मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|हरिवरदा|अध्याय १३ वा| श्लोक ३४ ते ३७ अध्याय १३ वा आरंभ श्लोक १ ते २ श्लोक ३ ते ५ श्लोक ६ ते ८ श्लोक ९ ते १० श्लोक ११ श्लोक १२ ते १५ श्लोक १६ ते १९ श्लोक २० ते २३ श्लोक २४ ते २६ श्लोक २७ ते ३० श्लोक ३१ ते ३३ श्लोक ३४ ते ३७ श्लोक ३८ ते ४३ श्लोक ४४ ते ४६ श्लोक ४७ ते ५१ श्लोक ५२ श्लोक ५३ श्लोक ५४ ते ५६ श्लोक ५७ श्लोक ५८ ते ६४ अध्याय १३ वा - श्लोक ३४ ते ३७ श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा Tags : harivaradakrishnapuranकृष्णपुराणहरिवरदा श्लोक ३४ ते ३७ Translation - भाषांतर ततः प्रवयसो गोपास्तोकाश्लेषनुस्निर्वृताः । कृच्छ्राच्छनैरपगतास्तदनृस्मृत्युदश्रवः ॥३४॥प्रबुद्ध वयस्क ते गोपाळ । कृष्णमय जे वत्सपाळ । आलिंगूनि सुखकल्लोळ । झाले केवळ निजांगें ॥४॥त्यानंतरें परमक्लेशें । सुतानुस्मृति निजमानसें । करितां हळुहळूच पूर्वाध्यासें । जीवात्मदशे भेटविलें ॥४०५॥आनंदाचें भरतें पोटीं । सप्रेम अश्रु स्रवती सृष्टि । लब्ध अवस्था जिरवूनि पोटीं । पहाती दृष्टि उघडूनि ॥६॥ऐशी गाई गोपिकांची । वृषभादिका बल्लवांची । देखोइ अभिवृद्धि प्रेमाची । मनीं विवंची बळराम ॥७॥व्रजस्य रामः प्रेमर्द्धेर्वीक्ष्यौत्कंठ्यमनुक्षणम् । मुक्तस्तनेष्वपत्येष्वप्यहेतुविदचिंतयत् ॥३५॥प्रेमबुद्धीची उत्कंठता । व्रजींची पतिक्षणीं अभिवर्धतां । रामें पाहोनि विवरी चित्ता । ते तत्त्वतां अवधारीं ॥८॥अनुक्षणीं प्रेम वाढे । तेणेम उत्कंठा अधिक चढे । कारण कांहीं दृष्टी न पडे । हें नूतन कोडें विचारीं ॥९॥नवप्रसूता तान्हीं वत्सें । घरीं टाकूनि जैसीं तुच्छें । स्तनींचीं सुटलीं तें स्वेच्छें । पारठीं वत्सें पाजिती ॥४१०॥नव वत्सांतें न आणिती दृष्टी । दुरूनि पहातां थानतुटी । उड्या घालूनि गिरिकपाटीं । आल्या निकटीं धेनुका ॥११॥धेनुवत्सांच्या न्याहळीं । थानें चार्हींही मोकळीं । धारा पडती भूमंडळीं । हें नव्हाळी प्रेमाची ॥१२॥बाळकें विसरोनि घरींचीं तान्हीं । वत्सपां पाजिती प्रेमें जननी । पान्हा मोकळा नावरे स्तनीं । वोरस मनीं प्रेमाचा ॥१३॥गाई गोपींचा हा मोह । बल्लव वृषांचाही हा देह । वत्सपां देखोनि द्रवे स्नेह । हा नवलावो न चोजवे ॥१४॥विवरूनि पहातां पहातां आपुल्या ठायीं । एथें कारण न दिसे कांहीं । हेतु नेणतां रामहृदयीं । करी कांहीं विवंचना ॥४१५॥ते विवंचनेचीपरी । श्लोकद्वयें शुकवैखरी । परीक्षितीसी कथन करी । तेंचि चतुरीं परिसावें ॥१६॥किमेतदद्भुतमिव वासुदेवेऽखिलात्मनि । व्रजस्य सात्मनस्तोकेष्वपूर्वं प्रेम वर्धते ॥३६॥प्राणिमात्रांसी आत्मप्रेम । अखिलात्मा हा मेघश्याम । सगुणवेषें झाला सुगम । यास्तव परम प्रिय वाटे ॥१७॥बल्लवगोपीगोवृषांची । असो अखिल चराचरांची । कृष्णीं जडली प्रेमरुचि । हे पूर्वींच मी जाणें ॥१८॥परी हें वाटे परमाद्भुत । गाईगोपिका आपुले सुत । देखोनि होती स्नेहवंत । प्रिय भगवंत ज्यापरी ॥१९॥हीं तो मानवें गोरुवें । परी मीही जाकलों प्रेमभावें । वत्सपत्सप हे आघवे । आत्मगौरवें वेधिती ॥४२०॥पूर्वीं कृष्णचि होता प्रिय । आतां अवघाचि समुदाय । कृष्णा ऐसा सर्वां प्रिय । मजही होय किमर्थ ॥२१॥स्वपुत्रमोहें मनुजें गुरें । कवळिलीं हें म्हणों खरें । परी मजलागीं कां परावीं पोरें । सप्रेमभरें प्रिय गमती ॥२२॥आणिकही वाटे अपूर्व । असो गोगोपींचा मोह । परी वृषभादि जे गोप सर्व । प्रेमलाघव वाढविती ॥२३॥( विषयभूरे पंचभूते । प्रथक् प्रथक् मूर्तिमते । तमात्मके स्वगुणे सहिते । प्रथक् प्रभूतें अर्चिती ॥४२३॥ ) त्याहीमाजि अपूर्व एक । जातमात्र विसरोनि तोक । गोगोपींचा प्रेमा अधिक । पूर्ववत्सकवत्सपीं ॥२४॥माझा यांवरी प्रेमा गहन । इथें प्रेमवृद्धीचें कारण । न कळे म्हणोनि संकर्षण । करी विवरण मानसीं ॥४२५॥केयं वा कुत आयाता दैवी वा नार्युतासुरी । प्रायो मायाऽस्तु मे भर्तुर्नान्या मेऽपि विमोहिनी ॥३७॥कोण माया हे कोणीं प्रेरिली । किंवा कोठून किमर्थ आली । व्रजासकट मजही भुली । हे न वचे केली विवंचना ॥२६॥जरी हे म्हणों नराची माया । ते समर्थ मनुजेंचि मोहावया । याही माजि ते योगियां । भुलवावया असमर्थ ॥२७॥माया म्हणों हे आसुरी । ते नरां असुरां मोहनकारी । इंद्रादिश्रेष्ठां सुरांवरी । तिची थोरी न चाले ॥२८॥दैवी म्हणों हे निष्टंक । ते भुलवूं न शके ब्रह्मादिक । अन्य जे का सिद्धप्रमुख । ते मम मोहक न होती ॥२९॥ब्रह्मादिकांच्याही माया । समर्थ न होती भुलवावया । तो मी भ्रांत केलों इयां । या आश्चर्या बहुमानी ॥४३०॥एवं सर्व प्रकारें करून । दृढ निश्चय हाचि जाण । विश्वमोहक जो भगवान । तो श्रीकृष्ण जगदात्मा ॥३१॥ही त्या कृष्णाची माया । समर्थ मजही भुलवावया । म्हणून भ्रांत केलों इयां । मनुजें कार्या स्वामीच्या ॥३२॥माझ्या स्वामीचें हें कृत्य । प्रायशा हाचि निश्चय अत्य । मजही मोहावया समर्थ । अन्य प्राकृत न होती ॥३३॥ N/A References : N/A Last Updated : April 29, 2017 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP