मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|सर्वमतखंडन आणि ब्रह्मविद्यारहस्य|स्कंध १० वा|उत्तरार्ध|
अध्याय ५० वा

स्कंध १० वा - अध्याय ५० वा

सर्वमतखंडन आणि ब्रह्मविद्यारहस्य


५९८
शुकदेव मुनिश्रेष्ठ । कथिती नृपालागीं वृत्त ॥१॥
कपटानेंचि कपटी दैत्यां । वधिलें ऐकिली ती कथा ॥२॥
आतां धर्मावभासक । वधिले जरासंधादिक ॥३॥
दैत्य कैसे तें ऐकावें । लीलाकर्म ध्यानीं घ्यावें ॥४॥
अस्ति, प्राप्ति ऐशा दोन । कांता कंसाप्रति जाण ॥५॥
जरासंधाच्या त्या कन्या । वैधव्यानें खिन्नमना ॥६॥
वासुदेव ह्मणे दु:ख । निवेदिती त्या पित्यास ॥७॥
५९९
वृत्तांतें त्या दु:खी होई जरासंध । पावला तो क्रोध अंतरांत ॥१॥
यादवविहीन पृथ्वी हे करीन । निश्चय दारुण करी ऐसा ॥२॥
अक्षौहिणीत्रय सैन्य होतें त्याचें । विंशति संख्येतें मिळवी अन्य ॥३॥
त्रयोविंशसंख्य अक्षौहिणी सैन्य । यापरी घेऊन परम क्रोधें ॥४॥
मथुरानगरी वेढिली तयानें । भयाभीत तेणें नगरवासी ॥५॥
वासुदेव ह्मणी पाहुनि तें हरि । विचार अंतरी करी स्वयें ॥६॥
६००
भूभारहरणकार्य हें म्हणून । समय जाणून हाचि मनीं ॥१॥
म्हणे संरक्षण व्हावया साधूंचे । मगधाधिपातें वधणें योग्य ॥२॥
परी प्रथम या वधूनि न लाभ । आणो हा दुष्टांस मेळ्वूनि ॥३॥
दुष्टसंहाराच्या कार्यी दुष्टाचेंचि । साह्य व्हावें ऐसी युक्ति त्याची ॥४॥
चिंती मनीं ऐसें तोंचि दिव्य दोन । रथ नभांतून प्राप्त होतॊ ॥५॥
सारथी, आयुधें होतॊ त्य रथांत । पाहुनि आनंद कृष्णाप्रति ॥६॥
वासुदेव म्हणे हल-मुसळादि । आयुधें रामासी दावी कृष्ण ॥७॥
६०१
रामाप्रति कृष्ग्ण म्हणे या रथांत । बैसें यादवांस अभय देऊं ॥१॥
पुढती लेऊनि कवच त्य रथीं । बैसे जगजेठी अत्यानंदें ॥२॥
चतुरंग सैन्य घेऊनि आपुलें । बाहेरी पातले नगराच्या ॥३॥
सारथ्य कृष्णाचें करितो दारुक । पांचजन्य शंख फुंकी कृष्ण ॥४॥
नाद तो ऐकुनि कांपे जरासंध । कृत्रिम आवेश धरुनि बोले ॥५॥
वासुदेव ह्मणे मगधाधिपाची । भाषा अपूर्व ती श्रवण करा ॥६॥
६०२
नराधमा, कृष्णा, मातुलवधका । दुष्टभाव दुष्टा, सिध्द तव ॥१॥
परी अर्भक तूं परिपालनीय । शोभे न यास्तव तुजसी युध्द ॥२॥
आलासी तैसाचि माघारा तूं जाई । रामातेंही पाही वदला दैत्य ॥३॥
रामा, सामर्थ्याचा असेल विश्वास । तरी हो युध्दास सज्ज आतां ॥४॥
देहपतनें तूं जासील स्वर्गासी । अथवा मजसी वधिसील ॥५॥
वासुदेव म्हणे ऐकूनि ते वाणी । बोलो चक्रपाणी जरासंधा ॥६॥
६०३
जरासंधा, सन्निपात ज्वरयुक्त । बोले जेंवी स्वैर, वदसी तेंवी ॥१॥
मरणोन्मुखाचें भाषण हें वाटे । आपुल्याचि मुखें न कथीं गुण ॥२॥
स्तवितील अन्य, ऐसी करीं कृति । भूषणास्पद ती तुजसी जावें ॥३॥
आपुल्याचि मुखें स्तविसी आपणा । ऐकावें वचना ऐशा केंवी ॥४॥
ऐकूनि तें क्रोध येई जरासंधा । घालुनि गराडा वेढी कृष्णा ॥५॥
वासुदेव म्हणे युध्दासी प्रारंभ । होतां मथुरेंत द्विधाभाव ॥६॥
६०४
वीरश्रेष्ठ गेले सर्व रणांगणी । ललना जाऊनि सौधदेशीं ॥१॥
तैशाच गोपुरीं बैसल्या पहाया । भयाकुल झाल्या परी मनीं ॥२॥
वेढा जरासंधें देतां राम-कृष्णां । दर्शन न कोणा होई त्यांचे ॥३॥
दिसेनासे होतां रथ त्या दोघांचे । स्त्रिया-बालकांतें दु:ख बहु ॥४॥
वासुदेव म्हणे मूर्च्छा कोणा येई । कृष्णावरी पाहीं ऐसें प्रेम ॥५॥
६०५
निज सैन्य बहु जाणूनि पीडित । दिव्य टणत्कार करी कृष्ण ॥१॥
क्षणांत वर्षाव करुनि शरांचा । पाडिला फडशा अरिसैन्याचा ॥२॥
अग्निवलय तें भासलें धनुष्य । छिन्न भिन्न गज पडले बहु ॥३॥
मरुनिया रथी, सारथी- रथांची । रणीं दिसतांती शकलें तदा ॥४॥
भग्न हस्तपाद सर्वत्र रणांत । रुधिरप्रवाह सरितांसम ॥५॥
सर्पचि प्रवाही भासले त्या हस्त । मस्तकें ती कच्छ भासताती ॥६॥
गजशरीरें तीं द्वीपेंचि भासली । मृताश्व सुसरी, प्रवाही त्या ॥७॥
वासुदेव ह्मणे भग्नावयव ते । मत्स्य, केश तेथें, शैवालचि ॥८॥
६०६
मणिभूषणें मृतांचीं । पुलिनें तीं भासताती ॥१॥
भयाभीत होती भ्याड । स्फुरती तदा वीरभुज ॥२॥
श्रीहरीचा हा प्रताप । रामादिकांचा स्वतंत्र ॥३॥
सहज लीला हे तयांची । वर्णनीय मनुजांप्रति ॥४॥
एक जरासंध मात्र । पुढती राहिला जिवंत ॥५॥
राम-कृष्ण दोघे सिंह । धरिला रामें जरासंध ॥६॥
वरुणपाशें करितां बध्द । कृष्न सोडवी तयास ॥७॥
करी चातुर्ये हा खेळ । कार्य जाणूनि पुढील ॥८॥
वासुदेव म्हणे ऐसी । लीला अतर्क्य हरीची ॥९॥
६०७
खिन्न होऊनियां लाजूनि तो वनी । तपासी निघूनि जाई दैत्य ॥१॥
शिशुपालादि त्या मार्गात भेटती । निवारिती त्यासी करुनि बोध ॥२॥
कर्माचा हा खेळ ह्मणती ते तया । नव्हेचि यादवां बळ ऐसें ॥३॥
यापरी सांत्वन करुनि तयातें । एकाकी गृहातें पाठविती ॥४॥
वासुदेव म्हणे शूरासी हें दु:ख । मरणाहूनि कष्ट देई मनीं ॥५॥
६०८
इकडे रणांत राम-कृष्णांवरी । देवांनी वर्षीलीं सुमनें बहु ॥१॥
सैन्याचा सागर आटला क्षणांत । साधु साधु शब्द करिती देव ॥२॥
मथुरानिवासी जन हर्षिन्नले । समोरे पातले श्रीकृष्णाच्या ॥३॥
सूत-मागधादि स्तविती वीरांसे । येती मथुरेसी ऐसे देव ॥४॥
वाद्यनाद तदा कोंदला गगनीं । दिधला विप्रांनी आशीर्वाद ॥५॥
वासुदेव म्हणे सडे केशराचे । शिंपिती आनंदे मार्गी जन ॥६॥
६०९
गुढया, तोरणें, पताका । उभारुनि करिति मोदा ॥१॥
प्रेक्षकांनी भरले मार्ग । फुलूनियां जाती सौंध ॥२॥
दधि, अक्षता, सुमनें । दुर्वांकुर पुष्पें प्रेमें ॥३॥
राम-कृष्णांवरी ऐसा । होई वर्षावचि साचा ॥४॥
रणीं संपादितधन । उग्रसेनातें संपूर्ण ॥५॥
अर्पियेलें श्रीकृष्णानें । हर्ष पाहूनि जनांतें ॥६॥
वासुदेव ह्मणे ऐसी । वंद्य कृति श्रीकृष्णाची ॥७॥
६१०
सप्त दश वेळां इतुकेंचि सैन्य । घेऊनि दारुण जरासंध ॥१॥
चालूनियां येतां राम-कृष्ण त्याची । करिताती स्थिति रणीं हेचि ॥२॥
धरितां रामानें कृष्ण सोडी तया । कार्य जाणूनिया संहाराचें ॥३॥
स्वारीपूर्वी एका एकदां पुढती । यवन कृष्णासी गांठी एक ॥४॥
’ कालवयन ’ तो नारदवचनें । युध्दार्थ हौसेनें प्राप्त झाला ॥५॥
यादवचि तुज युध्दालागीं योग्य । कथूनि नारद खुलवी तया ॥६॥
कोटित्रय म्लेच्छ घेऊनि तो आला । मथुरेसी दिधला वेढा तेणें ॥७॥
वासुदेव म्हणे तदा राम -कृष्ण । होती चिंतामग्न, चिंतीताती ॥८॥
६११
यादववीरां या आपत्ती कां येती । विघ्न नूतनचि प्राप्त झालें ॥१॥
चार दिनीं येई मगधाची वेळ । येतां तो वधील यादवांतें ॥२॥
बांधुनि वा त्यांसी नेईल नगरीं । जातां यवनावरी आह्मी दोघे ॥३॥
चिंतूनियां अंती सागरी द्वारका । निर्मावी हा त्यांचा ठरला बेत ॥४॥
नेऊनि या स्थानी यादवां आपण । करावें दारुण म्हणती युध्द ॥५॥
वासुदेवं म्हणे विश्वकर्म्याप्रति । मग आज्ञापिती राम-कृष्ण ॥६॥
६१२
लांब रुंद बारा योजनें तयानें । नगर निर्मिलें सागरांत ॥१॥
सभोवतीं दुर्ग रचिला अभेद्य । रचना अपूर्व द्वारकेची ॥२॥
कनकमंदिरें मनोहर मार्ग । सुवर्णकलश सदनांवरी ॥३॥
जागजागी रम्य उपवनें तेथें कल्पलता डौलें शोभताती ॥४॥
देवालये बहु राजभवनेंही । झळकती पाहीं तयास्थानीं ॥५॥
पारिजात तेंवी ’ सुधर्मा ’ सभा ती । इंद्र श्रीकृष्णासी अर्पी प्रेमें ॥६॥
शोक, मोह, क्षुधा, तृषा तेही तेथें । बैसेल तयातें न करि बाधा ॥७॥
वासुदेव ह्मणे अर्पिताती देव । कृष्णासी अपूर्व निज वस्तु ॥८॥
६१३
वरुणें अर्पिले दिव्य शामकर्ण । कुबेर संपूर्ण निधी अर्पी ॥१॥
जें जें ज्या जवळी अर्पिती तें कृष्णा । अपूर्व ते जनां नगरी होई ॥२॥
लाभलें देवत्व जयाच्या कृपेनें । देव त्या प्रेमाणे सेविताती ॥३॥
योगसामर्थे त्यास्थळीं यादवांसी । ठेऊनि रामासी वदला कृष्ण ॥४॥
संरक्षी  तुं यांसी जातो मी युध्दार्थ । कथूनि नि:शस्त्र निघूनि जाई ॥५॥
वासुदेव म्हणे कौतुक हरीचें । वर्णवेल कैसे सामान्यासी ॥६॥

N/A

References : N/A
Last Updated : December 10, 2019

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP