मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|सर्वमतखंडन आणि ब्रह्मविद्यारहस्य|स्कंध १० वा|उत्तरार्ध| अध्याय ५८ वा उत्तरार्ध दशम स्कंधाचा ( उत्तरार्ध ) सारांश अध्याय ५० वा अध्याय ५१ वा अध्याय ५२ वा अध्याय ५३ वा अध्याय ५४ वा अध्याय ५५ वा अध्याय ५६ वा अध्याय ५७ वा अध्याय ५८ वा अध्याय ५९ वा अध्याय ६० वा अध्याय ६१ वा अध्याय ६२ वा अध्याय ६३ वा अध्याय ६४ वा अध्याय ६५ वा अध्याय ६६ वा अध्याय ६७ वा अध्याय ६८ वा अध्याय ६९ वा अध्याय ७० वा अध्याय ७१ वा अध्याय ७२ वा अध्याय ७३ वा अध्याय ७४ वा अध्याय ७५ वा अध्याय ७६ वा अध्याय ७७ वा अध्याय ७८ वा अध्याय ७९ वा अध्याय ८० वा अध्याय ८१ वा अध्याय ८२ वा अध्याय ८३ वा अध्याय ८४ वा अध्याय ८५ वा अध्याय ८६ वा अध्याय ८७ वा अध्याय ८८ वा अध्याय ८९ वा अध्याय ९० वा स्कंध १० वा - अध्याय ५८ वा सर्वमतखंडन आणि ब्रह्मविद्यारहस्य Tags : bhagavatpothiपोथीभागवत स्कंध १० वा - अध्याय ५८ वा Translation - भाषांतर ॥६९४॥मुनि निवेदिती लाक्षागृही दग्ध- । पांडव, हें वृत्त पसरे जनीं ॥१॥परी दुपदाच्या नगरी तयांसी । जन पुनरपि अवलोकिती ॥२॥ऐकूनि सात्यकीसवें यदुनाथ । तयांच्या भेटीस जाई तेथे ॥३॥पाहूनि तयांसी पांडव हर्षित । प्राण येतां प्रेत, उठतें तेंवी ॥४॥धर्म_ भीमाप्रति वंदि जगजेठी । अलिंगी प्रार्थासी अत्यानंदें ॥५॥माद्रीसुत पदीं जाहले विनम्र । पुढती कुशलप्रश्न होती ॥६॥सिंहासनी कृष्ण बैसवी धर्मातें । वंदी तों कृष्णातें नववधु ॥७॥वासुदेव म्हणे लज्जित, सस्मित। द्रौपदीचें मुख तदा होतें ॥८॥॥६९५॥सात्यकीसमेत अन्य यादवांही । प्रेमाने सत्कारी धर्मराज ॥१॥कुंतीप्रति तदा वंदी यदुनाथ । पृथेचा तैं कंठ रुद्ध होई ॥२॥साश्रुलोचनें ती आलिंगी कृष्णासी । नि:स्तब्धचि वृत्ति कांही काळ ॥३॥पुढती कुशलप्रश्न होती त्यांचे । रोमांच कुंतीतें ठाकताती ॥४॥म्हणे अक्रूरासी धाडीलेसी यदा । क्लेश दूर तदा झाले सर्व ॥५॥सांप्रत स्वयेंचि पातलासी आतां । लवही न पीडा उरली मनीं ॥६॥देवा, तूं जगाचा मित्र सर्वकाल । आपपर भेद नसे तुज ॥७॥वासुदेव म्हणे ह्र्दयनिवासी । क्लेश सर्व नाशी निज भक्तांचे ॥८॥॥६९६॥धर्म म्हणे देवा, दुर्लभ दर्शन । योग्यांतेंही, मन ह्र्ष्ट होई ॥१॥विषयनिमग्नां आह्मां भेटलासी । सान्निध्यें. आह्मांसी सौख्य होई ॥२॥चार मास इंद्रप्रस्थीं वसे कृष्ण । मित्र कृष्णार्जुन ग्रहर्षित ॥३॥मृगयेसी वनीं गेलें ते एकदां । व्याघ्रादि श्वापदां वधिते झाले ॥४॥श्राध्दकर्मायोग्य ऐसें बहु मृग । धाडिले धर्मास नगरीं प्रेमे ॥५॥तृषार्त अर्जुन होई तयावेळीं । यमुनेच्या तीरीं प्राप्त होती ॥६॥वासुदेव म्हणे निर्मल उदक । प्राशिती यथेच्छ करुनि स्नान ॥७॥॥६९७॥तीरावरी एक सुंदएरी त्यावएळी । तयांनी पाहिली सहजपणें ॥१॥पाठवूनि पार्था तदा यदुनाथें । सकल तियेचें पुशिलें वृत्त ॥२॥बोलली ती तदा कन्या मी सूर्याची । कालिंदी मजसी नाम असे ॥३॥वैकुंठाधिपति लाभो मज पति। आचरीं यासाठी तप येथें ॥४॥जोवरी न हेतु होईल तो सिध्द । राहीन एथेंच तोंवरी मी ॥५॥सूर्यविनिर्मित सदन या डोहीं । वास्तव्य त्या ठाई करितें सौख्यें ॥६॥वृत्ततें अर्जुनें कथिले कृष्नासी । घेई तिज रथी कृष्ण तदा ॥७॥सर्वज्ञ श्रीहरी जाई इंद्रप्रस्थी । वासुदेव कथी पुढिल वृत्त ॥८॥॥६९८॥निवेदिती मुनि वृत्त या पूर्वीचें । नगर धर्मातें निवासार्थ ॥१॥प्रार्थनेनें त्याच्या निर्मिलें अपूर्व । निर्माता त्य थोर विश्वकर्मा ॥२॥पार्थालागीं युध्दसामग्री लाभाया । करी यदुराया सारथ्यासी ॥३॥ खांडववनासी दिधलें अग्नीतें । अग्नि हृष्टचिन्हें तदा पार्था ॥४॥विजय स्यंदन, गांडीव धनुष्य । भातेही अक्षय्य, श्वेत अश्व ॥५॥तैसेचि अभेद्य कवचहि अर्पी । लाभे या पार्थासी तोष बहु ॥६॥वासुदेव म्हणे खांडव वनांत । मयासुर श्रेष्ठ असुर होता ॥७॥॥६९९॥तया असुरातें अभय लाभलें । तेणें संतोषलें मन त्याचें ॥१॥संतोषें त्या सभा निर्मियेली एक । होती अलौकिक जगामाजी ॥२॥सभेत त्या जल तेंचि स्थल भासे । स्थल तेंचि भासे जल तेथें ॥३॥निवेदिती शुक असो, परीक्षिता । हेतू द्वारकेचा धरी कृष्ण ॥४॥घेऊनि निरोप सकळ आप्तांचा । गांठिली द्वारका कन्येसवें ॥५॥यादवांसमेत येऊनि सदनी । मुहूर्त पाहूनि एक श्रेष्ठ ॥६॥वासुदेव म्हणे कालिंदीपरिणय । करुनी केशव सुखी होई ॥७॥ ॥७००॥विंदानुविंद ते राव अवंतीचे । मांडलिक होते कौरवांचे ॥१॥यास्तव कौरवां संतोष ते देती । ’ मित्रविंदा ’ त्यांसी भगिनी एक ॥२॥कृष्णासी वरावें स्वयंवरामाजी । इच्छा ऐसी होती मनीं तिच्या ॥३॥कौरवभयानें विरोध तिजसी । नृपाळ करिती नाईलाजें ॥४॥राजाधिदेवी जे वसुदेवभगिनी । माता तेचि जनीं कन्येची त्या ॥५॥वासुदेव म्हणे सर्वांच्या समक्ष । हर्रुनि तियेस नेई हरि ॥६॥॥७०१॥कोसलाधिपति ’ नग्नजित ’ राजा । कन्या नामें ’ सत्या ’ तयालागीं ॥१॥व्याघ्रासम क्रुर सप्तसंख्य वृष । नृपाचे विख्यात होते जनीं ॥२॥वेसन त्या सप्तां घालील जो तयां । अर्पावी ते सत्या नृपहेतू ॥३॥यदुश्रेष्ठ कृष्ण पण ते ऐकूनि । स्वसैन्य घेऊनि नगरीं गेला ॥४॥सत्कार तयाचा केला नृपाळानें । सत्येनें पाहिलें श्रीकृष्णासी ॥५॥पाहतांचि तया आकष्ट ती होई । म्हणे केंवी होई लाभ याचा ॥६॥अवतारलीला कराया जो आला । प्राप्त तो मजला होवो पति ॥७॥वासुदेव म्हणे लावुनि पणासी- । पुण्य, सत्या इच्छी श्रीकृष्णातें ॥८॥॥७०२॥रावही कृष्णासी म्हणे काय सेवा । घडावी केशवा, तव चरणांची ॥१॥प्रसन्नता तव लाभाया करावें । काय तें कथावें जगत्पते ॥२॥तदा कथी कृष्ण, क्षत्रियांसी वर्ज्य । याचना हें शास्त्र जाणतोसी ॥३॥परी कुलस्नेह वाढावा म्हणोनि । इच्छितसें मनीं कन्या तव ॥४॥अर्पिणार नाहीं तिच्यास्तव कांही । एकचि हे पाही इच्छा मम ॥५॥ह्र्ष्टचित्तें तदा बोले नग्नजित । ऐसा वरश्रेष्ठ कोण अन्य ॥६॥वासुदेव म्हणी निवेदूनि पण । राव म्हणे धन्य करीं मज ॥७॥॥७०३॥ऐकुनि तत्काळ कसूनियां कटि । सप्त वृषभांसी पाही स्वयें ॥१॥वेसण तयांसी घालूनि विक्रमें । दर्पहीन केलें तयांप्रति ॥२॥चकित तैं राव होऊनि तोषला । अर्पिली प्रभूला ’ सत्या ’ हर्षे ॥३॥सविधि सोहळा होई विवाहाचा । आंदणही राजा अर्पी बहु ॥४॥सालंकृत दासी अर्पी त्रिसहस्त्र । धेनू दश सहस्त्र अर्पी प्रेमें ॥५॥नव सहस्त्र ते अर्पियेले गज । रथ नव लक्ष शतधा अश्वां ॥६॥वासुदेव म्हणे नव पद्म दूत । अर्पी नग्नजित कृष्णाप्रति ॥७॥॥७०४॥पाठवणी ऐसी केली आनंदानें । सन्मानार्थ सैन्यें पाठविलीं ॥१॥मार्गी विषादें त्या अडविती राजे । निवारिलें त्यातें अर्जुनानें ॥२॥पुढती आंदणासह यदुपति । सत्येसवें येती द्वारकेसी ॥३॥श्रुतकीर्ति नामें वसुदेवभगिनी । कन्येसी अर्पूनि तुष्ट होई ॥४॥संतर्दनआदि बंधु त्या कन्येचे । नाम ’ भद्रा ’ ऐसें सुविख्यात ॥५॥मद्राधिपतीची कन्या जे ’ लक्ष्मणा ’ । करुनि हरणा स्वयंवरी ।\६॥वरिली, यापरी या अष्ट नाइका । वासुदेव ऐका पुढती कथी ॥७॥ N/A References : N/A Last Updated : December 11, 2019 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP