मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|भजन|श्रीदत्त भजन गाथा|सप्ताह-अनुष्ठान|
भक्तकीर्तिने देवयशाचा विस्तार

सप्ताह अनुष्ठान - भक्तकीर्तिने देवयशाचा विस्तार

श्रीयुत विनायक वासुदेव साठे यांनी रचलेली श्रीदत्त भजन गाथा.


माझी कीर्ति होतां यश विस्तारेल । चरित्र गातील तूझे संत ॥१॥
कांचेचा तूं हिरा जरी बनविसी । तुझिया कीर्तिसी वाढ होई ॥२॥
दगडाचे सोने करोनी दाविसी । जरी ह्रषिकेशी निजकृपे ॥३॥
तरिच साधुसंत गातील तुजला । लोक विश्वासाला धरितील ॥४॥
दिव्य घडावण ऐशी माझी देवा । जरी तूं माधवा करिशील ॥५॥
लोकांचिये नेत्रां चित्र हे दिसेल । तयां उपजेल दृढ श्रद्धा ॥६॥
तेणे तूझे कार्य सिद्धीसी पावेल । जनसंघ लागेल भजनासी ॥७॥
लोकसंग्रहार्थ साधी भगवंता । मदीय सिद्धता साधी आतां ॥८॥
मज सिद्ध करी जगतासि दावी । आपुली थोरवी कृपावंता ॥९॥
भजनमाहात्म्य जनी प्रगट व्हावे । श्रीगुरुबरवे ऐशा योगे ॥१०॥
विनायक म्हणे मज गरिबाची । वाणी सत्य साची करावीच ॥११॥

N/A

References : N/A
Last Updated : February 03, 2020

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP