मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|सर्वमतखंडन आणि ब्रह्मविद्यारहस्य|स्कंध १० वा|उत्तरार्ध| अध्याय ६५ वा उत्तरार्ध दशम स्कंधाचा ( उत्तरार्ध ) सारांश अध्याय ५० वा अध्याय ५१ वा अध्याय ५२ वा अध्याय ५३ वा अध्याय ५४ वा अध्याय ५५ वा अध्याय ५६ वा अध्याय ५७ वा अध्याय ५८ वा अध्याय ५९ वा अध्याय ६० वा अध्याय ६१ वा अध्याय ६२ वा अध्याय ६३ वा अध्याय ६४ वा अध्याय ६५ वा अध्याय ६६ वा अध्याय ६७ वा अध्याय ६८ वा अध्याय ६९ वा अध्याय ७० वा अध्याय ७१ वा अध्याय ७२ वा अध्याय ७३ वा अध्याय ७४ वा अध्याय ७५ वा अध्याय ७६ वा अध्याय ७७ वा अध्याय ७८ वा अध्याय ७९ वा अध्याय ८० वा अध्याय ८१ वा अध्याय ८२ वा अध्याय ८३ वा अध्याय ८४ वा अध्याय ८५ वा अध्याय ८६ वा अध्याय ८७ वा अध्याय ८८ वा अध्याय ८९ वा अध्याय ९० वा स्कंध १० वा - अध्याय ६५ वा सर्वमतखंडन आणि ब्रह्मविद्यारहस्य Tags : bhagavatpothiपोथीभागवत स्कंध १० वा - अध्याय ६५ वा Translation - भाषांतर ॥७६२॥पुढती एकदां नंदभेटीस्तव । जाई हलधर गोकुळांत ॥१॥गोप-गोपी तया आलिंगिती प्रेमें । रामानें वंदिलें वडिलांप्रति ॥२॥नंद- यशोदा त्या देती आशीर्वाद । यशोदा सद्गद अंकी घेई ॥३॥अंगावरी प्रेमें फिरवई ते हस्त । बोले तदा नंद कांतेसवें ॥४॥राम-कृष्ण तुह्मीं जगाचे ईश्वर । आमुतें चिरकाल संरक्षावे ॥५॥पुढती बलराम अधिकारासम । करुनि वर्तन सुखवी गोपां ।\६॥वदन, दर्शन, हस्तस्पर्शभेटी । यथाधिकारचि वागे प्रेमें ॥७॥गोप-गोपिका तैं भोंवती बैसती । कुशल पुशिती श्रीकृष्णाचे ॥८॥वसुदेवादीचें इच्छिताती क्षेम । येई कां स्मरण म्हणती तुह्मा ॥९॥वासुदेव म्हणे कंसवधें सौख्य । लाभे सुजनांस म्हणती गोप ॥१०॥॥७६३॥वसुदेव-देवकींसी । तुह्मीं विमुक्त केलेंती ॥१॥कालयवना वधून । जरासंधातें जिंकून ॥२॥द्वारकेंत केला वास । आह्मां रुचलें तें कृत्य ॥३॥वासुदेव म्हणे बाल-। मित्रांचा हा भाव ॥४॥॥७६४॥प्रेमावलोकनें संतुष्ट होऊनि । पुढती येऊनि पुशिती गोपी ॥१॥रामा, आतां केंवी स्मरण आमुचें । येईल कृष्णातें निष्कारण ॥२॥सहस्त्रावधि त्य स्त्रियांमाजी दंग । यशोदा-नंदांस स्मरतो काय ॥३॥भेटाया मातेसी एकवार तरी । येईल कां हरी इकडे कदा ॥४॥गोपीकृत सेवा स्मरतो तो कांरे । आह्मां ठकविलें श्रीकृष्णानें ॥५॥त्यागूनि सर्वस्व घेतां त्याचा छंद । त्यजूनि आह्मांस सहज गेला ॥६॥वासुदेव म्हणे मानभावी कृष्ण । बोलल्या वचन बलरामातें ॥७॥॥७६५॥एकदां तो आह्मां बोलला उपकार । फेडावया बळ नसे मज ॥१॥बोलूनि हें करीं देऊनियां तुरी । गेला कींरें दुरी त्यजूनि आम्हां ॥२॥अन्य गोपी तदा बोलल्या विश्वास । पौर ललनांस काय त्याचा ॥३॥म्हणताती कोणी आपणासमचि । पाहूनि तत्कृति भुलतील त्या ॥४॥अन्य कांही गोपी बोलल्या त्यावेळीं । कासया ती हवी स्मृति आतां ॥५॥व्यर्थचि ती स्मृति दु:खाचें कारण । नवलकारी प्रेम वासुदेवा ॥६॥॥७६६॥अन्य गोष्टी करा म्हणताती कोणी । लाभ न बोलूनि कांही आतां ॥१॥आमुच्यावांचूनि असेल तो सुखी । तरी न आह्मांसी दु:ख त्याचें ॥२॥आमुचेंही काय अडेल त्यावीण । खातोंचि की अन्न कवण्यापरी ॥३॥सर्वदा तो सुखी आह्मी मात्र दु:खी । अंतर इतुकेंचि असे अल्प ॥४॥आधींच स्त्रीभाव त्यांत बहु प्रेम । मांडिले रुदन अंती त्यांनी ॥५॥वासुदेव म्हणे कथितां निरोप । न होईचि चित्त शांत त्यांचे ॥६॥॥७६७॥अंतीं बलराम सांत्वन करुनि । तोषवी त्यां मनीं महाकष्टें ॥१॥पुढती तयानें केल्या बहु क्रीडा । नव गोपिकांचा हरिला भाव ॥२॥दोन मास तेथे राहुनियां राम । होई क्रीडामग्न गोकुळांत ॥३॥वनी-उपवनीं तेंवी चांदण्यांत । रामानें विलास केले बहु ॥४॥वासुदेव म्हणे यमुनाकषर्ण । केले तें ऐकून घ्यावें आतां ॥५॥॥७६८॥अमृतासवें जी उत्पन्न जाहली । वारुणी धाडिली वरुणानें ती ॥१॥वृक्षढोल्यांतूनि पाघळूं लागली । सुगंधित झालीं वनें तदा ॥२॥गोपींसवें रामें प्राशिली वारुणी । धुंदी तैं लोचनी येई त्याच्या ॥३॥न नामाजी हर्षे हिंडे गोपींसवें । तदा त्या आठवे जलक्रीडा ॥४॥होता त्या स्थळींचि पाचारी नदीसी । यमुना न त्याची वाणी ऐके ॥५॥वासुदेव म्हणे कोपूनि तैं राम । करी पराक्रम काय पहा ॥६॥॥७६९॥नांगराच्या फाळें ओढूनि यमुना । बोलला वचना क्रोधें तिज ॥१॥दुष्टे, पाचारितां आलीस न आतां । प्रवाह बहुधा करितों तुझे ॥२॥वदूनि कालिंदी म्हणे तै रामासी । क्षमावें मजसी भ्रमलें मन ॥३॥ऐकूनियां राम सोडी कालिंदीसी । प्रवेशे उदकीं गोपीसवें ॥४॥क्रीडूनि यथेच्छ बाहेरी पातला । तोषवी तयाला तदा लक्ष्मी ॥५॥सुवर्णकमलमाला आभरणें । तेंवी दिव्य वस्त्रें अर्पी तया ॥६॥ऐरावतासम शोभला तै राम । कालिंदीतें जाण वक्रत्व ये ॥७॥वासुदेव म्हणे अद्यापि ते वक्र । बलाची ते साक्ष बलरामाच्या ॥८॥ N/A References : N/A Last Updated : December 12, 2019 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP