मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्रीमहालक्ष्मीची पदे| सत्कवींची काव्ये भाग ९ श्रीमहालक्ष्मीची पदे मुक्तेश्वरांच्या वाङ्मयातील श्रीमहालक्ष्मी भाग १ मुक्तेश्वरांच्या वाङ्मयातील श्रीमहालक्ष्मी भाग२ मुक्तेश्वरांच्या वाङ्मयातील श्रीमहालक्ष्मी भाग ३ मुक्तेश्वरांच्या वाङ्मयातील श्रीमहालक्ष्मी भाग ४ जोशी घराण्याची श्रीमहालक्ष्मीभक्ती भाग १ जोशी घराण्याची श्रीमहालक्ष्मीभक्ती भाग २ श्रीमहालक्ष्मीसेवा भाग १ श्रीमहालक्ष्मीसेवा भाग २ श्रीमहालक्ष्मीसेवा भाग ३ श्रीमहालक्ष्मीसेवा भाग ४ सत्कवींची पदे भाग १ सत्कवींची पदे भाग २ सत्कवींची पदे भाग ३ सत्कवींची पदे भाग ४ सत्कवींची पदे भाग ५ सत्कवींची पदे भाग ६ सत्कवींची पदे भाग ७ सत्कवींची काव्ये भाग १ सत्कवींची काव्ये भाग २ सत्कवींची काव्ये भाग ३ सत्कवींची काव्ये भाग ४ सत्कवींची काव्ये भाग ५ सत्कवींची काव्ये भाग ६ सत्कवींची काव्ये भाग ७ सत्कवींची काव्ये भाग ८ सत्कवींची काव्ये भाग ९ स्त्रीगीतांतील श्रीमहालक्ष्मी भाग १ स्त्रीगीतांतील श्रीमहालक्ष्मी भाग २ स्त्रीगीतांतील श्रीमहालक्ष्मी भाग ३ स्त्रीगीतांतील श्रीमहालक्ष्मी भाग ४ स्त्रीगीतांतील श्रीमहालक्ष्मी भाग ५ स्त्रीगीतांतील श्रीमहालक्ष्मी भाग ६ श्रीमहालक्ष्मीची पदे भाग १ श्रीमहालक्ष्मीची पदे भाग २ श्रीमहालक्ष्मीची पदे भाग ३ श्रीमहालक्ष्मीची पदे भाग ४ श्रीमहालक्ष्मीची पदे भाग ५ श्रीमहालक्ष्मीची पदे भाग ६ सत्कवींची काव्ये भाग ९ देवीभागवत महापुराणात करवीर निवासिनी महालक्ष्मीला प्रथम स्थान दिले आहे, तिरूपति बालाजीच्या दर्शनानंतर महालक्ष्मीचे दर्शन भक्त घेतातच. Tags : lakshmimahalakshmiपदमहालक्ष्मीलक्ष्मी सत्कवींची काव्ये भाग ९ Translation - भाषांतर जगज्जननि इंदिरे सुंदरे, अरुणोदय झाला ।उठि लौकरि जय माय भवानी, उदया रवि आला ॥सुंदर तें ध्यान पंचगंगातीरीं ।करवीरनगरीं नांदताहे ॥दक्षिणेसी उभी सखी महाकाली ।सरस्वती ठेली वामांगेसी ॥बैसला गणेश स्वयें अग्रभागीं ॥वसे शिरोभागीं दिव्य लिंग ॥गदा पानपात्र महाळुंग हातीं ।धरियेलें प्रीतीं खेटकादि ॥रेखिला कपाळी टिळा कुंकुमाचा ।हार मौक्तिकांचा कंठीं शोभे ॥दास म्हणे अंबा माउली जगाची ॥तारिणी भवाची देखे डोळां ॥माउलिचें मन कोमल तें. वद कठिण कसें होइल तें? ।किति धीर देउं चित्तातें? ।दे दासातें दर्शन चित्सुखदायी ॥अंबिके, पाव लवलाहीं ॥हेंचि एक माझ्या अंतरींचे आर्त ।करी वो कृतार्थ दीनासी या ॥आयकोनि कानीं माझी आर्त वाणी ।पाव गे भवानी, दास म्हणे ॥भेटीलागी तुझ्या तळमळ जीवा ।अंतरली सेवा माउलिये ॥पूर्वकर्म माझें आड आलें माये! ।दुरावले पाय आई, तुझे ॥उजळलें भाग्य भेटी आजिं झाली ।वृत्ती रंगियेली पायीं तुझ्या ॥न साहे वियोग तुझा माउली वो ।पदीं देई ठावो. दास म्हणे ॥असे कमलवासिनी, प्रबलदैत्यसंहारिणी ।स्वभक्तवरदायिनी, अखिलविश्वउद्धारिणी ॥समस्तअघनाशिनी, भगवती, यशोदायिनी ।शिवे, शरण मी मुला, वरदहस्त ठेवी झणीं ॥झणीं अभय देउनी तव पदांबुजीं ठाव दे ।त्वदीय गुणगायनीं अचल चित्त हें राहुं दे ॥शरण तुला आलो, अंबिके! शरण तुला आलो ।श्यामल सुंदर मूर्ति मनोहर पाहुनि मनिं धालो ॥ध्रु.॥कृपा करि भक्तावरि आतां ।अभयकर ठेवि झणीं माथां ॥ज्ञानरस पाजुनि मच्चित्ता ।शांत करी वो माय भवानी, काकुळती आलो ॥साक्षाद् हरिस्तु यद्भर्ता यद्गृहं कमलं शुभम् ।सौंदर्यसीमा सततं महालक्ष्मीं नमामि ताम् ॥३॥भाग्यैश्वर्यां भव्यरूपां भव्यसौख्यप्रदां शुभाम् ।दिव्यां दिव्यजनाराध्यां महालक्ष्मीं नमामि ताम् ॥६॥फिरती रवि शशि गगनीं, करि अंबुद वृष्टी ।तुझेनि आज्ञें निर्मित कमलोद्भव सृष्टी ॥महाद्वारि येऊनी पहा मग जगदंबा लोचनीं ।भेट दे गणपति कविलागुनी ॥५॥झडकरि पाव जगज्जननी ।कोलासुर मर्दुनि करवीरीं वससी सुखसदनीं ॥ध्रु.॥उजवीकडे महाकाली । वामीं सरस्वती ठेली ।गजाननमूर्ती पुढे बसली ।सकलसुरप गिरिजावल्लभ तो धरिसि शिर:स्थानीं ॥मणिकर्णिका काशि दत्त । मुक्तिमंडप बहु लखलखित ।राम अहिशयन रमाकांत ।राधाकृष्ण शनैश्वर मारुति रहाती वेष्टुनी ॥मनोरम रूप तुझें माते ।गदा-खेटक--फल-पात्रातें ।धरुनी उभी चार हातें ।बलवद्दास-मनोरथ-पुरविणि वससिं कास कसुनी ॥ N/A References : N/A Last Updated : March 15, 2014 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP