मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्रीरंगनाथस्वामीकृत पदसंग्रह|
पदे ५७ ते ५८

पदसंग्रह - पदे ५७ ते ५८

रंगनाथ स्वामींचा जन्म शके १५३४ परिघाविसंवत्सर मार्गशीर्ष शुद्ध १० रोजीं झाला.


पद ५७.
विवेक उद्धव मथुरेहुनी ॥ कृष्णें पाठविला सज्ञानी ॥
तेणं गोकुळिंच्या गौळणी ॥ बोधं बोधियल्या कैशा ॥
कृष्ण वियोगें त्या मनीं ॥ सगुण स्वरूप अनुसंधानीं ॥
आसनीं शयनीं शयनीं गमनागमनीं ॥ कृष्णध्यान चिंतिती ॥
राधारमण चतुर्भुज हरी ॥ शंख-चक्र-पीतांबरधारी ॥
नंदनंदन तो कसारी ॥ य संसारीं दुर्लभ ॥
ऐशा वेधल्या ते समयीं ॥ उद्धव पातला लवलर्वीं ॥
धांवुनि येउनि मग त्यां पाही ॥ ह्मणती एकट आलासिकां ॥१॥
उद्धवा तें रूप काय झालें ॥धृ०॥
ध्वज वज्रांकुश पाहीं ॥ सामुद्रिकें ठाईं ठाईं ॥ घोटीं इंद्रनीळ मणी पाहीं ॥
कृष्णदेहीं शोभती ॥ पोटरिया जानुजघनु ॥ रंभास्तंभ उपमा सानु ॥
दिव्य सौदामिनी कीं भानु ॥ तैसा पातांबर कासे ॥
अनंत ब्रह्मांडें हीं उदरीं ॥ त्रिगुण त्रिवळी त्या माझारी ॥
ह्रदयीं श्रीवत्सा शेजारीं ॥ कंठीं कौस्तुभ विराजे ॥
सुंदर वदनेंदु सोज्वळ ॥ दंतपंक्तिचा झळाळ ॥
राजीवनयन नाशिक सरळ ॥ विशाळ भाळ चांगल ॥२॥
श्रवणीं कुंडलें तळपती ॥ गगनीं न समाय ते दिप्ती ॥
सुरासुर गुरु लोपति ॥ बृहस्पति आणि शुक्रा ॥
बाहू सरळ शुंडादंड ॥ पराक्रमें अति प्रचंड ॥
अभय दानीं ते अखंड ॥ उदारपणें उभारले ॥
मनगटीं वीरकंकणें ॥ मिरवे मुद्रिकेचें लेणें ॥
तळहात ते सुंदरपणें ॥ वोप देती अरुणातें ॥
अनर्घ्य चिद्रत्नें गोमटीं ॥ तो शोभतो मस्तक मुकुटीं ॥
मयोरपत्रें त्या तळवटीं ॥ वीर गुंठी सु-बद्ध ॥३॥
उद्धवा तें रूप काय झालें ॥धृ०॥
उद्धव ह्मणे तुह्नी नारी ॥ इंद्रिय वृत्ति विषयविहारी ।
अखंड नाम रूपावरी ॥ द्दश्य ह्मणे तुह्मी नारी ॥
इंद्रिय वृत्ति विषयविहारी ॥ अखंड नाम रूपावरी ॥
द्दश्य द्दष्टी भावना ॥ नामरूपाचा प्रसंग ॥
मिथ्या कल्पनेचें अंग ॥ जीव नीर हरी आणि तरग ॥
वाचा-रंभण मात्न ते ॥ ब्रह्म नि:संग परिपूर्ण ॥
जेथें नाहीं गुणावगुण ॥ कल्पनेची बोळवण ॥
कृष्ण कचा ते ठायीं ॥ शुद्ध बुद्ध नित्य मुक्त ॥
छेद भेद रहित युक्त ॥ घनानद व्यक्ताव्यक्त ॥
हाही शब्द खुटला ॥४॥
गौळणी पूर्णबोधें बोधल्या ॥धृ०॥
कर्पूरदीपकाच्या मेळीं ॥ धूम्र कज्जल ना काजळी ॥
निवडुं जातां ते निराळी ॥ कोठें उरली सांग पां ॥
सत्‌ चित्‌ आणि आनंद ॥ हा अद्वैत वृत्तीचा भेद ॥
जाणो जातां ऐसें वेद ॥ मौनपणें राहिले ॥
सहज पूर्ण निजानंद ॥ हाही खुंटला अनुवाद ॥
महाकल्पांतीं निर्द्वंद्व ॥ जैसें जळमय नभ झालें ॥
रंगीं रंगल्या सद्वृत्ति ॥ सद्रुरुक्रुपें पूर्ण प्राप्ती ॥
अवघा कृष्ण आदिं अंतीं ॥ आपणासहित संचला ॥५॥

पद ५८.
विठ्ठलराया पंचाक्षरिया येईं रे ॥ भ्रमिस्त झालों भवभ्रांति माझी नेईं रे ॥धृ०॥
विराटपुरुषा विश्वेशा तूं गोसावी ॥ विषय भुतें झडपिलें मज जीव भावीं ॥
विशेष पांचाचीं पंचवीस जाणावीं ॥ विशाळ रूपें झोंबलीं या तनु-गंवीं ॥१॥
ठसा पडिला म्हणती हे भूवैकुंठ ॥ ठकडा मोठा पंचाक्षरी कंबुकंठ ॥
ठकार ठाणे पाहातां तूं मुळ-कठ ॥ ठसकेनें हे ठसविली पंढरी पेंठ ॥२॥
लक्ष्मीकांता हा तुझा मंत्र सखोल ॥ लवकरि करुणासिंधू वचनें बोल ॥
लटिकीं भूतें मृगजळा कैंची वोल ॥ लक्षूं जातां अनुभवें अवघें फोल ॥३॥
राजीवनयना दिनबंधु जगदोद्धारा राधारमणा ॥ निर्गुणा निर्विकारा ॥
राम-रक्षा करुनि हा भूत-पसारा ॥ राहे ऐसें तूं करीं परमोदारा ॥४॥
यांच्या करणें तुजला हे विठ्ठलराया ॥ यावरी आवरा आवरीं हे आपुलि माया ॥
यातना हे भोगितां श्रमली काया ॥ यावें वेगीं श्रीरंगा तरणोपाया ॥५॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP