मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्रीरंगनाथस्वामीकृत पदसंग्रह|
पंचक

पदसंग्रह - पंचक

रंगनाथ स्वामींचा जन्म शके १५३४ परिघाविसंवत्सर मार्गशीर्ष शुद्ध १० रोजीं झाला.


[भुजंगप्रयात गण य, य, य, य.]

परं ज्योति जे सर्व ज्योतीसि पाहे ॥ जया पाहतां पाहणेंही न साहे ॥
बहिर्मूख ते लक्षिती चर्मचक्षीं ॥ नये प्रत्यया लक्षितें कोण लक्षी ॥१॥
अलक्ष्यासि लक्षी दुजा कोण ऐसा ॥ धरी प्रत्ययो अंतरीं पूर्ण कैसा ॥
स्वसंवेद्य पाहा स्वयें सर्वंसाक्षी ॥ नये० ॥२॥
मना प्रत्ययातें नसे रीव जेथें ॥ प्रवेशे कसें चक्षरादीक तेथें ॥
विनाशेनि द्रष्टयासि द्दष्टत्व भक्षी ॥ नये० ॥३॥
जया पाहतां हेतु गेला अभावा ॥ असा हा नसे सत्य सिद्धांत ठावा ॥
मृगाचेपरी नोय जैसें उपेक्षी तयालागिं जाणा ॥ न रगे कदांही भरे हीनपक्षीं ॥
नये प्रत्यया लक्षि तें कोण लक्षी ॥५॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP