मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|हरिवरदा|अध्याय १३ वा| श्लोक ९ ते १० अध्याय १३ वा आरंभ श्लोक १ ते २ श्लोक ३ ते ५ श्लोक ६ ते ८ श्लोक ९ ते १० श्लोक ११ श्लोक १२ ते १५ श्लोक १६ ते १९ श्लोक २० ते २३ श्लोक २४ ते २६ श्लोक २७ ते ३० श्लोक ३१ ते ३३ श्लोक ३४ ते ३७ श्लोक ३८ ते ४३ श्लोक ४४ ते ४६ श्लोक ४७ ते ५१ श्लोक ५२ श्लोक ५३ श्लोक ५४ ते ५६ श्लोक ५७ श्लोक ५८ ते ६४ अध्याय १३ वा - श्लोक ९ ते १० श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा Tags : harivaradakrishnapuranकृष्णपुराणहरिवरदा श्लोक ९ ते १० Translation - भाषांतर केचित्पुष्पैर्दलैः केचित्पल्लवैरंकुरैः फलैः । शिग्भिस्त्वग्भिर्दृषद्भिश्च बुभुजुः कृतभाजनाः ॥९॥एकीं विकसितपुष्पें तळीं । आंथरूनि पत्रावळी । एकीं बुसा पुष्पदळीं । पत्रावळी कल्पिल्या ॥२९॥प्लक्ष पलाश पिंपळपानें । आम्र जंबु रंभावनें । उंबर दहिवानें धामणें । कुटजपत्रें वटादि ॥१३०॥करंज कर्मेळी टेंभुरणीं । भल्लातकी मधु रोहिणी । भोंकरी बदाम अंजनपर्णीं । अशोक चंपक पनसादि ॥३१॥चविचिमुकुरारजनीदळें । अनेक जातीचीं विचित्र कमळें । नानापरी पल्लव कोंवळे । एकीं अंकुर वृक्षांचे ॥३२॥एकीं कोमळ तृणांकुर । पसरूनि केले पात्राकार । एकीं फळांचे प्रकार । पात्ररचनीं मांडिले ॥३३॥एक जाळीयाचे पात्रस्थानीं । कल्पोनि बैसले भोजनीं । एक फळादि त्वग्भाजनीं । गडी अशनीं प्रवर्तले ॥३४॥रंभादित्वचा पात्ररूपा । एकीं घेतल्या पाषाणचिपा । पात्रें जीं ज्यां प्रिय वत्सपां । तीं तीं तिहीं मांडिलीं ॥१३५॥ऐसी करूनि पात्ररचना । त्यावरी करूनि परिवेशना । करिते झाले सहभोजना । त्या व्याख्याना अवधारीं ॥३६॥कथितां अन्नाचे प्रकार । ग्रंथ वाढेल तेणें फार । नाहीं बोलिला व्यासकुमार । तदुक्त मात्र बोलिलों ॥३७॥सर्वे मिथो दर्शयंतः स्वस्वभोज्यरुचिं पृथक् । हसंतो हासयंतश्चाभ्यवजह्रुः सहेश्वराः ॥१०॥कृष्ण जाणोनि सर्वात्मक । अवघे श्रीकृष्णाचें मुख । कवळ घालिती बल्लवतोक । तो विवेक अवधारा ॥३८॥आपणासि जें जें गोड । ममता ज्याचें करी कोड । तेथ गुंते मानस वाड । जें अवघड सांडितां ॥३९॥तये रुचीचे रुचिकर कवळ । कृष्णा वदनीं वत्सपाळ । घालूनि मानिती तोष बहळ । सप्रेमळ सुख भोक्ते ॥१४०॥संचित प्रारब्ध क्रियमाणा । सहित कर्मफळाशा जाणा । अवश्य भोक्तव्य जें आपणां । तें श्रीकृष्णा अर्पिती ॥४१॥अहंता ममता घारी पुरी । कल्पना गुळाची गुळवरी । ग्रास घालिती परस्परीं । सर्वीं श्रीहरि लक्षूनि ॥४२॥पुत्रदारावित्तेषणा । लोकेषणा चित्तेपणा । ऐशा अनेक शाका जाणा । गडी श्रीकृष्णा अर्पिती ॥४३॥सूक्ष्म वासना बळकट । देहात्मा पय शर्करा सकट । कृष्णवदनीं करिती प्रविष्ट । अति स्वादिष्ट म्हणोनि ॥४४॥योगक्षेम दध्योदन । अष्टमदांचीं लोणचीं जाण । रुचिकर म्हणोनि कृष्णार्पण । करिती संपूर्ण वयस्य ॥१४५॥ बाह्य दंभ ठोंबरा भला । सलोभ दह्यानें कालविला । लोकमानें रुचिसीं आला । तो अर्पिला हरिवदनीं ॥४६॥तृष्णा कढी हीं कालवणें । प्रपंच भोजना गोडी जेणें । भवदुःखाचे ग्रास घेणें । रुचिकरपणें जिचेनि ॥४७॥दीर्घद्वेषें मत्सर मांडे । तदविष्कारें साखर सांदे । मोहघृतेसीं संवगडे । ग्रास रोकडे अर्पिती ॥४८॥लवण शाका कुसुंबिरी । भरितें कालवणें सांबारीं । ऐशा अनेक विकारपरी । गडि श्रीहरि अर्पिती ॥४९॥पापड कुरवड्या सांड्या । स्पृहालज्जादि असुया । वडे घारगे ढोकळिया । गडी अर्पिती हरिवदनीं ॥१५०॥परस्परें घालिती कवळ । भोक्ता लक्षिती श्रीगोपाळ । भोग्यभोक्ता भोक्तृत्वमेळ । होती निर्मळ तत्त्यागें ॥५१॥ग्रास घालूनि कृष्णामुखीं । आपण तोषोनि होती सुखी । हास्य करिती सकौतुकीं । एकमेकीं उत्साह ॥५२॥अनेक अन्नाच्या परवडी । पृथक् पृथक् विचित्र गोडी । परस्परें घालूनि तोंडीं । जेविती गडी कृष्णेंशीं ॥५३॥हास्यविनोद गदारोळी । परस्परें करिती रळी । अनंत ब्रह्मांडें प्रतिपाळी । भोजनकेलि तेणेंशीं ॥५४॥हांसती आणि हांसविती । ऐसे कृष्णाचे सांगती । परमेश्वरेंशीं जेविती । देवां दाविती वांकुल्या ॥१५५॥मग कृष्णातें म्हणती गडी । कान्हो कैशी हे तुझी खोडी । आमुच्या जाळ्यांची केली झाडी । मोठा वराडि झालासी ॥५६॥सिदोरियांचा सरला सांठा । कृष्णा खादाड तूं रे मोठा । आगि लागो तुझिया पोटा । तुझ्या चेष्टा तुज गोड ॥५७॥मग कृष्ण म्हणे रे सावधान । तुम्हीं अर्पिलें त्वंपद पूर्ण । आतां माझें तत्पद अन्न । सुखें भोजन करा रे ॥५८॥ऐसें ऐकोनि संतोषले । श्रीकृष्णवदन पहात ठेले । कृष्णस्मरणें गर्जिन्नले सावध झाले भोजना ॥५९॥म्हणे पेंध्यासी वांकुडा । या कृष्णाचा स्वभाव कुडा । आमुचा घेतल्यावीण झाडा । आपुला तुकडा दाविना ॥१६०॥पेंधा म्हणे उगाचि राहें । कृष्ण कवळ देणार आहे । नेदीच तरी आमुचें भय । त्यांसि काय विचारीं ॥६१॥रागें बोलिला सुदामा । आमुचें खाऊं नेदी आम्हां । पुढें येणार कोण्या कामा । हा काय ब्रह्मा उतरला ॥६२॥बोबडा म्हणे बथा थारे । मात बोलेन यांतें म्होरें । आमुतें अन्न खाऊनि थारें । आपुलें कांरे नेदी हा ॥६३॥वांकुडा म्हणेरे वांकुडें । बोला तितुकें अवघें कुडें । ग्रास येतां मुखापुढें । विघ्न रोकडें हें त्यांसीं ॥६४॥वृथा बोलोनि नाशितां काय । अवघे कृष्णाचे धरा पाय । त्यासीच म्हणा बापमाय । होईल सदय तेव्हां तो ॥१६५॥सर्वें प्रांतां घननीळा । सावध म्हणे वत्सपाळां । तत्पदसिदोरिच्या कवळा । घ्यारे सकळां देतों मी ॥६६॥विरक्तीचा देतां कवळ । सोज्वळ झाले नेत्रकमळ । तेणें पहाती वत्सपाळ । ब्रह्मगोळ विवळूनि ॥६७॥वांकुल्या दाविती सुरवरां । म्हणती स्वर्गींच्या वानरां । केवळ कर्मफळांचा चारा । या प्रकारा नेणती ॥६८॥ऋतुपालटें फळांसी अंत । तेव्हां अचुक अधःपात । अन्यफळांतें धुंडित । नाना चढत देहद्रुमीं ॥६९॥अनेक सृकुताचिया राशि । जोडुनि झाले स्वर्गवासी । ते पाहती आश्चर्येंशीं । बाळकेलीसी हरीचे ॥१७०॥ N/A References : N/A Last Updated : April 29, 2017 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP