मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|सर्वमतखंडन आणि ब्रह्मविद्यारहस्य|स्कंध १० वा|उत्तरार्ध| अध्याय ६७ वा उत्तरार्ध दशम स्कंधाचा ( उत्तरार्ध ) सारांश अध्याय ५० वा अध्याय ५१ वा अध्याय ५२ वा अध्याय ५३ वा अध्याय ५४ वा अध्याय ५५ वा अध्याय ५६ वा अध्याय ५७ वा अध्याय ५८ वा अध्याय ५९ वा अध्याय ६० वा अध्याय ६१ वा अध्याय ६२ वा अध्याय ६३ वा अध्याय ६४ वा अध्याय ६५ वा अध्याय ६६ वा अध्याय ६७ वा अध्याय ६८ वा अध्याय ६९ वा अध्याय ७० वा अध्याय ७१ वा अध्याय ७२ वा अध्याय ७३ वा अध्याय ७४ वा अध्याय ७५ वा अध्याय ७६ वा अध्याय ७७ वा अध्याय ७८ वा अध्याय ७९ वा अध्याय ८० वा अध्याय ८१ वा अध्याय ८२ वा अध्याय ८३ वा अध्याय ८४ वा अध्याय ८५ वा अध्याय ८६ वा अध्याय ८७ वा अध्याय ८८ वा अध्याय ८९ वा अध्याय ९० वा स्कंध १० वा - अध्याय ६७ वा सर्वमतखंडन आणि ब्रह्मविद्यारहस्य Tags : bhagavatpothiपोथीभागवत स्कंध १० वा - अध्याय ६७ वा Translation - भाषांतर ॥७७७॥राव म्हणे मुने, चरित्र रामाचें । ऐकावेसें वाटे अन्य कांहीं ॥१॥निवेदिती मुनि वानर द्विविद । भौमासुरमित्र होता एक ॥२॥मित्रवधें तया होता बहु क्रोध । व्हावें ऋणमुक्त ऐसें चिंती ॥३॥जाळपोळ तेणें बहु आरंभिली । उद्धस्तचि केलीं नगरें ग्रामें ॥४॥द्वारावतीवरी कटाक्ष तयाचा । सान्निध्यें आनर्ता पीडी बहु ॥५॥वासुदेव म्हणे विविध प्रकारें । दुष्कर्म मांडिलें कपिनें ऐसें ॥६॥॥७७८॥दशसहस्त्र नागांचें । बळ होतें त्या कपीतें ॥१॥फुगवी सागर तो कदा । बुडवी तीरस्थ प्रदेशां ॥२॥ऋषिआश्रमचि मोडी । यज्ञक्रियाही उच्छेदी ॥३॥मल-मूत्रविसर्जन । करी अग्निकुंडी जाण ॥४॥स्त्रिया-पुरुषां गुहेंत । चिणूनियां वधी दुष्ट ॥५॥वासुदेव म्हणे ऐसा । उपद्रव होई लोकां ॥६॥॥७७९॥रैवतकावरी एकदां बलराम । स्त्रियांसवें जाण क्रीडा करी ॥१॥वारूणीधुंद तो गायन आरंभी । द्विविद त्या भागी तदा होता ॥२॥येऊनियां वृक्ष हालवी तो तेथें । शब्दही कपीचे करी बहु ॥३॥मर्कटचेष्टा ती पाहिली स्त्रियांनी । परी राम मनी स्वस्थ होता ॥४॥मर्कट तैं वेडी-वांकुडीं वदनें । करुनि स्त्रियांतें भेडसावी ॥५॥तदा राम एक मारी त्या पाषाण । परी चुकवून जाई कपि ॥६॥वासुदेव म्हणे वारुणीकलश । रामाचा तो कीश पळवी दूर ।\७॥॥७८०॥ओढूनि, कलश, फाडिलीं स्त्रीवस्त्रें । पाहुनि रामातें क्रोध येई ॥१॥आठवूनि पूर्व दुष्कृत्यें वधार्थ । जाहला तैं सिध्द बलराम ॥२॥नांगर-मुसळ घेतलीं करांत । ताडी तैं द्विविद वृक्ष एक ॥३॥रामानें वृक्षासी छिन्न भिन्न केलें । वृक्ष तैं आदळें कपिशिरी ॥४॥वृक्षामागें वृक्ष फेकूनियां अंती । कपि करी वृष्टि पाषाणांची ॥५॥अंती द्वंद्वयुध्दा प्रवृत्त जाहला । प्रहार त्या केला रामें एक ॥६॥मुष्टिप्रहारें त्या ओकला रुधिर । पडे धरणीवर गतप्राण ॥७॥वासुदेव म्हणे होई पुष्पवृष्टि । जाई सदनासी बलराम ॥८॥ N/A References : N/A Last Updated : December 12, 2019 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP