मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|भजन|श्रीदत्त भजन गाथा|सप्ताह-अनुष्ठान|
संकटाचे नाशासाठी प्रार्थना

सप्ताह अनुष्ठान - संकटाचे नाशासाठी प्रार्थना

श्रीयुत विनायक वासुदेव साठे यांनी रचलेली श्रीदत्त भजन गाथा.


सोमवार ता. १२-५-१९३०

माझी लाज कोणा सांग तुजविण । अभिमान कोण धरणार ॥१॥
माझा कळवळा कोणाचे ह्रदया । स्वामि दत्तात्रेया तुजविण ॥२॥
जेव्हा जेव्हां पाही प्रसंगाते भ्यालो । निराश मी झालो जेव्हां जेव्हां ॥३॥
तेव्हा कोण मजसाठी धाविन्नला । कोण प्रगटला माझेसाठी ॥४॥
आजवरी मज ऐसा अनुभव । मज दु:खानुभव न शिवेच ॥५॥
दु:खाते हरिसी मज वांचविसी । माझे शिरी धरिसी कृपाछत्र ॥६॥
सदा मजपाशी वससी दयाघना । माझीया अवना साधितोसी ॥७॥
ऐसा तुझा आहे मज प्रेमभाव । नित्य अनुभव येत मज ॥८॥
तेच तूझे व्रत अखंड चालवी । मजला वांचवी कृपादृष्टी ॥९॥
ओढवले आहे संकट मजसि । देवा तूं जाणसी सर्व कांही ॥१०॥
करितो भजन नमितो चरण । अंतरांत ध्यान तूझे सदा ॥११॥
ऐशा स्थितीमध्ये सदा मी बसतो । तुझी कृपा इच्छितो दत्तदेवा ॥१२॥
तरी आतां कृपा तुझी प्रगटावी । साक्षात्कारे यावी मूर्त येथे ॥१३॥
विनायक म्हणे आतां कृपा करा । माझीये उद्धारा साधा झणी ॥१४॥

N/A

References : N/A
Last Updated : February 03, 2020

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP