मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्रीरंगनाथस्वामीकृत पदसंग्रह|
पंचक

पदसंग्रह - पंचक

रंगनाथ स्वामींचा जन्म शके १५३४ परिघाविसंवत्सर मार्गशीर्ष शुद्ध १० रोजीं झाला.


[इंद्रवज्रा, गण त, त, ज, ग, ग.]

कोणी फिरे मंडळ या धरेचें ॥ वास्तव्य एका गिरिकंदरींचें ॥
वातांबुपर्णाशन एक पाहीं ॥ विश्रांतिचें मंदिर तेथ नाहीं ॥१॥
कोणी मनें शक्तिरुपा आराधी ॥ अष्टांगयोगाप्रति एक साधी ॥
किं नग्न मौनी रत एक देहीं ॥ विश्रांति० ॥२॥
एकांत एकाप्रति हा आनंद ॥ एका बहूभाषण हाचि छंद ॥
दारा धनीं एक विरक्त देहीं ॥ विश्रांति० ॥३॥
वेदार्थिंच्या उत्तर सारभागा ॥ जो सद्रुरुच्या वचनें विभागा ॥
पावेचिना जैं निजगूज कांहीं ॥ विश्रातिचें० ॥४॥
रंगीं निजानंदचि रंगलाहे ॥ आहे निजीं रंग कदां न साहे ॥
जैं ना कळे हें तरि भार वाही ॥ विश्रांतिचें मंदिर तेथ नाहीं ॥५॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP