मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|हरिवरदा|अध्याय १३ वा| श्लोक ५७ अध्याय १३ वा आरंभ श्लोक १ ते २ श्लोक ३ ते ५ श्लोक ६ ते ८ श्लोक ९ ते १० श्लोक ११ श्लोक १२ ते १५ श्लोक १६ ते १९ श्लोक २० ते २३ श्लोक २४ ते २६ श्लोक २७ ते ३० श्लोक ३१ ते ३३ श्लोक ३४ ते ३७ श्लोक ३८ ते ४३ श्लोक ४४ ते ४६ श्लोक ४७ ते ५१ श्लोक ५२ श्लोक ५३ श्लोक ५४ ते ५६ श्लोक ५७ श्लोक ५८ ते ६४ अध्याय १३ वा - श्लोक ५७ श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा Tags : harivaradakrishnapuranकृष्णपुराणहरिवरदा श्लोक ५७ Translation - भाषांतर इतीरेशेऽतर्क्ये निजमहिमनि स्वप्रतितिके परत्राजातोऽतन्निरसनमुखब्रह्मकमितौ । अनीशेऽपि द्रष्टुं किमिदमिति वा मुह्यति सति चछादाजो ज्ञात्वा सपदि परमोऽजावनिकाम् ॥५७॥इरा म्हणिजे भारतीस । ब्रह्मा जो कां तिचा ईश । मोहावर्ती बुडणें त्यास । जालें असतां ये रीती ॥७॥कोणेविषीं मोह झाला । ऐसें पुससी जरी नृपाळा । हरीचा निजमहिमा देखिला । तो तर्किला न वचे त्या ॥८॥असाधारण महिमा दृष्टी । देखोनि तर्कितां वितर्क कोटि । न तर्केचि मग परमेष्ठी । मोहदुर्घटीं बुडाला ॥९॥तर्कागोचर न होतां महिमा । देखावयाही अनर्ह ब्रह्मा । स्वप्रकाश ओजस्वी परमात्मा । स्वमायोपरमा आदरी ॥६१०॥सपदि म्हणिजे तेचि काळीं । जे न मळे जन्मादिमळीं । नाहीं वस्तूहूनि वेगळी । अजा बोलिली चिच्छक्ति ॥११॥जे वस्तूचा प्रकाश । जिचेनि भासे विश्वाभास । जेथ भेदाचा न शिवे लेश । जे निःशेष सन्मात्र ॥१२॥जे वस्तूची आस्तिक्यता । स्वागमेंही नातळे द्वैता । आपणां आपण बहुतां सृजितां । अमलसत्ता प्रभूची जे ॥१३॥ब्रह्मयासि अनुग्रह । केला पुत्रत्व मानूनि स्नेह । व्हावया सृजनकर्मा अर्ह । तैं त्या अपूर्व प्रकटिली ॥१४॥तेचि एथ स्वयभंजना । प्रकटिली कीं चतुरानना । अयोग्य जाणूनि तद्दर्शना । अंतर्धाना पावविली ॥६१५॥झळकोनि मेघःशाम नभा । माजीं लपली विद्युत्प्रभा । अविद्येची लेवूनि शोभा । केला उभा विधि पुन्हा ॥१६॥जीचे ऐश्वर्यप्रभेपुढें । ब्रह्मा किंमात्र कोण्हीकडे । जैसा खद्योत सूर्यापुढें । जाय बापुडे हारपोनि ॥१७॥एव्हढें अद्भुत जिच्या तेजें । दैवें देखिलें कंजजें । ते तत्काळ गरुडध्वजें । निम्लोच वोजें आणिली ॥१८॥अविद्या जवनिकेची बुंथी । घालूनि ध्याना पूर्वस्थिती । आणिला तो देखे पुढती । व्योम जगती दिग्वलय ॥१९॥लटिकी माया वारूनि परती । यथार्थ आणिली पूर्वस्थिती । ऐसें व्याख्यान जे एथ करिती । ते प्राकृतमति अल्पज्ञ ॥६२०॥सत्यज्ञानानंतानंद । ब्रह्मैकरसमूर्ति विशद । प्रकाशिल्या ते अकोविद । म्हणती मंद अविद्या ॥२१॥( श्लोकान्वयाभ्यासः ॥ अजामुपसंहृत्य इति अध्याहारः ॥ जवनिका चछादेति ॥ ) देखावयासि अयोग्य महिमा । म्हणोनि मोहातें पावे ब्रह्मा । हें जाणोनि सर्वज्ञा परमात्मा । ऐश्वर्यगरिमा लोपविली ॥२२॥ते लोपविली म्हणाल कैसी । अभ्रें झांकिलीया नेत्रासी । भास्कर प्रकट जरी आकाशीं । तरी तो त्यासि तिरोहित ॥२३॥तैसा अयोग्य जाणोनि विधि । अविद्या अंतर्पटें प्रभु आच्छादी । मग तो देखे पूर्वोपाधि । करणवृंदीं पूर्ववत ॥२४॥ऐश्वर्यमहिमा देखावया । म्हणाल अयोग्यता कां ब्रह्मया । तरी ते क्षणएक परिसावया । कीजे हृदया ऐकाग्र्या ॥६२५॥स्वप्रकाशमय जें सुख । सेवा अवस्थां प्रकाशक । तें सृजनाभिमानीं रजात्मक । विधि निष्टंक केवीं देखे ॥२६॥गुणसाम्य प्रकृतीहूनि जें पर । तेथ कैंचा गुणसंचार । ब्रह्मा केवळ सृजनपर । रजोमात्र दृश्यस्थ ॥२७॥मकारात्मक लयाची बुंथी । घालूनि झांकिली जेथिची प्रतीति । त्यावरी उकारे विक्षेपशक्ति । द्विविधस्थिति पांघुरविली ॥२८॥सृजनाभिमानें अकारमात्रें । लेवूनि करणांचीं उपनेत्रें । क्रियावंतें विधातृगातें । दृश्य तंत्रें वर्तिजे ॥२९॥ऐशी अविद्या त्रिगुणात्मक । जो पांघुरला त्रिजगज्जनक । त्यासि विभूचा महिमा अटक । ऐसें निष्टंक कळलें कीं ॥६३०॥जेवीं श्रीमंताचेनि प्रसंगें । नृपालयीं प्रवेशिजे भणगें । तेवीं ऐश्वर्यदर्शन विधीजोगें । जालें योगें संवगडियां ॥३१॥एथ आशंका स्फुरेल ऐशी । जें अप्राप्य ब्रह्मयासि । कैसेनि लाभे तें इतरांसि । आशा कायशी मोक्षाची ॥३२॥तरी ऐसें सहसा न म्हणा । ऐका श्लोकींच्या विशेषणा । उपनिषद्वाक्यें सद्गुरु ज्ञाना । अतन्निरसना प्रबोधी ॥३३॥एथींचा अभिप्राय ऐसा । साधनचतुष्टयसंपन्नशिष्यां । सद्गुरुचरणीं दृढ विश्वासा । धरितां मानसा शुद्धत्व ॥३४॥यथोक्तवर्णाश्रमाचरण । तेणें रजतमक्षालन । होय विशुद्धअंतःकरण । सत्त्वसंपन्न सहजेंची ॥६३५॥सहज सत्त्वीं ज्ञानरति । परी ते विपरीत प्रपंचस्फूर्ति । उपनिषद्वाक्यें कृपामूर्ति । जैं प्रवृत्ति पालटी ॥३६॥अध्यारोपापवादन्यायें । शोधूनि यथोक्त सांप्रदाये । अतद् वृत्ति उपायें । बोधी द्रव्यास्वयें व्यतिरेक ॥३७॥रज्जूवरी सर्पाभास । कीं मृगजळत्व रवीप्रभेस । तेवी वस्तु म्हणोनि अवस्तूस । अध्यारोप जाणणें ॥३८॥यया नाम विपरीत ज्ञान । तमगर्भिं सत्त्वें भ्रमोन । यथार्थ आत्मत्वा विसरोन । देहात्मभान दृढ केलें ॥३९॥वस्तु केवळ परब्रह्म । त्यासि सच्चिन्सुख हें मायाचि नाम । श्रुतीनें ठेऊनि उपाय परम । केला हा भ्रम निरसावया ॥६४०॥सच्चित्सुख अद्वितीय । भेदरहित तें आपणचि स्वयें । हें विसरोनियां कवळी विषय । विमुख होय स्वसुखातें ॥४१॥विषय म्हणजे जगदाभास । पांचभौतिक त्रैगुण्य दृश्य । आकारमात्र नाम त्यास । जे जीवात्मयास भ्रामक ॥४२॥तोचि मानूनि शाश्वत । बाह्य प्रकाश मानूनि नित्य । एथेंचि होईल आनंद प्राप्त । करी निश्चित हा बोध ॥४३॥एवं सच्चिदानंदमय । केवळ मानूनि दृश्य विषय । जीव भ्रमोनी बद्ध होय । स्वात्मसोय विसरोनि ॥४४॥तैसा वस्तूवरी प्रपंचारोप । तो हा बोलिजे अध्यारोप । एथ बहु जन्मार्जित सकृतदीप । तो अनुतप प्रकाशी ॥६४५॥ईश्वरानुग्रह प्रसादसिद्धि । सद्गुरु भेटे कृपानिधि । उपनिषदर्थें तो जैं बोधी । जीवोपाधि तैं निरसे ॥४६॥ईश्वरप्रोक्त यथार्थ श्रुति । सद्गुरुवचन तें आप्तोक्ती । तेथ दृष विश्वास ते भक्ति । जे जालिया विरक्ति उपजवी ॥४७॥ईश्वरपर्यंत विषयाभास । मायाभ्रमात्मक हें दृश्य । अनित्य उमजतां निःषेष आला त्रास फळभोगीं ॥४८॥अनित्य भोगा अभिलाषणें । हेंचि मूर्खत्वाचें जिणें । अमृत म्हणोनि मृगजळ पिणें । किं स्वप्ननिधानें धनिकत्व ॥४९॥दृश्य वाळिलें अनित्य बोधें । आत्मा नुमजे शोधितां शोधें । तैं श्रुतिमुखें अतद्वादें । सद्गुरुवरें उमजवी ॥६५०॥न तद्भूमि न तत्तोय । न तत्तेज न पवननिचय । न तद्व्योम ना व्योमादिकार्य । भौतिकमय चराचर ॥५१॥ऐसें निरसतां तत्त्वें तत्त्व । झालें विवर्ता मिथ्यत्व । वास्तव विवळलें सत्यत्व । निजात्मत्वें चिन्मात्र ॥५२॥अतन्निरसनमुखेन । म्हणिजे सद्गुरुमुखें करून । ब्रह्मकमिति हें विवरण । वेदोत्तमांग श्रुतीचें ॥५३॥एवं सद्गुरु स्वमुखें उपनिषद्भाग । साधनसंपन्न उमजवी साङ्ग । तेव्हां त्यास ब्रह्मीं लाग । ब्रह्मा अयोग्य ते ठायीं ॥५४॥माया गुणेशीं निरसली । आत्मता ब्रह्मीं समरसली । ब्रह्मया रजोगुणाची भुली । त्यातें झाली अप्राप्ति ॥६५५॥स्वप्रकाश सुखसाचार । सच्चिदानंद ज्या नामोच्चार । ब्रह्मयासि अगोचर । तो इंद्रियपर म्हणोनि ॥५६॥समष्टीचा सृजनाभिमान । गुणमयी गर्भींचा रजोगुणज्ञ । विषयोन्मुख परोक्षज्ञ । अयोग्य म्हणोन अपरोक्ष ॥५७॥बाह्यदृष्टि सृजनवेळे । आकारें विश्व आकारिलें । विषयोन्मुख तें परोक्ष झालें । अपरोक्ष न कळे चित्सुख ॥५८॥परेहूनि जें परतर । तें रजोभिमानासि अत्यंत दूर । ब्रह्मा केवळ रजोमात्र । कैंचा अधिकार त्या तेथें ॥५९॥ऐशी तिहीं विशेषणीं । भगवन्महिमा अवलोकनीं । योग्यता ब्रह्मया लागूनि । नाहीं म्हणोनि निरूपिलें ॥६६०॥ब्रह्मा अयोग्य ऐश्वर्यमहिमे । ऐसें जाणोनि पुरुषोत्तमें । आवरूनि यथार्थ ऐश्वर्यगरिमे । अविद्याभ्रमें झांकिला ॥६१॥ N/A References : N/A Last Updated : April 29, 2017 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP