TransLiteral Foundation
Don't follow traditions blindly or don't assume a superstition either.
Don't be intentionally ignorant. Ask us!! Make Informed Religious Decisions!!

अध्याय १३ वा - श्लोक २७ ते ३०

श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा


श्लोक २७ ते ३०
इत्थमा‌त्मात्मनाऽऽत्मानं वत्सपालमिषेण सः । पालयन्वत्सपो वर्ष चिक्रीडे वनगोष्ठयोः ॥२७॥

आत्मा श्रीकृष्ण आपण । वत्सवत्सपरूपें धरून । तेणें मिषें करी पाळण । आपुलें आपण वनगोष्टीं ॥६२॥
आपणची वत्सवत्सपवेषें । होऊनि पालन क्रीडामिषें । क्रीडता झाला सुखसंतोषें । यावद्वर्ष वनगोष्टीं ॥६३॥
वर्षपर्यंत बलरामासी । न कळे कृष्णमाया हे ऐशी । वर्षाअंती निजमानसीं । कांहीं खुणेसीं पावला ॥६४॥

एकदा चारयन् वत्सान् स रामो वनमाविशत् । पंचषासु त्रियामासु हायनापूरणिप्वजः ॥२८॥

वर्षामाजी पांचसहा । रात्री न्यून असतां पहा । बळरामासी वृत्तांत हा । विदित झाला तें ऐका ॥३६५॥
कोणेके दिवशीं हरि । चारित वत्सांचिया हारी । बळरामेंसीं वत्सपभारीं । वनामाझारीं प्रवेशला ॥६६॥

ततो विदूराच्चरतो गावो वत्सानुपव्रजम् । गोवर्धनाद्रिशिरसि चरंत्यो ददृशुस्तृणम् ॥२९॥

तंव गोवर्धनाचिये माथां । धेनुकळप चरत होता । व्रजानिकटीं तृणें चरतां । देखिलीं तत्त्वतां निजवत्सें ॥६७॥

दृष्ट्वाऽथतत्स्नेहवशोऽस्मृतात्मा स गोव्रजोऽत्यात्मपदुर्गमार्गः ।
द्विपात्ककुद्ग्रीव उदास्यपुच्छो ऽगाद्धुंकृतैरास्रुपया जवेन ॥३०॥

वत्सें देखोनि धेनुकळप । स्नेहें कळवळिला अमूप । होतांची स्वतोकीं सकृप । झाला लोप देहभावा ॥६८॥
विसरूनि देहाची आठवण । कळप धांविला वेगेंकरून । सवेग गतीचें वर्णन । विचक्षण परिसोत ॥६९॥
जे जे होते गोरक्षक । त्यांतें न गणूनि निःशंक । नीट स्ववत्सां सन्मुख । मार्ग अटक लंघिता ॥३७०॥
कडे कपाटें दुर्घट । वृक्ष लागले एकदाट । न विचारितां वाटावाट । उड्या उद्भट टाकिती ॥७१॥
गौळी धांवों न शकती जेथ । ऐसा घेऊनि दुर्गमपथ । प्रेमवोरसें हंबरत । चौताळत चौपायीं ॥७२॥
एकदाचि दोन्ही चरण । पुढील टाकिती वेगेंकरून । तैसेचि मागील दोन्ही जाण । वेगें उचलोनि चौकट ॥७३॥
तेणें द्विपादचि भासती । ऐशी अतितर सवेगगति । शिंगें वोसिंडांतें मिळती । त्यावरी पडती पुच्छाग्रें ॥७४॥
दृष्टि ठेवूनि वत्सांवरी । मुखें पुच्छें उचलोनि वरी । सप्रेम ओरसें हुंकारगजरीं । निराधारीं धांवती ॥३७५॥
आसमंतात् सर्वभागीं । दुग्ध स्रवती धांवतां मार्गीं । व्रजासमीप आल्या वेगीं । सह तत्संगीं वृषभादि ॥७६॥
ऐशा गेल्या धांवत । त्यांच्या स्नेहाचें विचेष्टित । तद्वत्प्रेमें कृष्णीं निरत । होऊनि स्वस्थ परियेसा ॥७७॥

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2017-04-29T03:41:08.7600000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

राहू

  • पु. 
  • एक उपग्रह ; नवग्रहांतील आठवा ग्रह . 
  • ज्याचे शिर विष्णूने धडापासून वेगळे केले असा एक दैत्य . ह्याचे डोके तो राहुग्रह व धड केतु ग्रह झाला . यांच्यामुळे सूर्यचंद्रांस ग्रहणे लागतात असे म्हणतात . 
  • ( ज्यो . ) भूमिच्छाया ; वरचा पातबिंदु . [ सं . ] ( वाप्र . ) राहूकेतु मागे लागणे , राहूसारखा मागे लागणे - येणे - पाठ घेणे - खनपटीस बसणे , अतिशय सतावणे ; एखाद्याच्या मागे लागून त्याला ग्रासण्यास पहाणे . सामाशब्द - 
More meanings
RANDOM WORD

Did you know?

वास्‍तुदोषावर आरसा काय करतो आरशांचा उपयोग कसा होतो
Category : Hindu - Philosophy
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site

Ved - Puran
Ved and Puran in audio format.