मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|भजन|श्रीदत्त भजन गाथा|सप्ताह-अनुष्ठान|
व्हावे रामराज्य

सप्ताह अनुष्ठान - व्हावे रामराज्य

श्रीयुत विनायक वासुदेव साठे यांनी रचलेली श्रीदत्त भजन गाथा.


व्हावे रामराज्य भीति सर्व जावी । शांतता नांदावी आम्हां ठायी ॥१॥
आम्हांसी नसावे कसले संकट । देवा तूं प्रगट आम्हासाठी ॥२॥
आपपर भाव आम्हांसी नसावा । मुळी न कोप यावा आम्हांलागी ॥३॥
आम्ही सदा तूझे पायचि सेवावे । रात्रंदिन व्हावे सेवापर ॥४॥
चित्तासि विक्षेप मुळींच नसावा । सदा साह्य व्हावा काळ आम्हां ॥५॥
धर्मध्वज देवा अवनी फ़डकवा । निजजय दावा आम्हांलागी ॥६॥
विनायक म्हणे धर्मसंस्थापना । करी दयाघना आम्हासाठी ॥७॥
==
ईश्वराचे राज्य व्हावे त्रिभुवनी । आम्ही सदा भजनी रत व्हावे ॥१॥
जेव्हा जेव्हा इच्छा तेव्हा भजनामृत । आम्हांसी त्वरित लाभावे की ॥२॥
विनायक म्हणे माझ्य़ा ह्रदयांत । दत्त अवधूत वसतसे ॥३॥

N/A

References : N/A
Last Updated : February 03, 2020

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP