TransLiteral Foundation
मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|भजन|श्रीदत्त भजन गाथा|सप्ताह-अनुष्ठान|
अहंताविष

सप्ताह अनुष्ठान - अहंताविष

श्रीयुत विनायक वासुदेव साठे यांनी रचलेली श्रीदत्त भजन गाथा.


अहंताविष
अहंकार दोष माझे ह्र्दयांत । प्रबळ वर्तत किती सांगूं ॥१॥
त्याचीया संगाने पाऊलो पाऊली । दुष्टता ये भली मजलागी ॥२॥
किती चुकतो मी अंदाज करवेना । पश्वाताप मना झाला असे ॥३॥
नम्रभावे आतां तुम्हांसी प्रार्थितो । पदर पसरितो कृपा करा ॥४॥
तुम्हांसम नाही कोणीही कृपाळू । माझा प्रतिपाळू करा, नाथा ॥५॥
सांपडलो आहे बहु अरिष्टांत । कांही न उमजत मजलागी ॥६॥
गोंधळले मन , मार्ग गवसेना । उपाय कळेना कांही मना ॥७॥
झालो आहे अंध नेत्र असोनियां । दिसेना गुरुराया मज मार्ग ॥८॥
कान असोनियां बहिरा बनलो । मूक असे झालो दोषांमुळे ॥९॥
जरी वाचा मज, कांही बोलवेना । ऐकाया येईना बोधवच ॥१०॥
आंधळा बहिरा मोना मी जाहलो । ठायींच बैसलो ठाकोनियां ॥११॥
अहंकारे मज अनाथ बनविले । नि:शक्त की केले मजलागी ॥१२॥
अहंकार विष उग्र हे प्रखर । जाहला विस्तार शरीरांत ॥१३॥
तेणे माझे दोन्ही डोळे हे फ़ुटले । कानही फ़ुटले देवा माझे ॥१४॥
जीभ माझी नाथा लुली हे पडली । कोरड जाहली घशामाजी ॥१५॥
अहंकार विष दाटले कंठांत । तेणे गुदमरत जीव माझा ॥१६॥
मरणकाळ ऐसा देवा हा पातला । शरण तुम्हांला म्हणोनियां ॥१७॥
तुम्ही पंचाक्षरी तुम्ही धन्वंतरी । वांचवावे तरी मज आतां ॥१८॥
विनायक घेतो चरणि लोळण । विषाचे शोषण करा नाथा ॥१९

धांवा
संकटांत नाही कोणी वांचविता । होय उपहास्यता थोर माझी ॥१॥
सोंगे ढोंगे कैसे नाम मी गाइले । पाहिजे आतां आले कामालागी ॥२॥
लाज राखा माझी पत राखा माझी । अब्रु राखा माझी कृपावंता ॥३॥
तुमच्या यशाची दिधली मी ग्वाही । सत्यता लवलाही घडो आतां ॥४॥
आजवरि केले नामसंकीर्तन । गुणाचे गायन विनयाने ॥५॥
श्रद्धेच्या प्रसादे देवा मी जनांत । राहिलो वर्णीत यश तुझे ॥६॥
अल्प जी का सेवा मज घडविली । पाहिजे ती आली फ़ळालागी ॥७॥
संकटे ही माझी नाथ नष्ट करा । मजलागी तारा कृपावंता ॥८॥
विनायक आहे तुम्हां प्रियदास । तरी आतां खास वांचवावा ॥९॥

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2020-02-03T20:21:47.1300000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

percussion welding

 • आघाती सांधण 
 • आघात सांधण 
RANDOM WORD

Did you know?

Why the marriages are prohibited within same Gotra?
Category : Hindu - Traditions
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Status

 • Meanings in Dictionary: 644,289
 • Total Pages: 46,537
 • Hindi Pages: 4,555
 • Dictionaries: 44
 • Words in Dictionary: 302,181
 • Marathi Pages: 27,517
 • Tags: 2,685
 • English Pages: 234
 • Sanskrit Pages: 14,230
 • Other Pages: 1

Suggest a word!

Suggest new words or meaning to our dictionary!!

Our Mobile Site

Try our new mobile site!! Perfect for your on the go needs.