TransLiteral Foundation
मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|भजन|श्रीदत्त भजन गाथा|सप्ताह-अनुष्ठान|
सुदामकथा

सप्ताह अनुष्ठान - सुदामकथा

श्रीयुत विनायक वासुदेव साठे यांनी रचलेली श्रीदत्त भजन गाथा.


सुदामकथा
तूंच एक ज्ञाता सकळ जाणसीं । मंगळ करिसी सकळांचे ॥१॥
आमुच्या दृष्टील विपरीत  दिसे । दु:खयुक्त भासे आम्हांलागी ॥२॥
परी परिणामी होत हितकर । अनुभव, श्रीकर, येतो ऐसा ॥३॥
ज्याने त्याने निज चरित्र पहावे । मर्म ओळखावे विवेकाने ॥४॥
घाबरटपणा आम्हां अज्ञानाने । स्वभाव-धर्माने येत असे ॥५॥
श्रीकृष्णाचा सखा सुदामा ब्राह्मण । द्वारकी प्रयाण करीतसे ॥६॥
ऐश्वर्याचा निधि श्रीकृष्ण परम । दारिद्र्याचे धाम सुदामा हा ॥७॥
ऐशा संकल्पाने भेटत कृष्णासी । देईल भक्तासी म्हणोनियां ॥८॥
बहुमान केला सुदाम देवाचा । देव न वदे वाचा दक्षिणेची ॥९॥
खिन्न झाला मग तो तेथोनि निघत । देव निरोपित सन्मानाने ॥१०॥
बालपणींचा मित्र मज उपेक्षितो । कांही न जाणतो पूर्ववृत्त ॥११॥
मित्र म्हणे मनी कोणि न कोणाचा । खेळ हा दैवाचा म्हणतसे ॥१२॥
भडभडोनियां त्यासी फ़ार आले । जळाने भरले नेत्र त्याचे ॥१३॥
क्षणभर कांही तयासि दिसेना । कैसे मी वर्णना करुं त्याच्या ॥१४॥
कांही पुढे जातां सुवर्ण नगरी । दिसतसे खरी तयालागी ॥१५॥
तया वाटे मार्ग माझा मी चुकलो । पुन: परतलो मानीतसे ॥१६॥
तंव पुढे येती अमात्य तयाचे । म्हणती नगरीचे तुम्ही राजे ॥१७॥
तेव्हा कळोनियां आले त्या विप्रांसी । देवे वैभवासी चढविले ॥१८॥
ओशाळला मनी, म्हणे मी अज्ञान । चरित्र गहन तुझे देवा ॥१९॥
विनायक म्हणे ईश्वर भजन । माहात्म्य कळे न अज्ञानाने ॥२०॥

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2020-02-03T20:27:29.6630000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

विराट II.

RANDOM WORD

Did you know?

जीवनात वयाच्या कोणत्या वर्षी कोणती शांती करावी?
Category : Hindu - Puja Vidhi
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.