मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|सर्वमतखंडन आणि ब्रह्मविद्यारहस्य|स्कंध १० वा|उत्तरार्ध| अध्याय ५६ वा उत्तरार्ध दशम स्कंधाचा ( उत्तरार्ध ) सारांश अध्याय ५० वा अध्याय ५१ वा अध्याय ५२ वा अध्याय ५३ वा अध्याय ५४ वा अध्याय ५५ वा अध्याय ५६ वा अध्याय ५७ वा अध्याय ५८ वा अध्याय ५९ वा अध्याय ६० वा अध्याय ६१ वा अध्याय ६२ वा अध्याय ६३ वा अध्याय ६४ वा अध्याय ६५ वा अध्याय ६६ वा अध्याय ६७ वा अध्याय ६८ वा अध्याय ६९ वा अध्याय ७० वा अध्याय ७१ वा अध्याय ७२ वा अध्याय ७३ वा अध्याय ७४ वा अध्याय ७५ वा अध्याय ७६ वा अध्याय ७७ वा अध्याय ७८ वा अध्याय ७९ वा अध्याय ८० वा अध्याय ८१ वा अध्याय ८२ वा अध्याय ८३ वा अध्याय ८४ वा अध्याय ८५ वा अध्याय ८६ वा अध्याय ८७ वा अध्याय ८८ वा अध्याय ८९ वा अध्याय ९० वा स्कंध १० वा - अध्याय ५६ वा सर्वमतखंडन आणि ब्रह्मविद्यारहस्य Tags : bhagavatpothiपोथीभागवत स्कंध १० वा - अध्याय ५६ वा Translation - भाषांतर ॥६७६॥निवेदिती मुनि सत्राजित नामें- । यादव, सूर्याचें स्तवन करी ॥१॥आराधना करी वनांत जाऊनि । सूर्य त्या अर्पूनि मणि धाला ॥२॥स्यमंतकाची त्या सूर्यासम कांति । बांधूनि तो कंठी सत्राजित ॥३॥द्वारकेसी येतां सूर्यचि भासला । येई दर्शनाला श्रीहरीच्या ॥४॥असह्य त्या तेजें विस्मय जनांसी । जाऊनि कथिती कृष्णाप्रति ॥५॥कृष्ण म्हणे सत्राजित तो, न सूर्य । अर्पी स्यमंतक सूर्य तया ॥६॥वासुदेव म्हणे सत्राजित गृही । येऊनियां करी पुण्यविधि ॥७॥॥६७७॥पुण्याहवाचनपूर्वक मण्याची । स्थापना तो करी देवगृही ॥१॥प्रतिदिनी अष्टाभार तो कनक । अर्पी स्वमंतक सूर्याज्ञेनें ॥२॥सर्प-ग्रहभीति तेंवी आधि-व्याधि । नसे दुष्काळही, मणि जेथें ॥३॥एकदां कृष्णाच्या पातलें मनांत । घडो मणिलाभ उग्रसेना ॥४॥विचारें या करी याचना मण्याची । सत्राजिताप्रति जगन्नाथ ॥५॥ईशकृपेहूनि मण्याची श्रेष्ठता । मानूनियां मूढा रुचलें न तें ॥६॥वासुदेव म्हणे लीला करी कृष्ण । आसक्ति दारुण विषयांधांची ॥७॥॥६७८॥पुढती सत्राजितबंधु तो प्रसेन । गांठितसे वन मृगयेलागी ॥१॥स्यमंतक तदा कंठांत तयाच्या । पंचानन त्याचा प्राण घेई ॥२॥सिंहासी त्या वधी ऋक्ष जांबवान । मणि तो घेऊन सदनी जाई ॥३॥सत्राजित करी प्रतीक्षा बंधूची । परी न येईचि परतूनि तो ॥४॥अंति तद्वधाचा कृष्णावरी आळ । घेऊनि तो खल बोलूंलागे ॥५॥वासुदेव म्हणे ऐकूनि ते वार्ता । शोधार्थ मण्याच्या जाई कृष्ण ॥६॥॥६७९॥साह्यास्तव त्याच्या नागरिक होते । वनीं प्रसेनाचें दिसलें प्रेत ॥१॥बधिलें तयासी सिंहानें हा बोध । होई, त्या सिंहास ऋक्ष वधी ॥२॥जाणुनि ऋक्षाचा घेती तदा शोध । पातले वनांत गुहाद्वारी ॥३॥द्वारीं सकलांसी ठेऊनियां कॄष्ण । स्वयें प्रवेशून पाही आंत ॥४॥तोंचि ऋक्ष्बाळ स्यमंतकमणि । खेळणें करुनि नाचे, पाही ॥५॥मणि घ्यावयासी कृष्ण पुढे जाई । ओरडली दाई पाहूनि त्या ॥६॥वासुदेव म्हणे तदा क्रोधाविष्ट । जांबवान युध्द करण्या येई ॥७॥॥६८०॥अंती होई घोर युध्द । अष्टविंशति दिवस ॥१॥वायां जातांचि शस्त्रास्त्रे । बाहुयुध्दासी प्रवर्ते ॥२॥अजिंक्याचि जांबवान । श्रांत जाहला लढून ॥३॥धर्म सुटे सर्वागासी । नवल जांबवंतालागी ॥४॥पराभव ऐसा त्याचा । कदा जाहला नव्हाता ॥५॥योध्दा प्रत्यक्ष हा राम । मानी मनी जांबवान ॥६॥अंति होऊनि सद्गद । करी स्तवन तो स्पष्ट ॥७॥वासुदेव म्हणे ज्ञाता । जाई शरण अच्युता ॥८॥॥६८१॥जांबवंत म्हणे ईश्वरा, सामर्थ्य । दाता, सकलांस एक तूंचि ॥१॥शारीर, मानस सकलही बल । अर्पिसी केवळ सकलां तूंचि ॥२॥पुराणपुरुषा भूतांचा तूं स्वामि । विरंचीचा धनि तूंचि एक ॥३॥सेतुबंधन तैं दशकंठवध । केलासी प्रत्यक्ष तूंचि देवा ॥४॥दीनावरी आतां दया करीं देवा । विनवी केशवा जांबवान ॥५॥ वासुदेव म्हणे जाणूनि ह्र्दय । द्रवला माधव दास्यभावें ॥६॥॥६८२॥अंगावरी हस्त फिरवूनि कृष्ण । सकलही श्रम दूर करी ॥१॥म्हणे ऋक्षपते, मण्याच्या शोधार्थ । हिंडतों वनांत सकल आम्ही ॥२॥गुहाद्वारावरी यादव बहुत । एकाकी मी एथ प्रवेशलों ॥३॥चोरिला मणि हा आळ घालवावा । एकचि जाणावा हेतु मम ॥४॥ऐकूनि ते ऋक्ष, कन्येसवें मणि । अर्पूनियां जनी धन्य होई ॥५॥वासुदेव म्हणे सामर्थ्य हरीचें । जाणती न साचें यादवही ॥६॥॥६८३॥गुहाद्वारी दिन द्वादश राहुनि । निराश होऊनि जाती दु:खें ॥१॥वसुदेवादिकां वृत्त निवेदिती । सत्राजिता देती शिव्याशाप ॥२॥आराधितां दुर्गा दृष्टांत त्यां देई । येईल सत्वरी यदवेंद्र ॥३॥जांबवतीसवें इतुक्यांत कृष्ण । भेटला येऊन सकलांप्रति ॥४॥स्वमंतकासवें कन्या रुपवती । पाहूनियां चित्तीं सकलां हर्ष ॥५॥वासुदेव म्हणे पुढती कृष्णानें । पाचारिलें प्रेमें सत्राजिता ॥६॥॥६८४॥निवेदूनि त्यासी सकल वृत्तांत । अर्पी स्यमंतक तयाप्रति ॥१॥सत्राजित तदा पश्चात्तापदग्ध । घेई स्यमंतक, परी दु:खी ॥२॥कृष्णकृपा आतां संपादावी कैसी । जनापवादही केंवी जावा ॥३॥रात्रंदिन तया हेचि लागे चिंता । शोधीतसे मार्गा अंती एका ॥४॥सुस्वभावी चारुहासिनी तयासी । कन्या एक होती सत्यभामा ॥५॥कृतवर्म्यादिक इच्छिती तियेसी । अर्पिली कृष्णासी तोचि तेणें ॥६॥वासुदेव म्हणे आंदन म्हणोनि । सत्राजित मणि अर्पी कृष्णा ॥७॥॥६८५॥कृष्ण म्हणे सत्राजिता । मणि मज नको तुझा ॥१॥सूर्यभक्त तूं, हा मणि । योग्य तुझ्या सन्निधानीं ॥२॥तुजलागीं नसे पुत्र । तेणें सकल अधिकार ॥३॥अंती आमुचाचि असे । मनि रक्षी हा आनंदें ॥४॥वासुदेव म्हणे कृष्ण । लोभ लवही धरी न ॥५॥ N/A References : N/A Last Updated : December 11, 2019 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP