मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|हरिवरदा|अध्याय १३ वा| श्लोक ४४ ते ४६ अध्याय १३ वा आरंभ श्लोक १ ते २ श्लोक ३ ते ५ श्लोक ६ ते ८ श्लोक ९ ते १० श्लोक ११ श्लोक १२ ते १५ श्लोक १६ ते १९ श्लोक २० ते २३ श्लोक २४ ते २६ श्लोक २७ ते ३० श्लोक ३१ ते ३३ श्लोक ३४ ते ३७ श्लोक ३८ ते ४३ श्लोक ४४ ते ४६ श्लोक ४७ ते ५१ श्लोक ५२ श्लोक ५३ श्लोक ५४ ते ५६ श्लोक ५७ श्लोक ५८ ते ६४ अध्याय १३ वा - श्लोक ४४ ते ४६ श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा Tags : harivaradakrishnapuranकृष्णपुराणहरिवरदा श्लोक ४४ ते ४६ Translation - भाषांतर एवं संमोहयन् विष्णुं विमोहं विश्वमोहनम् । स्वयैव माययाऽजोपि स्वयमेव विमोहितः ॥४४॥जो निर्मोह मोहातीत । विश्व स्वमोहें विमोहित । त्या विष्णूतें धिषणानाथ । मोहें व्याप्त करूं गेला ॥६१॥तंव तें झालें विपरीत । स्वयेंचि झाला स्वमोहग्रस्त । अज नामें जो विश्वतात । केला भ्रांत स्वगुणेंचि ॥६२॥खडकावरी हाणितां धोंडा । तो फिरोनि लागे आपुल्या तोंडा । चूर्ण होती दांत दाढा । तोचि रोकडा हा न्याय ॥६३॥तंव परीक्षिति म्हणे शुका । एथ थोडीसी वाटे शंका । मायाश्रियां ब्रह्मादिकां । केवीं मोहकां मोह गिळी ॥६४॥तम्यां तमोवन्नैहारं खद्योतार्चिरिवाहनि । महतीतरमायैश्यं निहन्त्यात्मनि युंजतः ॥४५॥शुक्र म्हणेगा जगतीवरा । सांगेन ऐकें दृष्टांतद्वारा । अल्पकें गोवूं जातां थोरां । होय मातेरा तयाचा ॥४६५॥ज्याचे मायेमाजीं विधिहर । अनंतकोटीब्रह्मांडधर । होऊनि लोपती तरंगाकार । तो तरंगें सागर केंवी झांके ॥६६॥कीं प्रावृटिं कुहूची निशी । झांकूं प्रवर्ते धुई जैसी । तंव तेचि हारवे निशीमाजीं जैसी । झांकावयासीं असमर्थ ॥६७॥कां स्वपुच्छाच्या प्रकाशकिरणीं । खद्योत लोपवूं प्रवर्ते तरणी । परी ते अघटित न घडे करणी । जाय हरपोनि तत्तेजीं ॥६८॥स्फुलिंग प्रतापें प्रळयानळा । जाळावया चढे सळां । तैं तो उरेचि वेगळा । मग कैंचा तो दळा उरेल ॥६९॥कीं परमाणु पृथ्वी गिळीन । म्हणूनि धरितां आंगवण । तैं तो केतुला कोठील कोण । जाय हारपोन भूमाजीं ॥४७०॥तेवीं मायेचा जो नियंता । भुलवावया त्या अनंता । स्वमाया पसरूं गेला धाता । पडला गुंता तोचि त्या ॥७१॥त्याची माया परम अगाध । त्यासि अल्प मायिकें करितां मुग्ध । तंव तो स्वसंवेद्य स्वतःसिद्ध । न घडे रोध तद्बोधा ॥७२॥जेथून त्रिगुणांचा उद्भव । तो मायावि वासुदेव । त्यावरी ब्रह्मरजोद्भव । राजसी माव करूं गेला ॥७३॥बाळकापाशीं बागुलभय । दावितां तो बुद्ध निर्भय । बाळकचि सकंप होय । ऐकतां सोय बाऊची ॥७४॥तेवीं महापुरुषीं नीच माया । योजिली न शके भुलवावया । स्वसामर्थ्यें सहित राया । जाय विलया स्वस्थानीं ॥४७५॥ऐशी शंका परिहारिली । ब्रह्मा भुलला स्वकृतभुली । तेणें वत्सवत्सप क्रीडा पहिली । तैशी देखिली हरिकृत ॥७६॥ब्रह्मयाचा सृजनाभिमान । निरसावया श्रीभगवान । दावी स्वमायाविंदाण । तें तूं श्रवण करीं राया ॥७७॥तावत्सर्वे वत्सपालाः पश्यतोऽजस्य तत्क्षणात् । व्यदृश्यन्त घनश्यामाः पीतकौशेयवाससः ॥४६॥मीचि एक सृष्टिकर्ता । ब्रह्म्यासी होती हे अहंता । वत्सें वत्सप कृष्ण होतां । ते तत्त्वतां निरसली ॥७८॥ब्रह्म्याचा जो विष्णु बाप । तैसे सृजूनि दावी अमूप । जितुके होते वत्सवत्सप ।ते ते तद्रूप पालटिले ॥७९॥म्हणाल स्वरूपता वैष्णवगणां । असे वैकुंठीं अवघ्यां जणां । परी ते न लाहती श्रीवत्सचिन्हा । एथ त्या खुणा सर्वांसी ॥४८०॥ब्रह्मा सृजी विश्व असकें । परी विष्णूसी सृजूं न शके । तो कृष्णमायेच्या लाघवें देखे । वत्सपवत्सकें विष्णुमय ॥८१॥वत्सेंवत्सप परमेष्टि । संशये पहिलेचि मानी पोटीं । विष्णुस्वरूपें देखोनि दृष्टि । पाहे सृष्टि सलज्ज ॥८२॥वत्स वत्सप विष्णुमूर्ति । विधीनें देखिल्या त्या आकृति । जैशा वर्णी शुकभारती । तैशा श्रोतीं परिसाव्या ॥८३॥ब्रह्मा पाहे ज्म्व साशंक । तंव वत्सपाळादि जे वत्सक । यष्टि विषाण वस्त्रादिक । झाले सम्यक हरिरूप ॥८४॥ N/A References : N/A Last Updated : April 29, 2017 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP