मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्रीमहालक्ष्मीची पदे| सत्कवींची पदे भाग ४ श्रीमहालक्ष्मीची पदे मुक्तेश्वरांच्या वाङ्मयातील श्रीमहालक्ष्मी भाग १ मुक्तेश्वरांच्या वाङ्मयातील श्रीमहालक्ष्मी भाग२ मुक्तेश्वरांच्या वाङ्मयातील श्रीमहालक्ष्मी भाग ३ मुक्तेश्वरांच्या वाङ्मयातील श्रीमहालक्ष्मी भाग ४ जोशी घराण्याची श्रीमहालक्ष्मीभक्ती भाग १ जोशी घराण्याची श्रीमहालक्ष्मीभक्ती भाग २ श्रीमहालक्ष्मीसेवा भाग १ श्रीमहालक्ष्मीसेवा भाग २ श्रीमहालक्ष्मीसेवा भाग ३ श्रीमहालक्ष्मीसेवा भाग ४ सत्कवींची पदे भाग १ सत्कवींची पदे भाग २ सत्कवींची पदे भाग ३ सत्कवींची पदे भाग ४ सत्कवींची पदे भाग ५ सत्कवींची पदे भाग ६ सत्कवींची पदे भाग ७ सत्कवींची काव्ये भाग १ सत्कवींची काव्ये भाग २ सत्कवींची काव्ये भाग ३ सत्कवींची काव्ये भाग ४ सत्कवींची काव्ये भाग ५ सत्कवींची काव्ये भाग ६ सत्कवींची काव्ये भाग ७ सत्कवींची काव्ये भाग ८ सत्कवींची काव्ये भाग ९ स्त्रीगीतांतील श्रीमहालक्ष्मी भाग १ स्त्रीगीतांतील श्रीमहालक्ष्मी भाग २ स्त्रीगीतांतील श्रीमहालक्ष्मी भाग ३ स्त्रीगीतांतील श्रीमहालक्ष्मी भाग ४ स्त्रीगीतांतील श्रीमहालक्ष्मी भाग ५ स्त्रीगीतांतील श्रीमहालक्ष्मी भाग ६ श्रीमहालक्ष्मीची पदे भाग १ श्रीमहालक्ष्मीची पदे भाग २ श्रीमहालक्ष्मीची पदे भाग ३ श्रीमहालक्ष्मीची पदे भाग ४ श्रीमहालक्ष्मीची पदे भाग ५ श्रीमहालक्ष्मीची पदे भाग ६ सत्कवींची पदे भाग ४ देवीभागवत महापुराणात करवीर निवासिनी महालक्ष्मीला प्रथम स्थान दिले आहे, तिरूपति बालाजीच्या दर्शनानंतर महालक्ष्मीचे दर्शन भक्त घेतातच. Tags : lakshmimahalakshmiपदमहालक्ष्मीलक्ष्मी सत्कवींची पदे भाग ४ Translation - भाषांतर हे जगदंबे, विश्वकदंबे, तूं निरलंबे, तूं शिवसांबे ।मज अविलंबें, धाव पाव निर्वाणीं ॥निरीक्षले म्यां बहु देव, माये । ते वंदिती सर्व तुझेचि पाये ॥सत्कीर्ति तूझी भुवनांत गाजे । विष्णुप्रिये सुंदरि लोकपूज्ये ॥श्रीकरवीरनिवासिनि! देवि महालक्ष्मि! तूंचि सर्वाद्या ।तव चरण म्हणति, ‘सुरतरुचिंतामणि हो! निरोप गर्वा द्या ॥१॥भगवति, जगदुत्पत्तिस्थितिसंह्रतिहेतु तूं महालक्ष्मी ।त्वत्पदनखमणिरुचिनें चलन सुरांच्या न राहिलें पक्ष्मी ॥२॥आद्यसति महालक्ष्मि! त्वत्पुण्यक्षेत्रराज करवीर ।परिभवुनि बळें दुर्विधि, कळी यांकरवी सदैव करवी र ॥३॥जी दुर्लिपि भाळींची तव चरणरजेंचि होय सल्लिपि ती ।या तव यशोमृतातें जगदीश्वरि, सुरभि कल्पवल्लि पिती ॥४॥विधि-हरि-हर तुज भजती भक्तांतें फार गौरवीतीस ।देवि महालक्ष्मि! यश क्षीरधिकर्पूरगौर वीतीस ॥५॥‘हा हा’ अशा करि, धरुनि बहु धाक, रवी रवासि निजनमना ।चुकतां, जपतां, सुखविसि बहुधा करवीरवासिनि! जनमना ॥६॥अघ सारिसि, भय वारिसि, नत तारिसि, तूंचि जननि जगदाद्या ।जे नेणति वैद्यांतें, म्हणति, ‘अगद’ तेचि जन ‘निजगदा द्या’ ॥७॥भक्त महालक्ष्मि! तुझा सुपदीं पोषूनि धर्म-नय नांदे ।विष्णु तसा देवांच्या देवींच्या विपुल शर्म नयनां दे ॥८॥कोण तुज महालक्ष्मि! स्तविना! कवि नारदादि यश गाती ।ब्रह्मसभा, विष्णुसभा, शंभुसभा, त्वत्सुभक्तियशगा ती ॥९॥ N/A References : N/A Last Updated : March 15, 2014 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP