मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|हरिवरदा|अध्याय १३ वा| श्लोक ३ ते ५ अध्याय १३ वा आरंभ श्लोक १ ते २ श्लोक ३ ते ५ श्लोक ६ ते ८ श्लोक ९ ते १० श्लोक ११ श्लोक १२ ते १५ श्लोक १६ ते १९ श्लोक २० ते २३ श्लोक २४ ते २६ श्लोक २७ ते ३० श्लोक ३१ ते ३३ श्लोक ३४ ते ३७ श्लोक ३८ ते ४३ श्लोक ४४ ते ४६ श्लोक ४७ ते ५१ श्लोक ५२ श्लोक ५३ श्लोक ५४ ते ५६ श्लोक ५७ श्लोक ५८ ते ६४ अध्याय १३ वा - श्लोक ३ ते ५ श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा Tags : harivaradakrishnapuranकृष्णपुराणहरिवरदा श्लोक ३ ते ५ Translation - भाषांतर शृणुष्वावहितो राजन्नपि गुह्यं वदामि ते । ब्रूयुः स्निग्धस्य शिष्यस्य गुरवो गुह्यमप्युत ॥३॥राष्ट्रभंगार्थ परचक्र । क्षोभलें असतां महाघोर । त्याचें ऐकती अभयपत्र । तेंवी सादर हें ऐकें ॥८४॥किं कुटुंबेंसीं कारागार । प्राप्त झालिया अति दुष्कर । ते ऐकती निर्गममंत्र । तेंवी सादर हें परिसें ॥८५॥कीं एकुलता गुणाढ्य बाळ । ग्रासावया प्रवर्ते काळ । तेथ उपाय कथितां पुण्यशीळ । ऐके अविकळ माउली ॥८६॥त्याहीहूनि कोटिगुणें । सादर होऊनि अंतःकरणें । परम गुह्य हें श्रवण करणें । तोषोनि प्रश्नें कथितों मी ॥८७॥हें तों अकथ्य परम रहस्य । परी मिनल्या सत्पात्र स्निग्ध शिष्य । गुह्यही बोधिती सद्गुरु त्यास । सविश्वास जाणोनि ॥८८॥तरी तुज देखोनि सद्गुणालय । स्थितप्रज‘ज अमलाशय । अनसूय आणि हरिगुणप्रिय । कथनीं हृदय प्रशस्त ॥८९॥म्हणसी तुम्हांसै रहस्य कोण । तरी जे ब्रह्मविद्या परम गहन । इयेसि अपात्र सामान्यजणें । जेवीं अयोग्य श्वान रडे तें ॥९०॥पूर्ण वैराग्यें आथिले । अंतर्निष्ठ मुमुक्षु भले । सनकादिकांचे पंक्ति आले । ते भुकेले या रसा ॥९१॥प्राकृत प्रपंचा बा दवडी । देखोनि पडिले विषयगोडी । त्यांसि एथींची अनावडी । कीं ते बराडी भवभणग ॥९२॥त्यांसि प्रवृत्ति जे प्रयोजिली । श्रेष्ठीं पाहिजे ती रुचविली । ब्रह्मविद्या गुप्त केली । भली पाहिली यालागीं ॥९३॥ज्याचे पदरीं नाहीं कवडी । त्यासि राज्यभोगाच्या परवडी । भोगूं सांगतां न टके जोडी । मानी वांकुडी शिकवण ॥९४॥अनेक सुकृताच्या बळें । विषयविरागें प्रज्ञा उजळे । त्यांसि हे ब्रह्मविद्या आकळे । येर आंधळे या ठायीं ॥९५॥असुकृती जे अविरक्त । त्यांसि कथितां हा परमार्थ । उभयाधिकारीं होती च्युत । विषयासक्त म्हणोनि ॥९६॥विरक्तीवीण ब्रह्मविद्या । न फळे न वचेचि अविद्या । कर्मफळाच्या अर्थवादा । जाणोनि श्रद्धा मग नुपजे ॥९७॥कर्मब्रह्म उभय भ्रष्ट । अध्यात्मवक्ते विषयनिष्ठ । होती श्वपचाहून कनिष्टः । ते पापिष्ठ या बोधें ॥९८॥रांधणें न तपतां भाकरी । कीं आंधण न येतां वैरिली खिरी । तैसा अयोग्य अनधिकारी । हें वर्म चतुरीं जाणावें ॥९९॥इत्यादि वचनीं रहस्यखुण । शुकें नृपासि कथोन पूर्ण । पुढें चालविलें व्याख्यान । तें सर्वज्ञ परिसोत ॥१००॥तथाऽघवदनान्मृत्यो रक्षित्वा वत्सपालकान् । सरित्पुलिनमानीय भगवानिदमब्रवीत् ॥४॥कालरूप व्याळवदना - । पासूनि वत्सवत्सपगणां । रक्षोनि आणिले सरोवरपुलिना । मग या वचनां त्यां बोले ॥१॥श्रीभगवानुवाच - अहोऽतिरम्यं पुलिनं वयस्याः स्वकेलिसंपन्मृदुलाच्छवालुकम् ।स्फुटत्सरोगंधहृतालिपत्रिकध्वनिप्रतिध्वानलसद्द्रुमाकुलम् ॥५॥भोजनविधानाकारणें । पुलिनस्तवनें मधुसूदनें । किजे वयस्य संबोधनें । तेंचि श्रवणें अवधारा ॥२॥वत्सपां म्हणे कंबुकंठ । रम्य पहा हो वाळुवंट । जेथें क्रीडतां यथोक्त । तोष उत्कट दुणवटे ॥३॥आपुले क्रीडेची संपत्ति । ते एथ असे सर्व आयती । जेथ क्रीडतां निजविश्रांति । नाठवे चित्तीं कल्पना ॥४॥विनयतेचें मवाळपण । विशुद्ध जैसें अंतःकरण । स्वच्छ सुंदर मृदुत्तर पूर्ण । गुणसंपन्न पुलिन हें ॥१०५॥विकसित पद्मीं सरोवर भरलें । दिव्यसौरभ्यें आथिलें गंधपाशीं आकर्षिले । भ्रमरवर्गा पंकजीं ॥६॥पक्षी जलाशयाश्रयीं । आपुलिया स्व स्व विषयीं । रमोनि रुंजतां जलाच्या ठायीं । ते उमटे नवाई ध्वनीची ॥७॥तये ध्वनीचा प्रतिनाद । द्रुमीं काननीं उमटे विशद । तेणें मुखरित पादपवृंद । विलसे तोषद पुलिन हें ॥८॥ N/A References : N/A Last Updated : April 29, 2017 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP