मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|श्रीचित्रापुरगुरुपरंपराचरित्र| अध्याय ॥१५॥ श्रीचित्रापुरगुरुपरंपराचरित्र ग्रंथानुक्रम विषयानुक्रमणिका कृताञ्जलिः प्रस्तावना सारस्वतांचें मूळ श्रीगुरुपरम्परा अध्याय ॥१॥ अध्याय ॥२॥ अध्याय ॥३॥ अध्याय ॥४॥ अध्याय ॥५॥ अध्याय ॥६॥ अध्याय ॥७॥ अध्याय ॥८॥ अध्याय ॥९॥ अध्याय ॥१०॥ अध्याय ॥११॥ अध्याय ॥१२॥ अध्याय ॥१३॥ अध्याय ॥१४॥ अध्याय ॥१५॥ अध्याय ॥१६॥ अध्याय ॥१७॥ अध्याय ॥१८॥ अध्याय ॥१९॥ अध्याय ॥२०॥ अध्याय ॥२१॥ अध्याय ॥२२॥ अध्याय ॥२३॥ अध्याय ॥२४॥ अध्याय ॥२५॥ अध्याय ॥२६॥ अध्याय ॥२७॥ अध्याय ॥२८॥ अध्याय ॥२९॥ अध्याय ॥३०॥ अध्याय ॥३१॥ अध्याय ॥३२॥ अध्याय ॥३३॥ अध्याय ॥३४॥ अध्याय ॥३५॥ अध्याय ॥३६॥ अध्याय ॥३७॥ अध्याय ॥३८॥ अध्याय ॥३९॥ अध्याय ॥४०॥ अध्याय ॥४१॥ अध्याय ॥४२॥ अध्याय ॥४३॥ अध्याय ॥४४॥ अध्याय ॥४५॥ अध्याय ॥४६॥ अध्याय ॥४७॥ अध्याय ॥४८॥ अध्याय ॥४९॥ अध्याय ॥५०॥ अध्याय ॥५१॥ अध्याय ॥५२॥ अध्याय ॥५३॥ अध्याय ॥५४॥ अध्याय ॥५५॥ अध्याय ॥५६॥ अध्याय ॥५७॥ अध्याय ॥५८॥ अध्याय ॥५९॥ अध्याय ॥६०॥ अध्याय ॥६१॥ अध्याय ॥६२॥ अध्याय ॥६३॥ आरती श्री सद्गुरुंची मंगल पद चित्रारपुरगुरुपरम्परावन्दनम् श्रीशंकरनारायणगीतम् शरणाष्टकम् आरती श्रीगुरुपरंपरेची श्रीमत् पांडुरंगाश्रम स्वामींजी आरती सद्गुरुंची आरती चित्रापुरगुरुपरंपरा - अध्याय ॥१५॥ सुबोधाचा भाग तर अमोल आहे. तशीच प्रश्नोत्तरी ही ह्या गुरुचरित्राचें अपूर्व वैशिष्ट्य होय. Tags : chitrapurpothiचित्रापुरगुरुपरंपरापोथी अध्याय ॥१५॥ Translation - भाषांतर ॥ श्रीगणेशाय नमः ॥ श्रीसरस्वत्यै नमः ॥ श्रीशंकराश्रमस्वामीगुरुभ्यो नमः ॥ श्रीभवानीशंकराय नमः ॥ॐ॥ जय जय चतुर्थ शंकराश्रमा । बालक नेणे तुझी महिमा । परी तूंचि दाखवीं आम्हां । अज्ञजनांसी तव लीला ॥१॥ न कळे मज ब्रह्मज्ञान । नाहीं माझ्या अंगीं सद्गुण । नसे भक्ति प्रेम जाण । ऐसा दुर्गुणी मी पाहीं ॥२॥ अंगीं नाहींत साधनें चार । ऐसा मी खरा पामर । त्वांचि रक्षावा निजकिंकर । हेंचि मागतों चरणीं या ॥३॥ तुझा एक दुर्बल दास । हीन दीन भजनीं आळस । म्हणोनि माते तूंचि खास । देईं उल्हास मजलागीं ॥४॥ देईं मजला सद्गुरुनाथा । चतुर्थ भक्ति 'पादसेवन' आतां । हेचि प्रार्थना त्यावीण सर्वथा । न मागेंचि तुजपाशीं ॥५॥ आतां परिसा सावधान । शंकराश्रम यांचे सगुण । ऐकतां होती पापें दहन । अगणित पुण्य ये अंगीं ॥६॥ मागील अध्यायीं निरूपण । परिज्ञानाश्रम स्वामी चिद्धन । शिष्य करुनी झाले आपण । समाधिस्थ कांहीं दिवसांनीं ॥७॥ आतां सद्गुरु चतुर्थाश्रम । ऐका यांचे सद्गुण परम । उत्कृष्ट असूनि जनांसी सुगम । दाविला मार्ग युक्तीनें ॥८॥ ऐसे ते सद्गुरु शंकराश्रम । करिती जनांवरी बहुत प्रेम । सांगती आपुला उत्तम धर्म । अति निर्लोभें ते पाहीं ॥९॥ परम विद्वान महायोगी । झाले क्षण न लागतां विरागी । सदा निजात्मसुखासी भोगी । काय वानूं महिमा ती ॥१०॥ अंतःकरण तयांचें बहुत शांत । प्रवचन देतां परम अद्भुत । वाक्पटुता असे ती अमित । सुलभ युक्तीनें सांगती ॥११॥ येई संनिधीं भक्तवृंद । सकाम निष्काम भजती द्विविध । कामिकां देती फल समृद्ध । निष्कामा देती मोक्षासी ॥१२॥ कित्येक येउनी प्रार्थना करिती । कष्ट कैसे आमुचे जाती । तयांसी आशीर्वचना देती । 'कल्याण होईल तुमचें' पैं ॥१३॥ भवानीशंकर असे समर्थ । भजा प्रेम धरोनि त्याप्रत । तोचि तुमचे कष्ट निवारीत । धांवत येउनी क्षणमात्रें ॥१४॥ ऐसें येतां मुखांतुनी । सत्यचि होय त्यांची वाणी । मनुष्य न मानी त्यांसी कोणी । साक्षात् दत्तात्रेय अवतार ते ॥१५॥ खचित असती दत्तावतार । ऐसें बोलती नारीनर । म्हणती आमुचें भाग्य थोर । म्हणोनि लाभले चरण हे ॥१६॥ यापरी नानाविध भजती जन । कवणाचेंही न दुखविती मन । ज्याचें जैसें होय समाधान । युक्तीनें बोधुनी करिती पैं ॥१७॥ गरीब अथवा श्रीमंत । कुणीही येवो सद्भक्त । प्रेमें भाषण करिती त्यांप्रत । कळवळोनि अंतरीं ॥१८॥ बघतां मूर्ति परम सुंदर । विलसे ब्रह्मतेज मुखावर देव तळमळती स्वर्गीं फार । म्हणती भूवरीचे धन्य जन ॥१९॥ असो आतां ऐसें असतां । स्वामींचे चित्त सदा परमार्था । न करी अणुमात्र देहाची ममता । करिती दुर्लक्ष अतितर ते ॥२०॥ म्हणोनि होय देह अशक्त । वरचेवरी तयांसी व्याधि होत । यास्तव वेगेंचि जन समस्त । प्रार्थना करिती ती ऐका ॥२१॥ प्रभो देवा सद्गुरुराया । शिष्य - स्वीकार करावा सदया । अवश्य म्हणती बघुनी हृदया । भक्तजनांच्या तेधवां ॥२२॥ तेव्हां प्रमुख जन लागती । शोधावया योग्य व्यक्ति । न मिळे योग्य शुक्लभट्ट त्यांप्रति । म्हणोनि बघती दुज्या कुळीं ॥२३॥ कंडलूर कुळींचा एक । सांप्रत त्या कुळासी लोक । 'तलगेरी' ऐसें बोलती देख । निवडिला मुलगा उत्कृष्ट ॥२४॥ केली मागणी त्यांपाशीं । माघ शुद्ध दशमी दिवशीं । प्लवसंवत्सर शके सत्राशें तीन । केला स्वीकार गुरुरायें ॥२५॥ 'केशवाश्रम' नामाभिधान । देउनी केला उपदेश जाण । शंकराश्रमें शिष्यालागुन । परम प्रेमानें त्याकाळीं ॥२६॥ असो सद्गुरु शंकराश्रम । असती परिपक्व आत्माराम । तपःसामर्थ्य असे परम । चमत्कार घडती त्यायोगें ॥२७॥ यावरी एक कथा अद्भुत । सांगूं इकडे लावा चित्त । ऐकतां द्रवेल प्रेमळ भक्त । इतुकी सुंदर कथा ती ॥२८॥ हे श्रीसद्गुरु शंकराश्रम । करितां पारमार्थिक नेम । करिती दुर्लक्ष देहाचें परम । हें कथिलें आहे आधींच ॥२९॥ ऐसें दुर्लक्ष करितां परियेसीं । हिंवताप लागे शरीरासी । तेव्हां कथा झाली ती कैसी । कथितों आतां श्रोते हो ॥३०॥ थंडी वाजे बहुवमी । ज्वर येई सदा स्वामींसी । अनुष्ठाना बैसतां देहासी । हाल होती बहुतचि ॥३१॥ अनुष्ठाना बैसतां थंडी येत । तेव्हां ते करिती काय त्वरित । निजदंडावरी खचित । ज्वर आवाहन करिती ते ॥३२॥ जेव्हां संपे अनुष्ठान । तेव्हां दंडावरीचा ज्वर जाण । अंगावरी परत घेती आपण । ऐशी शक्ति तयांची ॥३३॥ ऐसें असतां एके दिनीं । अनुष्ठान समयीं थंडी भरोनी । आली अतिशय तेव्हां स्वामींनीं । झांकिली उपरणी दंडावरी ॥३४॥ ज्वरावाहन करिती दंडीं । तेव्हां वाजे दंडास थंडी । थरथरां कांपे दंड तांतडी । पाहिले तेव्हां एकानें ॥३५॥ जेव्हां संपलें अनुष्ठान । तेव्हां स्वामी परतुनी आपण । ज्वर अंगीं घेती पूर्ण । पाहुनी विस्मित झाला तो ॥३६॥ मग येतां सद्गुरु बाहेरी । भेटला तो गृहस्थ सत्वरी । भीत भीत तो निजअंतरीं । बोले संनिधीं तें ऐका ॥३७॥ म्हणे देवा कृपाघना । एक प्रश्न येतो मन्मना । तेव्हां बोले सद्गुरुराणा । ना भीं बोल झडकरी ॥३८॥ यावरी बोले तो गृहस्थ । पाहिला चमत्कार संनिधींत । दंड थरथरां कांपे तेथ । अनुष्ठान संपे तोंवरी ॥३९॥ जेव्हां तयावरील उपरणी । घेतली आपण काढोनी । तेव्हां थांबे काय ही करणी । न कळे देवा तव लीला ॥४०॥ मुख पाहतां ज्वर बहुत । आला ऐसें आपुल्यासी दिसत । कृपा करोनि मजप्रत । काय चमत्कार तो सांगावा ॥४१॥ यावरी बोलती हास्यवदन । शंकराश्रम - स्वामी कृपाघन । काय असे ती तुजला खूण । सांगतों ऐक एकाग्र ॥४२॥ आम्हांसी जो येतो ज्वर । तो आवाहन या दंडावर । करितों अनुष्ठान - समयीं साचार । संपलिया घेतों पुनरपि ॥४३॥ यावरी बोले तो गृहस्थ । इतुकें जरी आपुल्याप्रत । समजे तरी कां ना ठेवीत । दंडावरीच सर्वदा ॥४४॥ तेव्हां बोलती सद्गुरुनाथ । सांगतों कासया तें तुजप्रत । परी येथे लागीं चित्त । चंचल होऊं नेदीं बा ॥४५॥ प्रारब्ध हें कवणाही न सुटे । जरी झाले ज्ञानी मोठे । तयांसीही नाना संकटें । येती प्रारब्धें पाहीं बा ॥४६॥ कर्में असती विविध । संचित क्रियमाण-प्रारब्ध । क्रियमाण आणि संचित दग्ध । होय सारें ज्ञात्याचें ॥४७॥ परी प्रारब्ध ज्ञात्यालागीं । चुकेना कल्पांतींही जगीं । ज्याचें प्रारब्ध तोचि भोगी । न वचे अन्यासी तो भोग ॥४८॥सुख अथवा दुःख । जें जें येईल आपुल्या सन्मुख । तें तें भोगावें तेव्हांचि देख । अकर्ता अभोक्ता समजोनि ॥४९॥ जो मानी आपणासी कर्ता । तोचि भोगी सुखदुःख तत्त्वता । ज्ञानियासी तयाची वार्ता । नकळे साक्षित्वामुळे पैं ॥५०॥ जें येई भोगावयासी । तें भोगुनी सारावें येचि जन्मासी । आतां जें सांगितलें तुजसी । घरीं मानसीं विवेक हा ॥५१॥ जरी नकळे ज्ञानाज्ञान । तरी अंतरी धरीं वचन । इतुकेंचि बापा तूं जाण । सांगतों आतां अवधारी ॥५२॥ सुख आणि दुःख सकळिक । यामाजीं बघावा श्रीहरी एक । त्यावीण नाहीं आणिक । तोचि भरला सर्वत्र ॥५३॥ जैसें प्रारब्ध उदया येई । तैसे भोग मिळतील पाहीं । आपण अलिप्त राहुनी सर्वही । बघावी लीला देवाची ॥५४॥ आतां म्हणसी ब्रह्मज्ञान । न होतां इतकी योग्यता कोठून । येईल कैसी मजलागोन । तरी ऐक बापा उत्तर ॥५५॥ नलगे तयासी ब्रह्मज्ञान । असावा एक दृढभाव पूर्ण । मग होईल सहजचि जाण । ब्रह्मज्ञान तें पाहीं ॥५६॥ प्रथम करावी निष्काम भक्ति । येईल तेव्हां सहज विरक्ति । जें जें दिसे भासे जगतीं । तें तें अर्पावें देवासी ॥५७॥ 'अर्पावें' म्हणजे उचलुनी द्यावें । ऐसा त्याचा भाव नव्हे । देवा तुझें त्वांचि घ्यावें । म्हणावें नाहीं माझें हें ॥५८॥ हें जगत् सर्व तुझेंचि । येथें धरावी ममता कैंची । सर्व रूपें नटसी तूंचि । नाहीं अन्य वस्तु पैं ॥५९॥ तेव्हां तुजला काय अर्पण । करावें कवणासी कोणतें कोण । देता घेता तूंचि सघन । वृथाचि अहंता धरणें ही ॥६०॥ अहंता ममता त्यागितां सर्व । मग कैंचे सुखदुःखभाव। ज्यासी 'मी माझें’ त्यास सदैव । बाधे सुखदुःख तेंपाहीं ॥६१॥ ‘अहंता-ममता' याचा अर्थ । 'मी - माझें ऐसा होत । एवं तेणेंच सुखदुःख बाधत । कैसें तें सांगूं आतांचि ॥६२॥ असे एक थोराचें मदन । तेथें येती बाळे दोन । आपुल्या मातेसंगें जाण । फिरावयास सहजचि ॥६३॥ मुलांची खेळणीं परम सुंदर । असती त्या गृहाभीतर । तयांसाठीं तंटा थोर । उपजला त्या बाळांमाजीं ॥६४॥ एक बाळ म्हणे हें माझें । दुजा बोले नव्हे तुझें । माझेंचि सारें मज पाहिजे । म्हणोनि भांडती दोघेही ॥६५॥ एकानें घेतां एकास दुःख । ज्यानें घेतलें त्यासी होय सुख । दुजा रडे स्फुंदस्फुंदोनि देख । माझें घेतलें म्हणोनि ॥६६॥ दुःख व्हावया तयालागोन । ‘मी व माझें’ हेंचि कारण । माझी वस्तु ऐसें समजोन । म्हणे माझेंचि हें पाहीं ॥६७॥ म्हणोनि पाहे करी तो दुःख । माझें घेतले म्हणोनि देख । इतुक्यासी कारण काय तें ऐक । अज्ञ बाळें म्हणोनि ॥६८॥ इतुक्यामाजीं आली माता । म्हणे भांडूं नका आतां । दोघांचेही नव्हे तत्त्वतां । येथील मुलांचें तें जाणा ॥६९॥ वृथाचि तुम्ही तंटा करितां । येईल मालक त्याचा आतां । रडूं नका तुम्ही सर्वथा । न मिळे तुम्हांलागीं तें ॥७०॥ ऐसें नानापरी समजावोनि । घेऊनि गेली आपुल्या सदनीं । मग विसरले बाळ ते झणीं । सुखदुःख तें सर्वही ॥७१॥ तद्वत् आम्ही येथे मानव । बालकांपरी अज्ञ सर्व । विषय माझे म्हणोनि गर्व । धरोनि दुःख भोगितों ॥७२॥ येथें असे जगाचा मालक । प्रभु परमेश्वरचि एक । तेव्हां येथील विषय सकळिक । कैसे माझे होतील ते ॥७३॥ सकल विषय देवाचे देख । मी नसें त्यांचा मालक । म्हणोनि मजला त्यांचा हक्क । नसे खचित निर्धारें ॥७४॥ वृथाचि 'मी माझें' ऐसें । अभिमान वाहुनी घेत असें । तेव्हां सुखदुःख आपैसें । होय तयासि निर्धारें ॥७५॥ एवं 'मी माझें’ हेंचि जाण । सुखदुःखांसी मूळ कारण । याचा विचार करितां पूर्ण । समजेल सारें त्या पाहीं ॥७६॥देवचि या जगाचा मालक । नसे माझा कशावरीही हक्क । ऐसें भावितां सहजचि देख। कैंचें सुखदुःख बाधे त्या ॥७७॥ जैसा बाळ थोडा होतां थोर । समजे त्यासी आपपर । तेव्हां तो दृष्टि न फिरवी त्यावर । होय उदास सहजचि ॥७८॥ जरी वस्तूचा मालक बाळ । देई खेळाया थोडा वेळ । तरीच बाळ खेळेल । किंचित् वेळ घेवोनि ॥७९॥ तद्वत् जो करी भक्ति देवावरी । त्यासी विवेक उपजे अंतरीं । तेव्हां सन्मुख विषय दिसती जरी । तरी न बघे तो त्यांकडे ॥८०॥जें दिलें देवें त्यासी । तेंचि सेवुनी तृप्त मानसीं । केवळ देह रक्षावयासी । भोजनादि विषय तो भोगी ॥८१॥ एवं जरी नाहीं आत्मज्ञान । तरी इतुकेंचि पुरे तुजलागोन । श्रीहरीचे आठवीं चरण । दृढभाव धरोनि ॥८२॥ आणि कथिल्यापरी करीं अर्पण । सकलही विषय त्यालागोन । ऐसें करितां गुरुकृपा पूर्ण । होऊनि ज्ञान दृढावे ॥८३॥ परी न सुटे त्यासी प्रारब्ध । म्हणोनि न करावे प्रयत्न बहुविध । भोगुनीच सारावें समृद्ध । सुखदुःख तें पाहीं बा ॥८४॥ आणिक ईश - सृष्टीवरी सर्व । आपण न दावावी आपुली थोरीव । जैसें ठेवील आपुल्यासी देव । तैसेंचि रहावें आनंदें ॥८५॥ त्याचि कारणें ज्वर आमुचा । सदा दंडावरी न ठेवीं साचा । नको आम्हां मानवांचा । ईश्वरासन्मुख चमत्कार ॥८६॥ परी करावया अनुष्ठान । तितुकेंचि कार्य केलें जाण । तुवां जो कां केला प्रश्न । दिधलें उत्तर तुजलागीं ॥८७॥ पहा साधु कैसे असती । आपुली न करिती प्रख्याती । देव गुरूपुढें लघुत्व घेती । नाहीं अभिमान तयांसी ॥८८॥ असो तेव्हां तो गुरुभक्त । करी साष्टांग दंडवत । म्हणे देवा त्वांचि मजप्रत । कृपा करोनि उद्धरावें ॥८९॥ ऐसें नानापरी विनवूनि तेव्हां । घेतला उपदेश धरोनि भावा । करितां निष्काम मनें सेवा । झाला उद्धार तयाचा ॥९०॥ जे धरिती दृढभाव । तयांसी प्रसन्न श्रीगुरुदेव । तेव्हां फिटोनि अहंभाव । होय ज्ञान त्यालागीं ॥९१॥ सद्गुरु म्हणजे नव्हे मनुष्य । असे तयांची महिमा विशेष । सांगती जनांसी बोध सुरस । पुढील अध्यायीं सांगूं तो ॥९२॥ आनंदाश्रम-परमहंस । श्रीशिवानंदतीर्थ एकरूप खास । यांचिया कृपाप्रसादें पंचदश । अध्याय गुरुदासें संपविला ॥९३॥ स्वस्ति श्रीचित्रापुर । गुरुपरंपराचरित्र सुंदर । ऐकतां पापें जळती समग्र । पंचदशाध्याय रसाळ हा ॥९४॥ अध्याय १५ ॥ ओंव्या ९४ ॥ ॐ तत्सत् - श्री सद्गुरुनाथचरणारविंदार्पणमस्तु ॥ ॥ इति पंचदशोऽध्यायः समाप्तः ॥ N/A References : N/A Last Updated : January 19, 2024 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP