मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|भजन|श्रीदत्त भजन गाथा|सप्ताह-अनुष्ठान|
क्षमायाचना

सप्ताह अनुष्ठान - क्षमायाचना

श्रीयुत विनायक वासुदेव साठे यांनी रचलेली श्रीदत्त भजन गाथा.


रविवार ता. १२-१०-१९३०

क्षमा मी मागतो नाथ तुम्हांपाशी । जोडोनी करांसी नम्रपणे ॥१॥
अपराधी असे अत्यंत मी नाथा । म्हणोनि समर्था विनवीतो ॥२॥
माझ्य़ा असहायते पाहोनियां देवा । कोपाते शमवा आपुलीया ॥३॥
माउली केवळ तुम्ही आम्हालागी । तुम्हीच की जगी सदा माता ॥४॥
कृपाळूपणाने अपराध पोटी । घाला जगजेठी माझे आतां ॥५॥
विनायक येत तुम्हां काकुळती । पावोनियां खंती अंतरांत ॥६॥

N/A

References : N/A
Last Updated : February 03, 2020

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP