणोनि आमुच्या मठाकारण । हेंचि पात्र योग्य असे ॥४२॥ ऐसें बोलतां पुजारी जाण । सर्वांसी आनंद जाहला पूर्ण । वार्ता पसरली न लागतां क्षण । देशोदेशी तेधवां ॥४३॥ तैसीच देवप्पय्यासी जाण । ज्योतिष्यें सांगितली होती खूण । ऐशा या दोन्ही वार्ता मिळोन । पसरल्या सारस्वतवृंदांत ॥४४॥ इकडे सद्गुरुस्वामी शिरालींत । माघारे आले स्वमठांत । गुंग होऊनि स्वस्वरूपांत । नित्यापरी राहिले ॥४५॥ तेव्हां करूनि सकलांनी विचार । मुलासी आणोनि स्वामींसमोर । उभें करोनियां, थोर । प्रार्थना करिती प्रेमानें ॥४६॥ स्वामी सद्गुरो प्रभो देवा । शिष्य - स्वीकार आतां करावा । योग्य सुलक्षणी चतुर बरवा । उत्तम कुळींचा हा असे ॥४७॥ ऐसें बोलूनि सर्व कथा । त्या मुलाची सांगितली वार्ता । सद्गुरु म्हणती अवश्य आतां । करूं शिष्य-स्वीकार पैं ॥४८॥ मग करोनि सकल सिद्धता । शिष्य - स्वीकार करोनि भक्तां । तोषविलें जनांसी समस्तां । कनवाळू सद्गुरु - माउलीनें ॥४९॥ खचितचि असे सद्गुरुमाय । कनवाळू, यामाजीं नाहीं संशय । केवल जनहितार्थचि होय । जिणें त्यांचें निश्र्चयेंसी ॥५०॥हें कैसें तें सांगूं आतां । श्रोते हो दृढ करोनि चित्ता । परिसा तुम्ही तत्त्वतां । परम प्रीतीनें भाविक हो ॥५१॥जरी मजसी नाहीं प्रेम । तरी आपुल्या प्रेमें होईल काम । म्हणोनि लागलों घेऊनी गुरुनाम । ग्रंथकार्यालागीं पैं ॥५२॥ साधूंचा जन्म तो खचित । भक्तजनांच्या दैवेंच असत । म्हणोनि त्यांच्या उद्धारार्थ । देह झिजविती परोपरी ते ॥५३॥ संन्यासधर्म महाकठिण । परी घेती जनांकारण । ते तरी अवतारिकचि पूर्ण - । ज्ञानी परम असती पैं ॥५४॥ त्यांसी कासया संन्यासग्रहण । ते जीवन्मुक्तचि असती जाण । परि करावया जनांचे कल्याण । सकल कार्य करिती पैं ॥५५॥ संन्यास घेतां कष्ट बहुत । हें असे सकलांसी विदित । ऐसें असतांही संन्यास घेत । बाळपणींच तोही पैं ॥५६॥ पहा कैसें तें सांगतों ऐका । आजवरी आमुच्या मठांतरीं देखा । स्वामीं जाइले ते निका । बालपणींच संन्यासी ॥५७॥ वय लहान जरी होय । तरीही प्रवृत्त होती निर्भय । संन्यास घ्यावयालागीं सदय । बहुत आश्चर्य हें पाहीं ॥५८॥ बहुत कासया बोलावें आतां । सहजचि कळेल विचार करितां । जनांची प्रीति विषयीं तत्त्वतां । बंधन कवणासी नावडे हो ॥५९॥ त्यांतही बालकांलागीं देखा । विषयचि गोड वाटे सारिखा । अणुमात्र बंधन न सोसवे ऐका । कैसें तें सांगतों आतांचि ॥६०॥ ग्रहणादि नैमित्तिक दिवशीं । ग्रहण लागे तों खाती निश्चयेंसीं । बालबुद्धि म्हणोनि त्यांसीं । न आवरे मन तयांचें ॥६१॥ तैसेंचि जाणा नानापरी । विषयींच प्रीति त्यांची सारी । हें सांगावें नलगे, जाणतां अंतरीं । तुम्ही सकल श्रोते हो ॥६२॥ ऐसीं हीं तरुण बाळें । कैशीं संन्यास घेती निजबळें । निग्रहशक्ति कैशी ते वेळे । येते त्यांच्या अंगीं पैं ॥६३॥ यावरोनि ओळखावें आपण । कीं आमुच्या मठाचे स्वामी जाण । केवळ निजभक्तांकारण । घेती संन्यास आवडीनें ॥६४॥ यावरी येईल थोर प्रश्न । बालवयांतचि जनांचे रक्षण । करावें ऐसें त्यांसी कोठून । उपजे ज्ञान इतुकें हें ॥६५॥ तरी ऐका याचें उत्तर। स्वामी सद्गुरु जे नव्हती नर । साक्षात् परमेश्वराचा अवतार । जगदोद्धाराकारणें ॥६६॥ म्हणोनि श्रीसद्गुरुस्वामी । जगाच्या कल्याणा शिराली - ग्रामीं । संन्यास घेउनी राहती नेहमीं । बंधन सोसुनी सकलही ॥६७॥ पुनःपुन्हां नको उलगडा । दुजा त्रास ना संन्यासाएवढा । आमुच्यासाठींच ऐसा खोडा । अडकवूनि घेतला मठाचा ॥६८॥ मठाचा खोडा कैसा येविषीं । मागें सांगितले तुम्हांसी । पुढेंही विवरण करूं परियेसीं । सद्गुरुकृपेंचि जाणा हो ॥६९॥ असो ऐसा सद्गुरु दयाळ । तोचि जनांसी उद्धरील । ऐसा निश्रय धरोनि निश्र्चल । धरावे चरण त्याचेचि ॥७०॥ त्यांचा बोध धरावा मानसीं । तरीच उदार होईल येविषीं । संशय नाहीं सांगतों तुम्हांसी । ऐका चित्त देऊनियां ॥७१॥ जें कार्य जयापाशीं । जातां होय आपुलें परियेसीं । त्याकडेचि जावें निश्र्चयेंसीं । तेव्हांच साधेल कार्य तें ॥७२॥ ज्यासी कळे अमुक विद्या । तोचि दुज्यांसी शिकवी सदा । त्याच्याचि लागतां फंदा । कळेल आपणासी ती पाहीं ॥७३॥ तैसें येथें स्वामी गुरुवर । ब्रह्मविद्या जाणे समग्र । म्हणोनि त्यासीच जावें शीघ्र । शरण आपण अज्ञजनें ॥७४॥ तोचि आमुचा हितचिंतक । त्याहुनी जगीं कुणीही आणिक । नसे निश्र्चयें हितेच्छु देख । पुढील अध्यायीं तें सांगूं ॥७५॥असो परिसा वामनाश्रम । स्वामी सद्गुरु गुणग्राम । पुरविते झाले भक्तकाम । शिष्य - स्वीकार करोनियां ॥७६॥ शके सत्राशें सत्तावन । मन्मथ संवत्सर फाल्गुन । वद्य दशमी दिवशीं जाण । केला शिष्य-स्वीकार पैं ॥७७॥ ‘कृष्णाश्रम' नामाभिधान । देते जाहले शिष्यासी आपण । पुष्पवृष्टि करिती वरून । सुरवर परम आनंदें ॥७८॥ जयजयकार करिती नर । टाळ्या पिटितीर वारंवार । थै थै नाचती प्रेमपुरःसर । मनामाजीं उल्हासें ॥७९॥ नानापरी करोनि उत्सव । समाधान पावती सर्व । ठेविती गुरुचरणीं दृढभाव । नरनारी भाविक जे ॥८०॥ पुढील अध्यायीं कथा रसाळ । वामनाश्रम यांचे प्रेमळ । वर्तन जन्मवरी समूळ । हेंचि वर्णन करूं सारें ॥८१॥ आणिक समाधि घेती सघन । तेव्हां कांहीं चमत्कार दावून । करिती जनाचें अंतःकरण । सद्गुरुचरणीं दृढतर ते ॥८२॥ आनंदाश्रम - परमहंस । शिवानंदतीर्थ महेश । यांच्या कृपाप्रसादें द्वाविंश । अध्याय गुरुदासें संपविला ॥८३॥ स्वस्ति श्रीचित्रापुर - । गुरुपरंपराचरित्र सुंदर । ऐकतां होय निर्भय थोर । द्वाविंशाध्याय रसाळ हा ॥८४॥ अध्याय २२ ॥ ओंव्या ८४ ॥ॐ ॥ तत्सत्- श्रीसद्गुरुनाथचरणारविंदार्पणमस्तु ॥ ॥छ॥ ॥छ॥॥ इति द्वाविंशोऽध्यायः समाप्तः ॥ N/A References : N/A Last Updated : January 19, 2024 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP