मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|भजन|श्रीदत्त भजन गाथा|सप्ताह-अनुष्ठान|
भक्तकीर्तिसाठी याचना

सप्ताह अनुष्ठान - भक्तकीर्तिसाठी याचना

श्रीयुत विनायक वासुदेव साठे यांनी रचलेली श्रीदत्त भजन गाथा.


कृपाळूत्व तुझे तूजला साजत । उपमा गवसत नाही अन्य ॥१॥
ह्रदयामाजी तव नाथ कृपाळूपण । तेच अंत:करण इच्छी माझे ॥२॥
माझ्या अनुभवा येवो कृपाभाव । ऐसे दत्तदेव इच्छीतसे ॥३॥
तुझ्या चरित्राची कथा मी वाचितो । भरोनियां जातो विश्वासाने ॥४॥
कथा मी वाचितो त्या सायंदेवाची । कैशी कृपा साची केली तुवां ॥५॥
कथा ब्राह्मणाची वाचिली मी नाथा । हेमकुंभ समर्था त्यांसी दिला ॥६॥
ऐसे मी न कधी देखिले वाचिले । कृपाळूत्व भले जेथे स्पष्ट ॥७॥
अनुभव देई त्वदीय कृपेचा । हेच माझी वाचा मागतसे ॥८॥
विनायक म्हणे कृपाच करावी । माझी थोर व्हावी कीर्ति जगीं ॥९॥

N/A

References : N/A
Last Updated : February 03, 2020

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP