मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|हरिवरदा|अध्याय १३ वा| श्लोक ६ ते ८ अध्याय १३ वा आरंभ श्लोक १ ते २ श्लोक ३ ते ५ श्लोक ६ ते ८ श्लोक ९ ते १० श्लोक ११ श्लोक १२ ते १५ श्लोक १६ ते १९ श्लोक २० ते २३ श्लोक २४ ते २६ श्लोक २७ ते ३० श्लोक ३१ ते ३३ श्लोक ३४ ते ३७ श्लोक ३८ ते ४३ श्लोक ४४ ते ४६ श्लोक ४७ ते ५१ श्लोक ५२ श्लोक ५३ श्लोक ५४ ते ५६ श्लोक ५७ श्लोक ५८ ते ६४ अध्याय १३ वा - श्लोक ६ ते ८ श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा Tags : harivaradakrishnapuranकृष्णपुराणहरिवरदा श्लोक ६ ते ८ Translation - भाषांतर अत्र भोक्तव्यमस्माभिर्दिवा रूढं क्षुधाऽर्दिताः । वत्साः समीपेऽपः पीत्वा चरंतु शनकैस्तृणम् ॥६॥ऐशिये पुलिनीं मनोरमीं । क्षुधार्दित परम आम्ही । या रे जेवूं समागमीं । आला व्योमीं दिन बहु ॥९॥नित्याच्या भोजनाची वेळ । क्रमोनी झाली वाढ वेळ । एथ जेवूं या रे सकळ । क्षुधा परम लागल्या ॥११०॥पाणी पाऊनि वत्समेळ । एथ थांबवा रे सकळ । जळासमीप तृण कोमळ । तें ही हळूहळू चरतील ॥११॥श्रीशुक उवाच :- तथेति पाययित्वाऽर्भा वत्सानारुध्य शाद्वले ।मुक्त्वा शिक्यानि बुभुजुः समं भगवता मुदा ॥७॥शुक म्हणे परिसें सावधान । ऐसें ऐकोनि कृष्णवचन । आज्ञां सप्रेमें वंदून । वत्सें पाजून थांबविलीं ॥१२॥कोमळ हिरवीं लसलसित । रसाळ तृणें महिमंडित । तेथ हो करून वत्सें समस्त । भोजनार्थ मिळाले ॥१३॥तळीं आंथरूनि कांबळिया । त्यावरि सोडूनि जाळिया । गडी जेविती सांवळिया । सवें गोवळीयां हरि जेवी ॥१४॥तया भोजनाची पंक्तिरचना । ऐकोनि राया धरीं सूचना । जें गुह्य दुर्लभ श्रुतिपुराणा । अमरगणा अगोचर ॥११५॥कृष्णस्य विष्वक्पुरुराजिमंडलैरभ्याननाः फुल्लदृशो व्रजार्भकाः । सहोपविष्टा विपिने विरेजुश्र्छदा यथांऽभोरुहकर्णिकायाः ॥८॥तये क्रीडेमाजीं सकळ । शोभते झाले वत्सपाळ । कृष्णासभोंवतें मंडळ । मध्यें गोपाळ शोभला ॥१६॥पुरुराजि म्हणिजे बहुत पंक्ति । कृष्णाभोंवत्या चक्राकृति । जेवीं षोढा श्रीभगवंतीं । आवरण दैवती विराजे ॥१७॥विष्वक् म्हणजे सर्वांकडूनि । कृष्णा सन्मुख अवघीं जणीं । अनेक पंक्तींची मांडणी । सुखभोजनीं बैसले ॥१८॥सह म्हणजे अंतररहित । ऐक्य समरसें भेदातीत । कृष्णवदनातें लक्षीत । कृष्णीं निरत तादात्म्यें ॥१९॥श्रीकृष्णवदनचंद्रवेधें । वत्सपांचीं नेत्रकुमुदें । विकासलीं परमानंदें । प्रफुल्लितें शोभती ॥१२०॥कीं कृष्णतरणीच्या कृपाकिरणीं । फावल्या वत्सपदृक्पद्मिनी । कीं कमलकणिकेभोंवत्या श्रेणि । सहस्रपत्रीं जलजांच्या ॥२१॥नयन वेधिले श्रीकृष्णवदनें । कृष्णाकार झालीं मनें । पुढें जे जे क्रीडा करणें । ते ते होणें हरितंत्र ॥२२॥जेवीं बाळ पाहोनि छाये । छंदें हालवी हातपाय । छाया तैशीच चंचल होय । तेणें न्याय वत्सप ॥२३॥ऐसे बैसले घनदाट । इंद्रिय प्राणें मनें सकट । होऊनि श्रीकृष्णीं प्रविष्ट । क्रीडा अचेष्ट चेष्टती ॥२४॥अनेक काष्ठीं एक शकट । कीं अनेक तंतु एक पट । कीं शरीर अनेक तत्त्वांसकट । वर्ते प्रकट एकाज्ञा ॥१२५॥हस्तापादादि हालवणें । चळणें वळणें संभाषणें । अवघ्यांमाजीं एक कृष्णें । अभिन्नपणें ते क्रीडा ॥२६॥आगमी म्हणती कुलाचार । मीमांसक म्हणती दिव्यसत्र । वेदांती म्हणती आत्माकार । हे अगोचर हरिक्रीडा ॥२७॥ऐसे एकात्मभावोपविष्ट । गडी कृष्णेंसीं एकवाट । अन्नें वाढिलीं चोखट । पात्रें स्पष्ट तें ऐका ॥२८॥ N/A References : N/A Last Updated : April 29, 2017 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP