मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्रीरंगनाथस्वामीकृत पदसंग्रह|
पदे ६५६ ते ६६०

पदसंग्रह - पदे ६५६ ते ६६०

रंगनाथ स्वामींचा जन्म शके १५३४ परिघाविसंवत्सर मार्गशीर्ष शुद्ध १० रोजीं झाला.


पद ६५६. [चाल-धातुमूर्ति लक्ष प्रतिमा.]
तीर्थविधी सहजीं सहज हो ॥ध्रु०॥
सद्नुरुकृपें नित्य पुण्यपावन चिद्नंगचें घडलें स्नान ॥ अहंममता दोष स्वप्नाही नाढळे मन हें झालें उन्मन ॥
नाहं देही न में देहोया प्रत्ययें प्रायश्वित्त परिपूर्ण ॥ संकल्पकेश वाढलें त्यांचें मुंडन तेंचि वपन ॥१॥
विष्णुपदीं काया पिंडप्रदान ब्रह्मीं ब्रह्मयज्ञ केला ॥ असंभावना विपरीत भावना तिळांजुळी दिधल्या त्याला ॥
ब्रह्माहमस्मि या मंत्रेंकरुनी हा हेतू सिद्धीसि गेला ॥ विध्युक्त सुस्नात पुण्यपापातीत निष्कलंकतेसि आला ॥२॥
अनुभवी अनुभवें अनुभव जाणती इतरांसि कानडें भासे ॥ जो नर येथेंचि गौरव नेणें तो यागि पाहोनि हांसे ॥
चंद्रामुतें तृप्त चकोरें होती काकपक्षी तो त्रासे ॥ निजरंगें रंगले त्यांचेनि दर्शनें त्रिविध ताप पाप नासे ॥३॥

पद ६५७. [काशीराजकृत.]
नर नारायण ते देही ॥ध्रु०॥
वर्णाश्रम विधियुक्त आचरती ॥ सव्कर्मे ब्रह्मार्पण करिती ॥
देहीं देहात्मसंबंध न धरिती ॥ हरिभजनें भुवनत्रय मरिती ॥१॥
जाणति विषवत्‌ विषयपसारा ॥ नित्य निवडिती सारासारा ॥
साच न मनैति विवर्त सारा ॥ मुळिंहुनि आंचवले संसारा ॥२॥
षड्ररिपु आसुरी दुर्जन गंजन ॥ दीनदयानिधि भवभयभंजन ॥
निजानंदघन सज्जन रंजन ॥ सत्य सनातन नित्य निरंजन ॥३॥
भेदाभेदविवर्जित झाले ॥ परमामृत रसपानें धाले ॥
भासत परि ते जीतचि मेले ॥ जे कोठें आले ना गेले ॥४॥
पूर्ण सबाह्म अंतर्यामीं ॥ ब्रह्म सनातन निजसुखधामीं ॥
निर्गुण नि:संग या गुणग्रामीं ॥ श्रीरंगानुज-आत्मज स्वामी ॥५॥

पद ६५८.
अच्युतानंता अद्ववा श्रीरंगा ॥ध्रु०॥
दीनानाथ दीनबंधु सुखघनकरुणासिंधु निर्गुणा नि:संगा ॥१॥
भक्तकामकल्पतरू पूर्णब्रह्म सद्नुरू अव्यय अभंगा ॥२॥
सहज पूर्ण निजानंद निर्मळ तूं निर्द्वंद्व मुनिजनह्रद‌पद्मभृंगा ॥३॥

पद ६५९.
हरिपायीं भाव धरावा ॥ध्रु०॥
नवविध भक्तीयोगें ॥ विषय विषवत्‌ त्यागें ॥ भवनिधि कां न तरावा ॥१॥
नाहं कर्ता याहि वर्मे ॥ ब्रह्मार्पण सत्कर्मे ॥ करुनी घडली हाही हेत हरावाम ॥२॥
सहज पूर्ण निजानंद ॥ लागोनि तयाचा छंद ॥ निजरंग कां न वरावा ॥३॥

पद ६६०.
जग नग जनक कनक स्वामी तूं ॥ध्रु०॥
तूं अज अव्यय हाचि सुनिश्वय ॥ नानारूपीं नामीं तूं ॥१॥
व्याप्य व्यापक अनेकीं एक सबाह्म अंतर्यामीं तूं ॥२॥
पूर्ण रंग नि:संग अभंग ॥ मुळींच नाहीं जेथें मी तूं ॥३॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP