मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|सर्वमतखंडन आणि ब्रह्मविद्यारहस्य|स्कंध १० वा|उत्तरार्ध| अध्याय ६२ वा उत्तरार्ध दशम स्कंधाचा ( उत्तरार्ध ) सारांश अध्याय ५० वा अध्याय ५१ वा अध्याय ५२ वा अध्याय ५३ वा अध्याय ५४ वा अध्याय ५५ वा अध्याय ५६ वा अध्याय ५७ वा अध्याय ५८ वा अध्याय ५९ वा अध्याय ६० वा अध्याय ६१ वा अध्याय ६२ वा अध्याय ६३ वा अध्याय ६४ वा अध्याय ६५ वा अध्याय ६६ वा अध्याय ६७ वा अध्याय ६८ वा अध्याय ६९ वा अध्याय ७० वा अध्याय ७१ वा अध्याय ७२ वा अध्याय ७३ वा अध्याय ७४ वा अध्याय ७५ वा अध्याय ७६ वा अध्याय ७७ वा अध्याय ७८ वा अध्याय ७९ वा अध्याय ८० वा अध्याय ८१ वा अध्याय ८२ वा अध्याय ८३ वा अध्याय ८४ वा अध्याय ८५ वा अध्याय ८६ वा अध्याय ८७ वा अध्याय ८८ वा अध्याय ८९ वा अध्याय ९० वा स्कंध १० वा - अध्याय ६२ वा सर्वमतखंडन आणि ब्रह्मविद्यारहस्य Tags : bhagavatpothiपोथीभागवत स्कंध १० वा - अध्याय ६२ वा Translation - भाषांतर ॥७३७॥निवेदिती शुक धरित्रीचें दान । घेऊनि भगवान तोषवी जो ॥१॥तया बळीप्रति होते शत पुत्र । बाणासुर ज्येष्ठ शिवभक्त ॥२॥उदार तो सत्यवक्ता, प्रामाणिक । शोणितपुरास राज्य करी ॥३॥भक्तीनें तयाच्या तोषला शंकर । अंकितचि सर्व देव तेणें ।\४॥सहस्त्र कर त्या बाणासुरा होते । नृत्यसमयातें वाद्यनाद -॥५॥करुनि, विविध वाद्यांचा त्या योगें । तोषवी शिवातें बाणासुर ॥६॥तोषतां तैं शिव शोणितपुरातें । रक्षिता हो, स्वयें वदला बाण ॥७॥वासुदेव म्हणे त्या कालापासूनि । शिव त्याचि स्थानीं राहियेला ॥८॥॥७३८॥दैत्यधर्मे होई वरें तो उन्मत्त । बोलला शिवास एकदां तो ॥१॥भाररुप बाहु वाटती मजसी । कोणी न युध्दासी प्रतियोध्दा ॥२॥शोधावया वीर फोडीत पर्वत । हिंडलों बहुत परी व्यर्थ ॥३॥दिग्गजही जाती पाहतां पळूनि । योध्दा मज कोणी लाभो, देवा ॥४॥कोपूनि तैं शिव म्हणती कां मूढा । दुर्विचार ऐसा होई तुज ॥५॥असो, कोसळेल ध्वज जैं सहज । हरील तैं दर्प वीर तव ॥६॥हर्षित तैं बाण करी ते प्रतीक्षा । वासुदेव कथा पुढती गाई ॥७॥॥७३९॥कन्या रुपमती होती बाणासुराप्रति । अनिरुध्द भेटी तिज विवाहापूर्वीचि ॥१॥ज्येष्ठ पुत्र प्रद्युम्नाचा प्रिय अनिरुध्द ॥उषेसवें क्रीडा करी स्वप्नामाजी तोच ॥२॥नाहीसा तो एकाएकीं होतां ती ओरडे ॥प्रिया, गेलासी त्यजूनि मज कोणीकडे ॥३॥दु:खें मारितांचि हांका राहियेली उभी ॥जागृती येतांचि वाटे लज्जा तिजप्रति ॥४॥कुभांड मंत्र्याची कन्या सखी चित्रलेखा ॥म्हणे ’ प्रिया ’ ऐशा कोणा मारितेसी हांका ॥५॥विवाह अद्यापि तव जाहलाचि नाहीं ॥काय अवस्था ही मज सांगे लवलाहीं ॥६॥वासुदेव म्हणे उषा चित्रलेखेप्रति ॥ऐका मोकळया मनानें वृत्त जे निवेदी ॥७॥॥७४०॥पीतांबरधारि कमलनयन । सखे, शामवर्ण कांतियुक्त ॥१॥महापराक्रमी पाहिला पुरुष । देई अधरामृत एकदां तो ॥२॥फिरुनि प्राशन कराया प्रवृत्त । होतां मी तो गुप्त झाला, सखे ॥३॥विरहें तयाच्या व्याक्कुळ मी झालें । शोधार्थ निघालें संबोधीत ॥४॥चित्रलेखा तदा बोलली उषेसी । करीन निवृत्ति दु:खाची मी ।\५॥त्रैलोक्यांत जरी असेल कोठेंही । आणीन मी पाहीं जवळी तरी ॥६॥काढितें मी आतां चित्रे सकलांची । विख्यात त्रिलोकीं जे जे वीर ॥७॥वासुदेव म्हणे सांगे चित्रलेखा । रतिचोर तुझा दावी कोण ॥८॥॥७४१॥शुक निवेदिती राया, ऐशापरी । बोलूनि सुंदरी चित्रलेखा ॥१॥देव, गंधर्व तै सकल सिध्दादि । हुबेहुब काढी चित्रें त्यांचीं ॥२॥चारण, पन्नग, दैत्य , विद्याधर । मानव सकल दावियेले ॥३॥शूरसेनादिक यादव कथिले । चित्र रेखाटिलें श्रीकृष्णाचें ॥४॥प्रद्युम्नाची मुद्रा देखतां लाजली । पाहूनि उठली अनिरुध्दातें ॥५॥चित्रलेखेनें तें जाणिलें जो तोंचि । उषा म्हणे हाचि रतिचोर ॥६॥वासुदेव म्हणे अन्य चित्रलेखा । जाणे एक विद्या अपूर्व जे ॥७॥॥७४२॥योगविद्या चित्रलेखेप्रति ज्ञात । जाई द्वारकेंत नभोमार्गे ॥१॥पर्यकीं निद्रिस्थ होता अनिरुध्द । शोणितपुरास आणिलें त्या ॥२॥लाभे त्या उषेसी जाहला आनंद । राहिली सुखांत पुढती दोघें ॥३॥कन्या स्वमंदिरीं ठेवी त्या लपवूनि । सुखवी अर्पूनि विविध वस्तु ॥४॥मौल्यवान वस्त्रें, उटया चंदनाच्या । तेंव्वी धूपदीपा अर्पी प्रेमें ॥५॥पानकें, पक्वान्नें, पुष्पें, फळे अर्पी । अत्यानंदे कंठी दिन बहु ॥६॥वासुदेव म्हणे पुढती गर्भिणी । उषेतें पाहूनि भ्याले दूत ॥७॥॥७४३॥विस्मयें तें वृत्त कथिती बाणातें । म्हणती आह्मातें दोष नसे ॥१॥रात्रंदिन आह्मीं असतां या स्थानी । दूषविली कोणी न कळे कन्या ॥२॥ऐकूनि तें वृत्त बाणासुर कोपें । भेटला कन्येतें अंत:पुरीं ॥३॥रुप-गुणयुक्त पाही अनिरुध्दा । आज्ञापि सेवकां तदा क्रोधें ॥४॥परिध घेऊनि तदा अनिरुध्द । करी घोरयुध्द बाणासवें ॥५॥नागपाशबध्द अंती करी बाण । उषेसी दारुण शोक होई ॥६॥वासुदेव म्हणे शीलरक्षणार्थ । दैत्यही सक्रोध होती ऐसे ॥७॥ N/A References : N/A Last Updated : December 11, 2019 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP