मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|हरिवरदा|अध्याय १३ वा| श्लोक १ ते २ अध्याय १३ वा आरंभ श्लोक १ ते २ श्लोक ३ ते ५ श्लोक ६ ते ८ श्लोक ९ ते १० श्लोक ११ श्लोक १२ ते १५ श्लोक १६ ते १९ श्लोक २० ते २३ श्लोक २४ ते २६ श्लोक २७ ते ३० श्लोक ३१ ते ३३ श्लोक ३४ ते ३७ श्लोक ३८ ते ४३ श्लोक ४४ ते ४६ श्लोक ४७ ते ५१ श्लोक ५२ श्लोक ५३ श्लोक ५४ ते ५६ श्लोक ५७ श्लोक ५८ ते ६४ अध्याय १३ वा - श्लोक १ ते २ श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा Tags : harivaradakrishnapuranकृष्णपुराणहरिवरदा श्लोक १ ते २ Translation - भाषांतर श्रीशुक उवाच - साधु पृष्टं महाभाग त्वया भागवतोत्तम । यन्नूतनयसीशस्य श्रृण्वन्निव कथां मुहुः ॥१॥शुक म्हणे गा सार्वभौमा । भागवतामाजीं उत्तमोत्तमा । हरिगुणश्रवणीं तुझा प्रेमा । कीं अगाध आम्हां आढळला ॥३६॥तुवां प्रश्न केला भला । तेणें भाग्यमहिमा कळला । म्हणोनि महाभाग तुजला । बोलावयाला प्रशस्तीं ॥३७॥मोह अज्ञान महाभ्रम । हानि संकट संधवर्म । हें तें तोंवरी भोगिती अधम । जव हरिप्रेम नुदैजे ॥३८॥हरिप्रेमाचा लागतां झरा । मानव वंद्य होती निर्जरां । कोण गणी तैं भाग्या येरां । हरिशंकरा प्रियता जैं ॥३९॥भगवद्भजनीं माझा प्रेमा । कैसा कळला म्हणसी तुम्हां । तरी राया तुझिया श्रवणकामा । तुळणा आम्हा करवेना ॥४०॥अखिल चराचराचा ईश । परमात्मा जो जगदाधीश । तद्गुणकीर्तनश्रवणींसोस । वर्ते अशेष ऐकोनिही ॥४१॥वारंवार विभूचेच गुण । करीत असतां तुवां श्रवण । नित्यनूतन प्रेमागहन । येणें मम मन सुखांवें ॥४२॥प्रथमापासूनि नवमस्कंध - । पर्यंत हरिगुण महिमा विशद । परिसोनि पावल्या परमानंद । पुढती सादर श्रवणाची ॥४३॥उभयवंशाचें गुणचरित्र । ऐकोनि तुझे न धाती श्रोत्र । कृष्णकीर्तिसि झाले पात्र । हें विचित्र तव प्रेम ॥४४॥द्वादशाध्याय परिसमाप्ति । ऐकिल्याही कृष्णकीर्ति । श्रवणीं अधिकचि उपजे रति । विस्मय चित्तीं मज हाचि ॥४५॥नित्य करितांही स्तनपान । बालकाचा प्रेमा गहन । तैसे ऐकोनि ऐकसी हरीचे गुण । नित्य नूतन सप्रेमें ॥४६॥जे ऐकलीच नव्हती कोठें । ते अपूर्व वार्ता जैं श्रवणा भेटे । तेचि श्रवणीं मानस नेहेटे । प्रेम दुणवटे तेंवी तुझें ॥४७॥श्रवणीं नववत् सप्रेमळ । हें अपार निष्काम सुकृत फळ । कृपेनें तुष्टोनि लक्ष्मीलील । भाग्य केवळ हें वोपी ॥४८॥सतामयं सारभृतां निसर्गो यदर्थवाणिश्रुतिचेतसामपि । प्रतिक्षणं नव्यवदच्युतस्य यत्स्त्रिया विटानामिव साधुवार्ता ॥२॥ऐसे जे कां लब्धभाग्य । ते या श्रवणप्रेमा योग्य । येर विषयग्रस्त अभाग्य । ते अयोग्य ये ठायीं ॥४९॥हा सारांश लाधला ज्यासी । सारभूत म्हणिजे त्यासी । सहज स्वभाव त्या संतासि । तो परियेसीं नृपवर्या ॥५०॥असार प्रवृत्तिनवरस । सेवनीं उपजला ज्यांसि त्रास । तेचि सारभूत सत्पुरुष । निसर्ग सारांश हा त्यांचा ॥५१॥तो निसर्ग म्हणसी कैसा । अच्युतवार्ताश्रवणरसा । प्रेमा नित्य नूतन मानसा । दे संतोषा प्रतिक्षणीं ॥५२॥जेथ नाहीं यातायात । तया धामातें अच्युत म्हणत । तो अवतरोनि अमूर्त मूर्त । कीर्ति अच्युत विस्तारी ॥५३॥अस्ति भाति प्रियात्मक । अच्युतपदाचा विवेक । तेथ नामरूप हें मायिक । काल्पनिक म्हणाल ॥५४॥तरी नगाचीं लटिकीं अनेक नांवें । सुवर्ण नाम तैसें नव्हे । वर्ते उपादान व्याप्तीसवें । होय आघवें नसोनि ॥५५॥तैसा अनंत अच्युत । अयोनिसंभव अव्यक्तव्यक्त । धर्मसंस्थापनादि कृत्य । करूनि अलिप्त अक्षयी ॥५६॥तयाचीं तीं पुण्य चरितें । अनंत गुणीं यशोंकितें । अच्युतपदीं करिती सरतें । मोक्षावरौते सुख देती ॥५७॥प्रपंचकथा आणि अच्युतवार्ता । समान न म्हणावी सर्वथा । भवभयाची अपार व्यथा । भगवत्कथा निवारी ॥५८॥श्वानशूकरादि प्रपंचीं निरत । परम सुकृती हरिगुणीं रत । प्रपंचप्रेमें अधःपात । कैवल्य प्राप्त हरिप्रेमें ॥५९॥तें हरिप्रेम म्हणाल कैसें । स्त्रैण स्त्रीकामीं जेंवी पिसे । इंद्रियें सहित निज मानसें । वनिताध्यासें वेधती ॥६०॥ठाण माण गुण लावण्य । स्मित भाषण कटाक्षबाण । प्रेमें सादर निरीक्षण । करूनि स्मरण ते धरिती ॥६१॥मग समसमान वयस्क मिळोनि तरुण । करिती कांतातनुवर्णन । चुंबन मैथुन आलिंगन । कुचमर्दन इत्यादि ॥६२॥छंद प्रबंध श्लोक आर्या । श्रृंगाररसिक गाती नार्या । स्त्रैण श्रवणानंदकार्या । तें अनार्या प्रिय वाटे ॥६३॥स्त्रिया गाती स्त्रिया ध्याती । स्त्रीअवयव सादर पाहती । नित्य नूतन वाढे रति । दुजी विश्रांति न माने ॥६४॥ऐसे स्त्रीकामीं विषयनिष्ठ । तयासी बोलिजे स्त्रियाविट । जेंवी ते स्त्रीविलास वार्ता विनट । भगवन्निष्ठ तेंवी संत ॥६५॥म्हणाल पवित्रा अपवित्रा उपमा । श्रीशुकें एथें दिधली कामा । तरी सर्वा विदित हा विषयप्रेमा । भगवद्गरिमा अनोळख ॥६६॥बोधवावया ब्रह्मानंद । श्रुति उपमिती उपस्थानंद । जेवीं शरावोदकी बिंबला चांद । ते उपमा मंद न मानावी ॥६७॥प्रेम म्हणिजे मनोरंजन । तेणें विषय सुखातें कवळिती जन । तैसें रुचल्या भगवद्भजन । भवबंधन मग कैचें ॥६८॥मानस वेधे परांगनेसीं । कीं जैसें गुंते परधनापासीं । तैसें लंपट हरिचरणांसीं । होतां कायसी भवचिंता ॥६९॥यालागीं भक्तीसि विषयप्रेमा । तुकितां असाम्य न म्हणिजे उपमा । उपजे सकामा निष्कामा । अनुभवगरिमा दोहींची ॥७०॥बालपणीं तें स्त्रीशरीर । विष्ठा मूत्र श्लेष्मागार । उतारवयसीं भयंकर । भासे घोर पिशाच ॥७१॥तारूण्यकाळीं मैंदापरी । लावण्य मिरवी बाह्याकारीं । कूटिल लपटूनि अंतरीं । जेंवी साजिरी गवाक्षा ॥७२॥याहीमाजि व्यथाभूत । किंवा क्षुत्क्षाम कालग्रस्त । मलिन अमंगळ अवस्थाभूत । जीतची प्रेत भासे तैं ॥७३॥ऐसिये स्त्रीतनूसीं भुलोनि । सारसुखाची करिती हानि । हेही हरिमायेची करणी । जेंवी हरणां किरणीं जलभ्रांति ॥७४॥विवरूनि झाले जे विरक्त । तेचि पैं सारग्राही संत । ऐक तयांचा वृत्तांत । जो एकांत हरिचरणीं ॥७५॥परमोत्कर्षेंसि निःसीम । हरिगुणश्रवणीं ज्यांचें प्रेम । तदर्थ अवघा इंद्रियग्राम । नित्यनेम हा ज्यांचा ॥७६॥लुब्ध जैसा जोडी धन । त्याहूनि प्रयत्नें हरीचे गुण । सद्गुरुमुखें करूनि श्रवण हृदयीं जतन ठेविती ॥७७॥जया श्रवणसुखापुढें । विषयसुखाची गोडी मोडे । इंद्रादिवैभवही नावडे । प्रेमा जडे हरिचरणीं ॥७८॥कवडी कवडी जोडि कृपण । कीं धान्य वेंचिती अनाथ दीन । तैसे हरीचे अनंत गुण । श्रवणें करून जोडावे ॥७९॥हरिगुणप्रश्नार्थ वेंचे वाणी । श्रोत्र अच्युतवार्ताश्रवणीं । मानस वेंचे तच्चिंतनीं । अंतःकरणीं हरिप्रेम ॥८०॥अच्युतकथांचा श्रवणस्वार्थ । मुख्य जोडिती इतुका अर्थ । इतर न शिवती भव अनर्थ । हा परमार्थ संतांचा ॥८१॥वचनें श्रवणें अंतःकरणें । हरिगुणेंचि अर्थ जोडणें । हीं मुख्य संतांचीं लक्षणें । झालीं लेणीं तुज आंगीं ॥८२॥इहीं लक्षणीं भाग्यवंता । ऐकें एकाग्र करूनि चित्ता । पुसली तेचि सांगेन कथा । जे ऐकतां भव नासे ॥८३॥ N/A References : N/A Last Updated : April 29, 2017 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP