TransLiteral Foundation
मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|भजन|श्रीदत्त भजन गाथा|सप्ताह-अनुष्ठान|
ईश्वराच्या अर्तक्य लीला

सप्ताह अनुष्ठान - ईश्वराच्या अर्तक्य लीला

श्रीयुत विनायक वासुदेव साठे यांनी रचलेली श्रीदत्त भजन गाथा.


ईश्वराच्या अर्तक्य लीला
मंगळवार ता. १४-१०-१९३०

देवा तूझी लीला कैशी कळणार । आम्हां समजणार अज्ञानांना ॥१॥
डोळे असुनी अंध, आम्ही अज्ञानाने । ऐकू ये ना काने कांही आम्हां ॥२॥
वाचा असोनियां मूक आम्ही झालो । अबुद्ध बनलो अज्ञानाने ॥३॥
कांही न चाल वार्ता या बुद्धिची । येथे विचाराची उलट होत ॥४॥
कांही जरी केले न कळे आम्हांसी । तुझ्या संकल्पासी बोलतां नये ॥५॥
आम्ही जे जे कांही ठरवावे भक्तीने । तुझ्या संकल्पाने न ते होय ॥६॥
विनायक म्हणे आम्हां पामरांसी । कैशी चाले मती तुझ्याठायी ॥७॥

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2020-02-03T20:26:54.7230000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

calculation machine

  • परिगणक यंत्र 
RANDOM WORD

Did you know?

मी ह्या साईट साठी काही करू शकते काय
Category : About us!
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.