मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|हरिवरदा|अध्याय १३ वा| श्लोक ३१ ते ३३ अध्याय १३ वा आरंभ श्लोक १ ते २ श्लोक ३ ते ५ श्लोक ६ ते ८ श्लोक ९ ते १० श्लोक ११ श्लोक १२ ते १५ श्लोक १६ ते १९ श्लोक २० ते २३ श्लोक २४ ते २६ श्लोक २७ ते ३० श्लोक ३१ ते ३३ श्लोक ३४ ते ३७ श्लोक ३८ ते ४३ श्लोक ४४ ते ४६ श्लोक ४७ ते ५१ श्लोक ५२ श्लोक ५३ श्लोक ५४ ते ५६ श्लोक ५७ श्लोक ५८ ते ६४ अध्याय १३ वा - श्लोक ३१ ते ३३ श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा Tags : harivaradakrishnapuranकृष्णपुराणहरिवरदा श्लोक ३१ ते ३३ Translation - भाषांतर समेत्य गावोऽधोवत्सान्वत्सवत्योऽप्यपाययन् । गिलंत्य इव चांगानि लिहंत्यः स्वौधसं पयः ॥३१॥ऐशिया गोवर्धनतळवटीं । उड्या घालूनि वत्सां निकटीं । धेनु येऊनि दाटोदाटीं । पडली मिठी स्नेहाची ॥७८॥नवीं वत्सें गृहीं तान्हीं । पहिलीं कृष्णात्मकें रानीं । देखोनि पान्हा न धरवे स्तनीं । अगाध करणी कृष्णाची ॥७९॥घरींचीं विसरोनि वांसुरें । कृष्णात्मकेंचि स्नेहभरें । पाजिल्या झाल्या अत्यादरें । प्रेम बावरें आवरेना ॥३८०॥वत्सें गिळिती मोहेंकरूनि । तैशा चाटिती कळवळूनि । वत्सें झोंबती एके स्तनीं । इतर धरणीं पाझरती ॥८१॥स्ववोहाचीं पाजिती पयें । हुंबरताती सप्रेममोहें । वत्सें चाटिती लवलाहें । नम्रदेहें गोंवताती ॥८२॥ऐसा धेनूचा वोरस । रामें देखिला विशेष । बल्लवांचा प्रेमोत्कर्ष । तोही अशेष अवधारीं ॥८३॥गोपास्तद्रोधनायासमौघ्यलज्जोरुमन्युना । दुर्गाध्वकृच्छ्रतोऽभ्येत्य गोवत्सैर्ददृशुः सुतान् ॥३२॥धेनु देखोनि वत्सतांडी । बळेंचि मारिती मुसांडी । बल्लव झोडिती दांडीं धोंडीं । देती मुरकुंडी न वळतां ॥८४॥धेनु न फिरत भरल्या रान । बल्लवांचा निष्फळ यत्न । तेणें सलज्ज साभिमान । श्वास दाटोनि धांवती ॥३८५॥हातीं धोंडें आणि डांगा । क्रोधें कांपवी सर्वांगा । श्वास दाटोनि लागवेगां । दुर्गम मार्गा अवलंबिती ॥८६॥सक्रोध सल्लज साभिमान । दुर्गमीं धांवतां पावला शीण । देखोनि गोवत्सें निजनंदन । बल्लवगण कळवळिला ॥८७॥जेवीं हिक्याची पुतळी । स्नान करूनि तप्त तैलीं । होऊं पाहे जंव सोंवळी । तंव वेगळी निवडेना ॥८८॥तेवीं सक्रोधवृत्ति गोप । धेनूवरी करितां कोप । तंव त्या स्ववत्सीं देखोनि सकृप । पावली क्रोधोर्मि लयातें ॥८९॥हरिमायेची विचित्र करणी । स्नेह वाढे अंतःकरणीं । उचंबळे तो सर्वां करणीं । बुद्धिविवरणीं प्रवर्ते ॥३९०॥गोप आपुलाले तोक । देखते झाले कृष्णात्मक । क्रोध लज्जा आयास दुःख । विसरोनि सुख पावले ॥९१॥म्हणती धेनु या स्नेहाळ । वत्सें देखोनि उताविळ । येऊनि चाटिती आपुलें बाळ । आम्ही चांडाळ निषेधूं ॥९२॥तदीक्षणोत्प्रेमरसाप्लुताशया जातानुरागा गतमन्यवोऽर्मकान् ।उदुह्य दोर्मिः परिरभ्य मूर्धनि घ्राणैरवापुः परमां मुदं ते ॥३३॥जगदात्मा जो जगन्मय । त्यातें भावूनि आत्मतनय । दिठी देखतां वाढला स्नेह । निमग्न हृदय तद्रसीं ॥९३॥कृष्णें झाले निपुत्रपणें । प्रेमोत्कर्षरसजीवनें । निमग्न केलीं बल्लवमनें । पूर्वाभिमानें सांडिलीं ॥९४॥धेनु नावरतां लज्जित । तेणें क्रोधें झाले तप्त । धांवतां पावले क्लेश बहुत । ते समस्त विसरले ॥३९५॥वत्सें आणिलीं धेनूसमोर । येणें सापराध मानूनि कुमार । क्रोधें ताडणीं जे तत्पर । ते विकार विसरले ॥९६॥धेनु वळितां नाटोपती । त्यांच्या ताडणीं सक्रोधवृत्ति । गळोनि गेली ते केउती । झाली उपरति कारुण्यें ॥९७॥ गाई वसुरवां पाजिती । देखोनि वारूं न इच्छिती । निजकुमारांतें आलिंगिती । मूर्ध्ने हुंगिती सप्रेमें ॥९८॥कुमारां प्रेमें आलिंगूनि । अवघ्राण करूनि मूर्ध्नि । निमग्न झाले स्वानंदघनीं । गेले विसरोनि कल्पना ॥९९॥ आत्माकार होतां वृत्ति । हरपोनि जाय विषयस्फूर्ति । न थरे पृथक् देहस्मृति । कैंची संसृति ते ठायीं ॥४००॥तोचि परमात्मा दृष्टीपुढें । लेऊनि पुत्रत्वा जैं आवडे । झांकती उघडी तें कवाडें । स्वयंभ उघडें परब्रह्म ॥१॥विश म्हणोनि अमृतपान । न मरोनि जैं मरण होणें । तेवीं पुत्रत्वें कृष्णालिंगन । समाधिभोजन बल्लवीं ॥२॥परम मोद जो आत्मानुभव । स्वपुत्र कवळूनि भोगिती बल्लव । विरोनि गेला भेदभाव । झाले स्वयमेव स्वानंद ॥३॥ N/A References : N/A Last Updated : April 29, 2017 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP