मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|सर्वमतखंडन आणि ब्रह्मविद्यारहस्य|स्कंध १० वा|उत्तरार्ध| अध्याय ५९ वा उत्तरार्ध दशम स्कंधाचा ( उत्तरार्ध ) सारांश अध्याय ५० वा अध्याय ५१ वा अध्याय ५२ वा अध्याय ५३ वा अध्याय ५४ वा अध्याय ५५ वा अध्याय ५६ वा अध्याय ५७ वा अध्याय ५८ वा अध्याय ५९ वा अध्याय ६० वा अध्याय ६१ वा अध्याय ६२ वा अध्याय ६३ वा अध्याय ६४ वा अध्याय ६५ वा अध्याय ६६ वा अध्याय ६७ वा अध्याय ६८ वा अध्याय ६९ वा अध्याय ७० वा अध्याय ७१ वा अध्याय ७२ वा अध्याय ७३ वा अध्याय ७४ वा अध्याय ७५ वा अध्याय ७६ वा अध्याय ७७ वा अध्याय ७८ वा अध्याय ७९ वा अध्याय ८० वा अध्याय ८१ वा अध्याय ८२ वा अध्याय ८३ वा अध्याय ८४ वा अध्याय ८५ वा अध्याय ८६ वा अध्याय ८७ वा अध्याय ८८ वा अध्याय ८९ वा अध्याय ९० वा स्कंध १० वा - अध्याय ५९ वा सर्वमतखंडन आणि ब्रह्मविद्यारहस्य Tags : bhagavatpothiपोथीभागवत स्कंध १० वा - अध्याय ५९ वा Translation - भाषांतर ॥७०५॥निवेदिती शुक राया, परीक्षिता । उन्मत्त जाहला भौमासुर ॥१॥वरुणाचें छत्र, अदितिकुंडलें । रत्नागिरी नेले देवेंद्राचे ॥२॥भामेच्या मंदिरी वृत्त हे इंद्रानें । येऊनि दु:खानें कथिलें कृष्णा ॥३॥गरुडावरी तैं भामेसवें कृष्ण । सत्वरी बैसून क्रमी पंथ ॥४॥प्राग्जोतिष त्या पुराप्रति गेला । निवेदी जनांला वासुदेव ॥५॥॥७०६॥गरुडावरी कां बैसला श्रीकृष्ण । वृत्त तें कथन करिती शुक ॥१॥सभोवतीं होतें पर्वत पुराच्या । बळकट त्यांच्यावरी दुर्ग ॥२॥सुसज्ज भोंवती होता भव्य तट । सजल खंदक सभोवार ॥३॥झंझावात तेंवी अग्नीचा वर्षाव । नगराबाहेर समयीं होई ॥४॥शत्रुवधास्तव बळकट पाश । पसरले तेथ चातुर्यानें ॥५॥वासुदेव म्हणे येतांचि हरीनें । घोर तीं साधनें नष्ट केलीं ॥६॥॥७०७॥चूर्ण करुनि पर्वत । छिन्न भिन्न केला तट ॥१॥सुदर्शनें जल, अग्नि । वायु टाकिला शोषूनि ॥२॥खड.गें छेदियेले पाश । केला पांचजन्यनाद ॥३॥ऐकूनि तो शंखध्वनि । वैरी भयाभीत मनीं ॥४॥मुरदैत्य जो जळांत । निजला होता तो जागृत ॥५॥होऊनियां, पंचमुखें । विस्फारुनि धांवे क्रोधें ॥६॥वासुदेव म्हणे दैत्य । गर्जूनियां फेंकी शूल ॥७॥॥७०८॥दैत्यगर्जनेनें कोंदलें गगन । त्रिशूलछेदन हरिनें केलें ॥१॥पंचमुखांवरी सोडी पंचबाण । गदाही छेदून टाकी कृष्ण ॥२॥अंतीं सुदर्शनें उडवी मस्तक । धांवले तैं पुत्र सप्त त्याचे ॥३॥ताम्र, अंतरिक्ष, पवन, विभावसु । नभस्वान, वसु, अरुण नामें ॥४॥’ पीठ ’ नामें सेनापति तयां साह्य । जाहलें तुमुल युध्द तदा ॥५॥वासुदेव म्हणे अंती जगन्नाथें । बधिलें तयातें करुनि खेळ ॥६॥॥७०९॥ऐरावर कुलोत्पन्न । गज असंख्य घेऊन ॥१॥येई भौमासुर अंती । शतध्नी ते सोडी शक्ति ॥२॥अन्य दैत्यही शौर्यानें । शस्त्रें चालविती यत्नें ॥३॥परी कृष्णाच्या पुढती । काय चाले त्यांची शक्ति ॥४॥अवघें सैन्य एका क्षणीं । गेलें यमाच्या सदनीं ॥५॥वासुदेव म्हणे आतां । भौम एकचि राहिला ॥६॥॥७१०॥फेंकिली तयानें पक्ष्यावरी शक्ति । काय बापुडी ती गरुडा करी ॥१॥इतुक्यांत खड्गाघातें श्रीहरीनें । छेडूनि पाडिलें शिर खालीं ॥२॥हाहा:कार तदा होई दैत्यांमाजी । साधु साधु ऐसी मुनिवाणी ॥३॥पुष्पांचा वर्षाव करिताती देव । प्रगटे प्रत्यक्ष भूमि तदा ॥४॥हरिल्या ज्या वस्तु पुत्रानें त्या स्वयें । अर्पूनि वंदिलें कृष्णाप्रति ॥५॥स्तवूनि तयासी भौमासुरपुत्र । नामें भगदत्त पुढती करी ॥६॥म्हणे कृपाहस्त ठेवीं याच्या शिरी । भूमीची पुरविली इच्छा कृष्णें ॥७॥वासुदेव म्हणे मंदिरीं दैत्याच्या । प्रवेशला आतां स्वयें कृष्ण ॥८॥॥७११॥कन्या षोडश सहस्त्र । चिंतामग्न शताधिक ॥१॥राजे-देवसिध्दादींच्या । भौमे हरिल्या ज्या होत्या ॥२॥कुमारिका त्या उपवर । अवलोकी गदाधर ॥३॥कृष्णदर्शनें कन्यका । वरिती स्वमनीं अच्युता ॥४॥स्नानादिक त्यां घालूनि । पालखींत बैसवूनि ॥५॥धाडी द्वारकापुरीसी । संगें गज चतु:षष्ठी ॥६॥ऐरावत वंशोद्भव । चतुर्दत पुष्ट देह ॥७॥वासुदेव म्हणे द्रव्य । धाडी अपार केशव ॥८॥॥७१२॥पुढती श्रीकृष्ण देवेंद्रसदनीं । भामेसी घेऊनि प्राप्त होई ॥१॥आदितिमातेचीं अर्पिलीं कुंडलें । अदितीचें धालें चित्त तदा ॥२॥इंद्र-इंद्रायणी पावलीं संतोष । पूजिती कृष्णास भामेसवें ॥३॥वसतां स्वर्गात सत्यभामेप्रति । पारिजातकाची इच्छा होई ॥४॥इंद्रादिक देव लढलें त्यास्तव । लाभला विजय अंती कृष्णा ॥५॥उत्पाटुनि तदा पारिजातवृक्ष । येई द्वारकेस जगन्नाथ ॥६॥वासुदेव म्हणे सुगंधलोलुप । पातले मधुप द्वारकेसी ॥७॥॥७१३॥महामुनी शुक बोलले नृपासी । क्षुद्रता नराची न वर्णवें ॥१॥क्षुल्लक त्या पारिजातास्तव इंद्र । कृष्णसवें युध्द करिता झाला ॥२॥लाजीरवाणें तें वाटे मज जिणें । आसक्तांची मनें क्षुद्र ऐसी ॥३॥असो, द्वारावतीमाजी येऊनियां । वधू त्या वारिल्या श्रीकृष्णानें ॥४॥एकाचि मुहुर्ती तितुकीचि रुपें । घेऊनि तयांतें स्वीकारिलें ॥५॥वियोग तयांचा जाहला न कदा । नांदवी इतुक्या स्त्रिया सौख्यें ॥६॥वासुदेव म्हणे गृहस्थ आश्रम । ऐसा करी धन्य यदुनाथ ॥७॥ N/A References : N/A Last Updated : December 11, 2019 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP