मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|भजन|श्रीदत्त भजन गाथा|सप्ताह-अनुष्ठान| नाममंत्र व त्याचा प्रभाव सप्ताह-अनुष्ठान विषय जिव्हाळ्याचा देव भक्ताची लाज राखण्याबद्दल विनंती "दक्ष मी राहिलो तूझीये कार्यात" सप्ताहसिध्यर्थ याचना भक्तकीर्तिसाठी याचना भक्तकीर्तिने देवयशाचा विस्तार देव मज करा अतुल्य सामर्थ्यासाठी प्रार्थना देव मज करा संकटाचे नाशासाठी प्रार्थना विनायकाठायी दत्तसंचार धर्मग्लानि धर्मविस्तारार्थ प्रार्थना व्हावे रामराज्य भक्तिभाव उपजविण्यासाठी प्रार्थना निराशेचे बोल दत्ताधीनता कृतज्ञतावचन प्रसादग्रहणार्थ आज्ञायाचना क्षमायाचना पूर्वचरितकथन व क्षमायाचना अहंताविष अहित दलनासाठी प्रार्थना अनुष्ठानपूर्तिसाठी प्रार्थना देवावीण गति । नाही आम्हां प्रति ईश्वराच्या अर्तक्य लीला सुदामकथा भ्याडपणे भरे अज्ञानाने अज्ञानाने ईश्वरावर दोषारोप प्रभुवात्सल्यवर्णन व क्षमायाचना ’समस्तांची लज्जा त्यजुनि भगवच्चिंतन करी’ नाममंत्र व त्याचा प्रभाव वाल्मीकि चरित चित्तस्थैर्यासाठी प्रार्थना श्रीपाद पुण्यतिथी व सप्ताह समाप्ति सप्ताह अनुष्ठान - नाममंत्र व त्याचा प्रभाव श्रीयुत विनायक वासुदेव साठे यांनी रचलेली श्रीदत्त भजन गाथा. Tags : bhajandattaदत्तभजन नाममंत्र व त्याचा प्रभाव Translation - भाषांतर नाममंत्र व त्याचा प्रभावनाना रोग जगी विख्यात असती । देहासी पीडिती परोपरी ॥१॥देह मन बुद्धि तिघांसी विकार । करिती साचार रोग बहु ॥२॥नाना रुपधारी एकचि हा रोग । देत असे भोग जीवालागी ॥३॥त्याचिया शमना नाममंत्र जपा । मग सर्व तापा परिहरा ॥४॥नाममंत्र जरी सुखाने जपाल । आरोग्य होईल तुम्हांलागी ॥५॥मृत्युभय नाही नामधारकांसी । तरी निश्चयेसी जप करा ॥६॥अमर होवोनी विचाराल जगी । भोग तुम्हांलागी स्पर्शिनाच ॥७॥विनायक म्हणे सर्व रोग भोग । नाममंत्रे भंग पावतील ॥८॥==नाममंत्र व त्याचा प्रभावनाना रोग जगी विख्यात असती । देहासी पीडिती परोपरी ॥१॥देह मन बुद्धि तिघांसी विकार । करिती साचार रोग बहु ॥२॥नाना रुपधारी एकचि हा रोग । देत असे भोग जीवालागी ॥३॥त्याचिया शमना नाममंत्र जपा । मग सर्व तापा परिहरा ॥४॥नाममंत्र जरी सुखाने जपाल । आरोग्य होईल तुम्हालागी ॥५॥मृत्युभय नाही नामधारकांसी । तरी निश्चयेसी जप करा ॥६॥अमर होवोनी विचाराल जगी । भोग तुम्हांलागी स्पर्शिनाच ॥७॥विनायक म्हणे सर्व रोग भोग । नाममंत्रे भंग पावतील ॥८॥==स्वभावास औषध नाममंत्रस्वभावासी नाही औषध म्हणती । पंडित सांगती अनुभब ॥१॥आजवरी ऐसा प्रवाद चालत । सत्यचि मानित जनलोक ॥२॥परि नाममंत्रधारक जो नर । अनुभव साचार त्या उलटा ॥३॥नाममंत्राची हे दिव्य मात्रा घेता । स्वभाव शुद्धता होत असे ॥४॥शोधन करीत मात्रा स्वभावाचे । पालटत साचे रुप त्याचे ॥५॥म्हणोनियां नाममंत्र हा सेवावा । देह न कष्टवावा इतरत्र ॥६॥विनायक म्हणे दिव्य हे औषधि । सेवोनिया साधी निजहित ॥७॥==स्वभावास औषध नाममंत्रगूढ जरी आहे अंतर आपुले । दुष्टि न दिसे भले जरी जाणा ॥१॥तया रोग होतां असाध्य वाटत । प्रत्यया न येत रोग त्याचा ॥२॥लक्षणावरोनी मति न चालत । आरोग्य भासत जैसे कांही ॥३॥मोठे मोठे वैद्य येथे फ़सताती । निदान करिती भलतेच ॥४॥याही रोगावरी औषध हा मंत्र । प्रभाव विचित्र याचा आहे ॥५॥रोगाचा प्रकाश करित सेवितां । दावि प्रत्यक्षता विशदत्वे ॥६॥विशद करोनी रोग तो दावी । किरण प्रकाशवी स्वतेजाचा ॥७॥भ्रांति भूल सारी टाकी दवडोनी । प्रत्ययास आणी रोग मंत्र ॥८॥मग प्रभावाते आपुल्या दावित । रोगासी नाशित एकसरे ॥९॥युद्ध करी मग अंतर प्रभावे । ऐसे हे जाणावे महिमान ॥१०॥विनायक म्हणे असाध्य कांही नाही । नामालागी पाही जगत्रयी ॥११॥==जपतां नाममंत्र देह मन बुद्धि । पावताती शुद्धि परमचि ॥१॥माया भ्रम जो का जडलासे रोग । भोगवीतो भोग दारुण जो ॥२॥तयाचा निरास नाममंत्र करी । औषधि हे तरी दिव्य जाणा ॥३॥म्हणोनियां घ्यावे सदा हरिनाम । तेणे सर्वकाम पूर्ण होती ॥४॥विनायक म्हणे ऐसा हा निष्कर्ष । नामाचा उत्कर्ष जाणावा हा ॥५॥ N/A References : N/A Last Updated : February 03, 2020 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP