मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|भजन|श्रीदत्त भजन गाथा|सप्ताह-अनुष्ठान|
निराशेचे बोल

सप्ताह अनुष्ठान - निराशेचे बोल

श्रीयुत विनायक वासुदेव साठे यांनी रचलेली श्रीदत्त भजन गाथा.


धैर्य नाही माझ्या मनी अणुमात्र । कैसे सह्यगिरित्र करुं आतां ॥१॥
नाही ओज नाही मजलागी तेज । नाही महाराज औत्कण्ठ्यही ॥२॥
सर्वशून्य दिसे भोवती गुरुनाथा । काय हे समर्था झाले असे ॥३॥
भजनमार्गे कांही मज गवसेना । काय मी वल्गना करुं तरी ॥४॥
माधव तूं माझा असोनि यजमान । मज रंकपण आले असे ॥५॥
मानुं काय नाथ म्हणूं काय सुख । काहींच हरिख दिसेनाचि ॥६॥
अंधेरी हे आली माझीया नेत्रांसी । सुचेना मजसी दत्तनाथा ॥७॥
शांतिसुख कधि देशील गोविंदा । ऐसे मी मुकुंदा प्रार्थितसे ॥८।
सांग आतां मज काय करुं चांग । माझे अंतरंग कळवळे ॥९॥
विनायक म्हणे अत्रिच्या तनया । माझीये ह्रदया शांति देई ॥१०॥
धांवा
पाहोनियां दु:ख सकल जगती । आशेची निवृत्ति झाली असे ॥१॥
अन्यायासी तूंच दिसत सहाय । लोपलाचि न्याय मुळीहुनी ॥२॥
जाणीव लोपली विचारशक्ति गेली । कोठे उडी भली घेऊं सांग ॥३॥
विनायक म्हणे करावे दयेते । मज अवधूते स्वीकारावे ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : February 03, 2020

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP