TransLiteral Foundation
मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|भजन|श्रीदत्त भजन गाथा|सप्ताह-अनुष्ठान|
’समस्तांची लज्जा त्यजुनि भगवच्चिंतन करी’

सप्ताह अनुष्ठान - ’समस्तांची लज्जा त्यजुनि भगवच्चिंतन करी’

श्रीयुत विनायक वासुदेव साठे यांनी रचलेली श्रीदत्त भजन गाथा.


’समस्तांची लज्जा त्यजुनि भगवच्चिंतन करी’
सकळ  विश्वास अर्पणे तुजसी । सेवणे तुजसी दत्तात्रेय ॥१॥
विनवणी तूज करित असणे । तुजला स्तविणे युक्त-मने ॥२॥
खातां पितां कांही उद्योग करितां । तुझे ठाय़ी चित्ता नियोजणे ॥३॥
जे का तूज प्रिय तेच आचरणे । बोलणे चालणे तुझ्या इच्छे ॥४॥
आचार विचार उच्चार त्वन्मय । वासुदेव कार्य रात्रंदिस ॥५॥
विनायक म्हणे साधितां हा योग । होतसे वियोग मृत्यु जन्मां ॥६॥
==
धांवा
बहु दुखावलो बहु निर्बुजलो । बहुत त्रासलो कृपावंता ॥१॥
विश्रांति या जीवा कधी न लाभली । हळहळ भली सदा वाही ॥२॥
जे जे कांही केले नाथा आजवरी । यशा नरहरी नाही आले ॥३॥
सकळ व्यर्थ झाले माझे हे जीवित । पुढती दिसत गति न कांही ॥४॥
कोण माझा आतां सांग कैवारीया । उडी घालोनियां तारी जो का ॥५॥
आजवरी ज्यासी सेविले भक्तीने । त्यानेच धावणे केले पाहिजे ॥६॥
घोर अंध:कार भविष्य काळाचा । उभा राहे साचा दृष्टिपुढे ॥७॥
आतां सांग कोणा विनवूं सद्गुरु । कैसे सांग धरुं चित्तासी मी ॥८॥
विनायक येतो तुज काकुळती । धांव तूं श्रीपति लवलाहे ॥९॥
==
धांवा
मजला आधार कांही न ऊरल । बहु काचावला दास तुझा ॥१॥
कातर ह्र्दय कांपे चळचळां । वांचवि स्नेहाळा निजदासा ॥२॥
शुष्क झाली गात्रे उत्साह भंगला । सदया तुजला दया येवो ॥३॥
शून्य झाले मज दृष्टीसी आंधेरी । येतसे श्रीहरी धांव आतां ॥४॥
कोरड घशाशी पडत चालली । सकळ आटली शक्ति माझी ॥५।
धांव तरी आतां उडी घे प्रेमळा । मजसी स्नेहाळा वांचवावे ॥६॥
कैसे हे ह्रदय तुझे न द्रवत । अजुनि कां स्वस्थ दत्तात्रेया ॥७॥
विनायक म्हणे झालो मी घाबरा । तरी आतां त्वरा करा दत्ता ॥८॥
==
धांवा
होवोनीयां भक्त तुझा पुरुषोत्तमा । विनष्टि प्ररमा काय अ़से ॥१॥
बुडलो बुडलो सर्वस्वी बुडालो । फ़जित जाहलो अत्रिसुता ॥२॥
नाही स्वार्थ नाही तैसा परमार्थ । दोन्ही माझे अर्थ हरपले ॥३॥
वायां झाले सारे जे मी कांही केले । फ़ळासी न आले कृपावंता ॥४॥
तुझाही तो ठाव मज गवसेना । काय करुणाघना करुं आतां ॥५॥
नको दूर लोटूं करी अंगिकार । दयेचा सागर एक तूंच ॥६॥
विनायक आहे जाहला निराश । तरी जगदीश कृपा करा ॥७॥
==
धांवा
काय बोलणार अज्ञानी पामर । तूंच तारणार धांव घेई ॥१॥
सकळ कळत तुज सर्वज्ञाना । माझी वृथा वल्गना मुळींहुनी ॥२॥
धरोनियां आशा तुज मी सेविले । विश्वासा धरिले तुझ्याठायी ॥३॥
तरी नको माझा आशाभंग करुं । अज्ञान लेकरुं अंगिकारी ॥४॥
सर्व अहंकार चित्ताचे गळाले । निर्वाणचि झाले असे मज ॥५॥
पुरवावी आशा माझी रमापति । आशाळु निश्चिती थोर आहे ॥६॥
नको कठोरता देवा चित्ती धरुं । आशाभंग करुं नको नको ॥७॥
लोळते हे बाळ तुझिये चरणी । तरी चक्रपाणी नको वेळ ॥८॥
नोहे सवतीचा तुझाच मी बाळ । आहे लडिवाळ गुरुमाई ॥९॥
विनायक म्हणे काम माझा पूर्ण । अहो नारायण करा तुम्ही ॥१०॥

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2020-02-03T20:30:31.4770000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

dehumidify

 • (to remove moisture from) आर्द्रता निष्कासन करणे 
RANDOM WORD

Did you know?

shatshastra konati?
Category : Puranic Literature
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Status

 • Meanings in Dictionary: 644,289
 • Total Pages: 46,537
 • Hindi Pages: 4,555
 • Dictionaries: 44
 • Words in Dictionary: 302,181
 • Marathi Pages: 27,517
 • Tags: 2,685
 • English Pages: 234
 • Sanskrit Pages: 14,230
 • Other Pages: 1

Suggest a word!

Suggest new words or meaning to our dictionary!!

Our Mobile Site

Try our new mobile site!! Perfect for your on the go needs.