मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|सर्वमतखंडन आणि ब्रह्मविद्यारहस्य|स्कंध १० वा|उत्तरार्ध| अध्याय ८६ वा उत्तरार्ध दशम स्कंधाचा ( उत्तरार्ध ) सारांश अध्याय ५० वा अध्याय ५१ वा अध्याय ५२ वा अध्याय ५३ वा अध्याय ५४ वा अध्याय ५५ वा अध्याय ५६ वा अध्याय ५७ वा अध्याय ५८ वा अध्याय ५९ वा अध्याय ६० वा अध्याय ६१ वा अध्याय ६२ वा अध्याय ६३ वा अध्याय ६४ वा अध्याय ६५ वा अध्याय ६६ वा अध्याय ६७ वा अध्याय ६८ वा अध्याय ६९ वा अध्याय ७० वा अध्याय ७१ वा अध्याय ७२ वा अध्याय ७३ वा अध्याय ७४ वा अध्याय ७५ वा अध्याय ७६ वा अध्याय ७७ वा अध्याय ७८ वा अध्याय ७९ वा अध्याय ८० वा अध्याय ८१ वा अध्याय ८२ वा अध्याय ८३ वा अध्याय ८४ वा अध्याय ८५ वा अध्याय ८६ वा अध्याय ८७ वा अध्याय ८८ वा अध्याय ८९ वा अध्याय ९० वा स्कंध १० वा - अध्याय ८६ वा सर्वमतखंडन आणि ब्रह्मविद्यारहस्य Tags : bhagavatpothiपोथीभागवत स्कंध १० वा - अध्याय ८६ वा Translation - भाषांतर ॥९३८॥परीक्षिति म्हणे पितामही माझी । कृष्ण-बळरामाची भगिनी मान्य ॥१॥सुभद्रा भाग्याची कांता अर्जुनाची । जाहली ते कैसी कथा मज ॥२॥निवेदिती शुक विक्रमी अर्जुन । प्रभासीं येऊन राहियेला ॥३॥तदा वृत्त त्याच्या कर्णावरी आलें । लग्न आरंभिलें सुभद्रेचें ॥४॥दुर्योधना द्यावी इच्छी बलराम । श्रीकृष्णाचें मन तैसें नसे ॥५॥आपणातें लाभो ऐसें इच्छी पार्थ । त्रिदंडी संन्यास घेई मग ॥६॥वासुदेव म्हणे वेष तो पार्थाचा । ध्यानांत कोणाच्या आला नाही ॥७॥॥९३९॥ऐसा त्रिदंडी संन्यास । घेऊनियां द्वारकेंत ॥१॥येतां सन्मान तयाचा । नगरीं होई बहु साचा ॥२॥श्रध्दा रामाचीही तेथें । हळु हळु जडुं लागे ॥३॥जाणुनियां चातुर्मास्य । यति राहियेले तेथ ॥४॥पुढती एकदां मंदिरीं । राम यतीसी पाचारी ॥५॥करितां भोजन यतीसी । दिसली सुभद्रा गोमटी ॥६॥वासुदेव म्हणे पार्थ । सौंदर्यानें त्या मोहित ॥७॥॥९४०॥भान न पार्थासी राहिले वेषाचें । दृष्टि नासाग्री ते स्थिर न राहे ॥१॥वारंवार तिज पाही न्याहाळूनि । इच्छा धरी मनी तत्प्राप्तीची ॥२॥कोणाही स्त्रियेतें मोहचि पडावा । सौंदर्याचा ठेवा ऐसा पार्थ ॥३॥यति असूनिही अलौकिक कांति । सुभद्रेच्या चित्तीं भरली बहु ॥४॥राहूनियां स्तब्ध दावी भाव मुग्ध । केंवी याचा लाभ चिंती मनीं ॥५॥वासुदेव म्हणे अस्थैर्य चित्तातें । येतां व्यवहार ते केंवी शुध्द ॥६॥॥९४१॥प्रेमाग्रहें राम वाढितां पक्वानें । आनंद चित्तातें नव्हता पार्था ॥१॥कष्टानेंचि गूढ राखूनियां भाव । उरकी विजय भोजनातें ॥२॥तांबूलादि प्रेमें रामानें अर्पूनि । केली पाठवणी संन्याशाची ॥३॥पुढती यतीसी सुभद्रेचा ध्यास । वाटती नीरस इतर लाभ ॥४॥जाणीतचि होता कृष्ण हें सकळ । इष्टचि हें सर्व तया होतें ॥५॥वासुदेव म्हणे श्रीहरीचें साह्य । घेऊनि विजय ठरवीं कांही ॥६॥॥९४२॥माता-बांधवांचे संपादूनि मत । पार्थाचा निश्चित ठरला मार्ग ॥१॥सुभद्राकर्षणें गुह्याचाही स्फोट । व्हावयाचा धाक नव्हता त्यासी ॥२॥इतक्यांत एक पातला सुयोग । यात्रेमाजी लोक दंग होती ॥३॥वाहनीं बैसूनि हिंडती आनंदें । लाभली पार्थातें तेंचि संधी ॥४॥दास-दासीसवें एकदां सुभद्रा । पहावया यात्रा रथीं बैसे ॥५॥नगराबाहेरी येतांचि तो रथ । त्याचि रथीं पार्थ घुसला शौर्ये ॥६॥वासुदेव म्हणे यादवांसी क्रोध । येतां होई युध्द तयास्थानीं ॥७॥॥९४३॥गांडीवचापानें पिटाळी यादवां । हाहा:कार झाला तयावेळीं ॥१॥आक्रोश करिती यादव बहुत । सिंहासम पार्थ निघूनि जाई ॥२॥वृत्तांत्तें त्या राम खवळूनि जाई । सागरासी येई भरती जेंवी ॥३॥परी कृष्णासवें यादव बहुत । विनवूनि शांत करिती तया ॥४॥पुढती रामानें संतुष्ट होऊन । धाडिलें आंदण बहु थोर ॥५॥शांत बलराम जाहला पाहुनि । पांडवांसी मनीं हर्ष वाटे ॥६॥यादव-पांडव प्रेमवृध्दि पावे । सुभद्राविवाहें पुढती बहु ॥७॥वासुदेव म्हणे होतां हरिइच्छा । हेतु भाविकांचा सिध्दि पावे ॥८॥॥९४४॥निवेदिती शुक राया, ऐक आतां । कथितों अल्पसा इतिहास ॥१॥श्रुतदेव नामें होता एक विप्र । शुध्द त्याचें चित्त हरिभक्तीनें ॥२॥निवृत्त तयाची सकल वासना । कदाहि त्यागिना विवेक त्या ॥३॥विदेहदेशी त्या मिथिलेंत वास । वृत्ति आयाचित स्वीकारिली ॥४॥यापरी गृहस्थाश्रम तो चालवी । निर्वाहाची होई सोय त्याच्या ॥५॥यत्नेंही न तया बहु धनलाभ । तेणे अयाचित वृत्ति प्रिय ॥६॥वासुदेव म्हणे आपुलें जें तेंचि । लाभे आपणासी निश्चय हा ॥७॥॥९४५॥बहुलाश्व नामें रावही तेथींचा । भक्त ईश्वराचा एकनिष्ठ ॥१॥जनकाच्या वंशीं जन्मूनियां तोही । अनासक्त राही संसारी या ॥२॥एकदां भक्तांच्या भेटीस्तव कृष्न । रथांत बैसून जाई तेथें ॥३॥निवेदिती शुक नारदांसमेत । मीही गेलों तेथ कृष्णासवें ॥४॥मार्गामाजी ज्या ज्या गेलों नगरांत । सन्मानिलें तेथ तेथ जनीं ॥५॥ग्रहांसवें सूर्य पातला प्रत्यक्ष । ऐसेंचि तयांस वाटे मनीं ॥६॥आनर्तादि देशीं कृष्णासी पूजूनि । जाहले जन्मूनि धन्य लोक ॥७॥वासुदेव म्हणे श्रीकृष्णदर्शन । हेंचि महापुण्य सुजनां वाटे ॥८॥॥९४६॥विदेहदेशासी पातला श्रीकृष्ण । दर्शना तैं जन धांव घेती ॥१॥आह्मांसवें मुनि सन्निध पाहुनि । आनंदले मनीं सकल लोक ॥२॥बहुलाश्व तेंवी श्रुतदेव विप्र । आले सन्मानार्थ अत्यानंदें ॥३॥उभयांनीं पाय धरिले कृष्णाचे । गहिंवर त्यांतें आंवरेना ॥४॥येऊनियां स्वयें भेटला आह्मांसी । हर्ष बहु पोटी हाचि तयां ॥५॥सदनीं आमुच्या पडो पादधूलि । प्रार्थना हे केली उभयांनीही ॥६॥वासुदेव म्हणे एकदांचि दोघे । पाचारितां, झालें नवल ऐका ॥७॥॥९४७॥ऋषीसह घेई तदा दोन रुपें । जाई सदनातें कृष्ण त्यांच्या ॥१॥ज्ञाते हें नव्हतें तयाम उभयांतें । पूजिलें तयातें आम्हासवें ॥२॥धेनु, गंध, पुष्प, धूपही अर्पिला । बहुलाश्व बोलला नम्रभावें ॥३॥देवा, अंतर्यामी तूंचि सकलांच्या । जाणूनि आमुचा भाव येती ॥४॥आप्त-गोताहूनि भक्त प्रिय तुज । वचन हे साच केलें अद्य ॥५॥अलिप्त तूं सर्व विषयीम असूनि । तोष देसी जनीं भाविकांतें ॥६॥मुनीसवें आतां राहीं कांही दिन । हेतु हाचि पूर्ण करी एक ॥७॥वासुदेव म्हणे प्रार्थनेसमान । राहूनि कल्याण करी कृष्ण ॥८॥॥९४८॥ऋषीसवें देव पातले सदनीं । आनंद पाहूनि श्रुतदेवाही ॥१॥बेभान होऊनि नाचूंचि लागला । वैसवी सकलां सुआसनीं ॥२॥कुशल पुसोनी कांतेसवें पाद । प्रक्षालूनि, तीर्थस्नान करी ॥३॥पुसूनि चरण जाहला संतुष्ट । पूर्ण मनोरथ मानीतसे ॥४॥गंध, पुष्प, तेंवी जल सुगंधित । तुलसी तेंवी दर्भशकलां अर्पी ॥५॥वासुदेव म्हणे श्रुतदेव तर्क । पुढती मनांत करी हर्षे ॥६॥॥९४९॥कवण्या जन्मीचें पुण्य फळा आलें । दर्शन घडलें तेणें ऐसें ॥१॥पुढाती चरणीं होऊनियां लीन । बोलला वचन नम्रभावें ॥२॥अद्यचि न देवा, पातलासी ऐसें । निर्मिलें जगातें त्याचिवेळी ॥३॥व्यापूनि तयातें राहिलासी सौख्यें । प्रत्यक्ष पाहिलें परी अद्य ॥४॥अवाढव्य विश्वीं केलासी प्रवेश । यास्तव विविध भाससी तूं ॥५॥वासुदेव म्हणे एकाहून एक । थोर थोर भक्त श्रीहरीचे ॥६॥॥९५०॥श्रवण, कीर्तन, मनन जयांसी । दर्शन तयांसी देसी ध्यानें ॥१॥परी मूर्तिमंत पाहिलें मी अद्य । काय भक्तभाग्य वर्णू देवा ॥२॥असूनि सर्वत्र प्रत्यया न येसी । दोष हा नसेचि देवा, तव ॥३॥शुध्दांत:करणी होसी तूं प्रकट । अहंकारभ्रष्ट अंतरी न ॥४॥जन्म-मरणासी मूळ तूंचि देवा । अभिमानें गोंवा मूढा पडे ॥५॥चित्स्वरुपज्ञानें तुटे जीवभाव । एकचि उपाय भक्ति यातें ॥६॥आतां सकलही मनोरथ पूर्ण । प्रत्यक्ष दर्शन भयहारी ॥७॥वासुदेव म्हणे भक्त ऐसे धन्य । प्रत्यक्ष दर्शन जयांप्रति ॥८॥॥९५१॥श्रुतदेवहस्त धरुनि तैं कृष्ण । बोलला वचन सुधामय ॥१॥अनुग्रहार्थ हे मुनि आले एथ । काय मी पावित्र्य वर्णू त्यांचे ॥२॥पादधुलि यांची पडेल ज्या ठाई । न उरे त्या ठाई पापलेश ॥३॥ध्यानें ऐसें चित्त करुनि हे शुध्द । जन उपकारार्थ हिंडताती ॥४॥देवादिकांहूनि विप्र श्रेष्ठ जनी । नेती उध्दरुनि तत्काळ हे ॥५॥वासुदेव म्हणे विप्रवर्णनाची । हौस श्रीहरीची सर्वकाळ ॥६॥॥९५२॥जन्मानेचि विप्र सर्वदा हे श्रेष्ठ । त्यांत विद्या, तप, इंद्रियजय ॥१॥ब्रह्मानिष्ठा जयां काय त्या वर्णावें । विप्रचि जाणावे बहुत श्रेष्ठ ॥२॥चतुर्भुज माझ्या रुपाहूनि तेचि । मज आवडती काय कथूं ॥३॥वेदमय विप्र, वेद हा मद्देह । तेणें त्यां श्रेष्ठत्व जाणें विप्रां ॥४॥प्रतिमेहूनि जे ज्ञात्या विप्रांप्रति । कनिष्ठ मानिती मूढचि ते ॥५॥वासुदेव म्हणे देवब्राह्मणांची । ज्ञानानें महति वर्णिली ही ॥६॥॥९५३॥सर्वत्र मद्भाव ज्ञात्या विप्रांप्रति । यास्तव ते जगीं परम श्रेष्ठ ॥१॥विप्रांचीं रुपें ती माझीचि जाणावी । सर्वदा करावी सेवा त्यांची ॥२॥पूजितां तयांसी तोष मज होई । माझीच ते पाही पूजा घडे ॥३॥विप्रां न पूजितां पूजिता जे मज । जाणावे ते मूढ श्रमती व्यर्थ ॥४॥ऐकूनि कृष्णोक्ति मुनिचरणांसी । अत्यादरें पूजी श्रुतदेव तो ॥५॥बहुलाश्व पूजी स्वग्रहीं सकलां । वास्तव त्या स्थळा कांही दिन ॥६॥उभय भक्तांसी बोधूनि त्या स्थानीं । द्वारकाभुवनीं येई कृष्ण ॥७॥वासुदेव म्हणे उभयही भक्त । सायुज्यपदास प्राप्त झाले ॥८॥ N/A References : N/A Last Updated : December 14, 2019 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP