TransLiteral Foundation
मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|भजन|श्रीदत्त भजन गाथा|सप्ताह-अनुष्ठान|
अज्ञानाने ईश्वरावर दोषारोप

सप्ताह अनुष्ठान - अज्ञानाने ईश्वरावर दोषारोप

श्रीयुत विनायक वासुदेव साठे यांनी रचलेली श्रीदत्त भजन गाथा.


अज्ञानाने ईश्वरावर दोषारोप
आमुचे कल्याण नित्य तूं साधिसी । सदा तूं वससी ह्रदयामाजी ॥१॥
प्रसन्न वरद सन्मुख अससी । कृपेने पाहसी सर्वालागी ॥२॥
आमुचे जडभारी घेतोसी तूं शिरी । आम्हांसी संसारी रक्षितोसी ॥३॥
निष्ठुर म्हणतो तुज कृपाघना । दूषणाते नाना देतो तूज ॥४॥
आरोप करितो किती तुजवरी । अगणित श्रीहरी अज्ञानाने ॥५॥
विनायक म्हणे आम्हां निर्लज्जांसी । क्षमाच करिसी दयाघना ॥६॥
==
जन्मोजन्मीचा तूं आमुचा सांगाती । आमुचे तुजप्रती सर्व ठावे ॥१॥
जन्मकर्म आमुचे पापपुण्य तैसे । तुज ठावे असे सर्व कांही ॥२॥
वर्तमान भूत भविष्य जे काही । सकल ते पाही ठावे असे ॥३।
सर्वज्ञ तूं देव पुढील जाणसी । तैसा घडविसी योग जाण ॥४॥
आम्हीच अज्ञानी काही न कळत । मुळी न वळत कांही देवा ॥५॥
पुन्हां पुन्हां पुन्हां करितो आक्रोश । प्रभु जगदीश तुजवरी ॥६॥
क्षणोक्षणी देवा तुजला गांजितो । तुजला करितो कटूत्तरे ॥७॥
चरणी शरण शरण चरणां । तरी नारायणा कृपा करी ॥८॥
विनायक म्हणे तुजसी वर्णितो । तुजसी दूषितो अज्ञानाने ॥९॥

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2020-02-03T20:28:55.9430000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

basilica

  • रोमन न्यायालय, आस्तिई चर्च 
  • बॅसिलिका 
  • स्त्री. बॅसिलिका 
RANDOM WORD

Did you know?

यज्ञक्रिया करणार्‍यांना काय म्हणतात?
Category : Hindu - Traditions
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.