मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्रीमहालक्ष्मीची पदे| सत्कवींची काव्ये भाग ८ श्रीमहालक्ष्मीची पदे मुक्तेश्वरांच्या वाङ्मयातील श्रीमहालक्ष्मी भाग १ मुक्तेश्वरांच्या वाङ्मयातील श्रीमहालक्ष्मी भाग२ मुक्तेश्वरांच्या वाङ्मयातील श्रीमहालक्ष्मी भाग ३ मुक्तेश्वरांच्या वाङ्मयातील श्रीमहालक्ष्मी भाग ४ जोशी घराण्याची श्रीमहालक्ष्मीभक्ती भाग १ जोशी घराण्याची श्रीमहालक्ष्मीभक्ती भाग २ श्रीमहालक्ष्मीसेवा भाग १ श्रीमहालक्ष्मीसेवा भाग २ श्रीमहालक्ष्मीसेवा भाग ३ श्रीमहालक्ष्मीसेवा भाग ४ सत्कवींची पदे भाग १ सत्कवींची पदे भाग २ सत्कवींची पदे भाग ३ सत्कवींची पदे भाग ४ सत्कवींची पदे भाग ५ सत्कवींची पदे भाग ६ सत्कवींची पदे भाग ७ सत्कवींची काव्ये भाग १ सत्कवींची काव्ये भाग २ सत्कवींची काव्ये भाग ३ सत्कवींची काव्ये भाग ४ सत्कवींची काव्ये भाग ५ सत्कवींची काव्ये भाग ६ सत्कवींची काव्ये भाग ७ सत्कवींची काव्ये भाग ८ सत्कवींची काव्ये भाग ९ स्त्रीगीतांतील श्रीमहालक्ष्मी भाग १ स्त्रीगीतांतील श्रीमहालक्ष्मी भाग २ स्त्रीगीतांतील श्रीमहालक्ष्मी भाग ३ स्त्रीगीतांतील श्रीमहालक्ष्मी भाग ४ स्त्रीगीतांतील श्रीमहालक्ष्मी भाग ५ स्त्रीगीतांतील श्रीमहालक्ष्मी भाग ६ श्रीमहालक्ष्मीची पदे भाग १ श्रीमहालक्ष्मीची पदे भाग २ श्रीमहालक्ष्मीची पदे भाग ३ श्रीमहालक्ष्मीची पदे भाग ४ श्रीमहालक्ष्मीची पदे भाग ५ श्रीमहालक्ष्मीची पदे भाग ६ सत्कवींची काव्ये भाग ८ देवीभागवत महापुराणात करवीर निवासिनी महालक्ष्मीला प्रथम स्थान दिले आहे, तिरूपति बालाजीच्या दर्शनानंतर महालक्ष्मीचे दर्शन भक्त घेतातच. Tags : lakshmimahalakshmiपदमहालक्ष्मीलक्ष्मी सत्कवींची काव्ये भाग ८ Translation - भाषांतर उठि उठि वो माय भवानी । अंबे, कोल्हासुरमर्दिनी ।अंबे, कोल्हासुरमर्दिनी ।जय जय परब्रह्मरूपिणी । सुखदायिनी भक्तांची ॥ध्रु.॥झाला उष:काल सुंदर । गाती भक्त तुजे सुस्वर ।होतो स्नानासी उशीर । उठी सत्वर माउलिये ॥१॥द्वारीं चौघडे गर्जती । नाना वाजंत्रीं वाजती ।नाना वाजंत्री वाजती ।सनया सुस्वर आलापिती । तुज संप्रती सुखवाया ॥भाविक नारी नर पातले । द्वारीं उभे सुचिर ठाकले ।द्वारीं उभे सुचिर ठाकले ।दर्शना उत्सुक मनिं जाहले । उघडी डोळे माय गे ॥३॥अवघे अर्चकजन पातले । पूजासाहित्यहि आणिले ।पूजासाहित्यहि आणिले ।सांडी निद्रासुख चित्कले । दीनदयाळे अंबिके ॥४॥देउनि दर्शन सकलां निकें । करि वो पावन जगदंबिके ।करि वो पावन जगदंबिके ।भक्ताभीप्सितवरदायिके । भवतारिके भयभंगे ॥५॥पायीं लीन तुझ्या होउनी । आलो शरण तुज स्वामिनी ।आलो शरण तुज स्वामिनी ।पुरवी दासावी विनवणी । देउनि चरणीं ठाव गे ॥६॥उठि आदिमाते, देई दर्शन भक्तांतें ।देई दर्शन दासांतें ।झाला अरुणोदय, आतां सांडी निद्रेतें ॥ध्रु.॥बद्धांजुलि हा दास विनवितो । विनती परिसावी ।अंबिके, विनती परिसावी ।देउनि दर्शन दीनदयाळे आळी पुरवावी ॥५॥उठि जगदंबिके, भक्तजन पालिके ।दुरितपरिहारिके सिंधुकन्ये ॥ध्रु.॥उठि नारायणी, भक्तवरदायिनी ।असुरसंहारिणी ऊठि ऊठि ॥१॥घंटिकेचा तुझ्या कानिं येता ध्वनी ।धाव घेती झणीं भक्त तूझे ॥२॥ द्वाररक्षक तुझे तिष्ठती स्वामिनी ।द्वारिची उजळुनी दीपमाला ॥रुणझुणतीं नूपुरें देवि, तव चरणिंचीं ।कुंडलें श्रवणिची डुल्लतातीं ॥सोनियाचा शिरीं मुकुट शोभे वरी ।दिव्यमणी तदुपरी पुष्पमाला ॥पानपात्रचि, महाळुंग, खेटक, गदा । मूर्ति तव सायुधा दिव्य साजे ॥ध्यान हें साजिरें, रूप तव गोजिरें ।देहभानचि नुरे देखतांचि ॥ N/A References : N/A Last Updated : March 15, 2014 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP