मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|भजन|श्रीदत्त भजन गाथा|सप्ताह-अनुष्ठान| वाल्मीकि चरित सप्ताह-अनुष्ठान विषय जिव्हाळ्याचा देव भक्ताची लाज राखण्याबद्दल विनंती "दक्ष मी राहिलो तूझीये कार्यात" सप्ताहसिध्यर्थ याचना भक्तकीर्तिसाठी याचना भक्तकीर्तिने देवयशाचा विस्तार देव मज करा अतुल्य सामर्थ्यासाठी प्रार्थना देव मज करा संकटाचे नाशासाठी प्रार्थना विनायकाठायी दत्तसंचार धर्मग्लानि धर्मविस्तारार्थ प्रार्थना व्हावे रामराज्य भक्तिभाव उपजविण्यासाठी प्रार्थना निराशेचे बोल दत्ताधीनता कृतज्ञतावचन प्रसादग्रहणार्थ आज्ञायाचना क्षमायाचना पूर्वचरितकथन व क्षमायाचना अहंताविष अहित दलनासाठी प्रार्थना अनुष्ठानपूर्तिसाठी प्रार्थना देवावीण गति । नाही आम्हां प्रति ईश्वराच्या अर्तक्य लीला सुदामकथा भ्याडपणे भरे अज्ञानाने अज्ञानाने ईश्वरावर दोषारोप प्रभुवात्सल्यवर्णन व क्षमायाचना ’समस्तांची लज्जा त्यजुनि भगवच्चिंतन करी’ नाममंत्र व त्याचा प्रभाव वाल्मीकि चरित चित्तस्थैर्यासाठी प्रार्थना श्रीपाद पुण्यतिथी व सप्ताह समाप्ति सप्ताह अनुष्ठान - वाल्मीकि चरित श्रीयुत विनायक वासुदेव साठे यांनी रचलेली श्रीदत्त भजन गाथा. Tags : bhajandattaदत्तभजन वाल्मीकि चरित Translation - भाषांतर दृष्टांतासी घ्यावे वाल्मीकि चरित । दिसेल उद्धृ त नामयश ॥१॥पहिला वाटमार्या जाळपोळ करी । जीवाते संहारी द्रव्यासाठी ॥२॥द्रव्य हा ईश्वर द्रव्य हाच मोक्ष । हाच श्रुति पक्ष मानी वाल्या ॥३॥कांहीही करोनी धन मेळवावे । कांही न पहावे तारतम्य ॥४॥पापपुण्य क्षिती मुळी न बाळगावी । धने सांठवावी प्रयत्नाने ॥५॥हाच रोग त्यासी जडला दुर्धर । नयन विकार थोर झाला ॥६॥देह मन बुद्धि रोगत्रस्त झाली । अंतरी जडली थोर व्याधि ॥७॥ऐसा नासला तो रोगाने पामर । पाप अनिवार करीतसे ॥८॥किती जीव हिंसा तयास घडली । मिती नाही भली म्हणताती ॥९॥ऐसा रोग रुप होवो निवर्तत । अपथ्य सेवीत धन लोभ ॥१०॥धनाचीच तृष्णा धनाचीच क्षुधा । त्यासी होत बाधा धनाचीच ॥११॥कांही केल्या तृप्ती पावेना अंतर । करिन संहार अधिकचि ॥१२॥विनायक म्हणे रोगरुप झाला । परि न कळे त्याला भ्रांति पडे ॥१३॥==वाल्मीकिचरिततयालागी वैद्य भेटला अतुल । परम दयाळ कारुणिक ॥१॥नारद महर्षि तयामागे जाती । सांपडती हातीं वालियाच्या ॥२॥मारायासी जातां नारद बोलती । कां तूं आम्हांप्रति मारितोसी ॥३॥येरु म्हणे धन हेच माझे काज । म्हणोनि महाराज मारितो मी ॥४॥आजवरी केल्या अनंत मी हिंसा । परि धन पिपासा गेली नाही ॥५॥नारद म्हणती कोणासाठी धन । सांग सांठवून ठेवितोसी ॥६॥येरु म्हणे भार्यापुत्रांसाठी धन । करणे संपादन माझा धर्म ॥७॥नारद विचारिती पाप जे घडले । तुजलागी भले या दुमार्गे ॥८॥त्याचा वांटेकरी आहे काय कोणी । शोधोनी हे जाणी सूज्ञ नरा ॥९॥येरु म्हणे सर्व भार्यापुत्रांसाठी । खटपट मोठी माझी सदा ॥१०॥वाटेकरी तेव्हां होतील सर्वही । धनभोग पाही घडे त्यांसी ॥११॥नारद म्हणती चुकसी वालियारे । शोध तूं करीरे विचक्षणा ॥१२॥जेव्हा त्या कळले पापालागी धनी । नाहीतची कोणी उमगला ॥१३॥सकळी सांगितले ज्याचा तोच धनी । कर्तव्य पोषणी आमुच्या तूझे ॥१४॥नाममंत्रकानी नारद मुखांतुनी । राहिला शिरोनी संभाषणी ॥१५॥तेणे दृष्टी त्याची क्षणे निवळली । भ्रांति सर्व गेली हरोनियां ॥१६॥मग नारदासी शरण जाहला । म्हणे उपायाला करा कांही ॥१७॥विनायक म्हणे पावतां सद्बोधा । त्याची रोगबाधा हरुं लागे ॥१८॥==वाल्मीकिचरितमग नारदांनी मंत्र पढविला । त्याचीया जिव्हेला उमटेना ॥१॥रोगाचे लक्षण परम जहर । इंद्रिया विकार थोर असे ॥२॥जिव्हेलागी नाममंत्र तो येईना । बहु दु:ख मना त्याच्या झाले ॥३॥उलटी अक्षरे ऋषि पढविती । त्यासि बैसवीती जपालागी ॥४॥परतोनी मी जो येईन तोवरी । बैस तूं निर्धारी मंत्रजपी ॥५॥विनायक म्हणे स्वभाव पालटला । वाल्या स्थिर झाला मंत्रबळे ॥६॥==वाल्मिकिचरितजपत राहिला देहा विसरला । न क्षुधा तृषेला गणी कांही ॥१॥मन बुद्धि सर्व एकचि बनली । तदाकार झाली वृत्ति त्याची ॥२॥वारुळ वाढले तयाचे शरीरी । नाही भानावरी वाल्मीकी तो ॥३॥भूमिमय झाला जैसा की स्थावर । मंत्राचा प्रकार ऐसा असे ॥४॥गेला रोग भोग शोधन जहाले । दिव्यत्व पावले तयालागी ॥५॥तंव तेथे आले महर्षि नारद । पाहूनी वरद झाले त्यासी ॥६॥तेव्हां पासोनियां वाल्याकोळियाचा । सिद्ध पुरुषसाचा झाला जाणा ॥७॥वाल्मीकि महर्षि पदाते पावला । धन्य तो जाहला तिही लोकी ॥८॥तेणे रामायण जैसे रचीयेले । रामे तैसे केले आचरण ॥९॥विनायक म्हणे उत्कर्ष नामाचा । ऐसा आहे साचा बोध घ्यावा ॥१०॥ N/A References : N/A Last Updated : February 03, 2020 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP