मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्रीमहालक्ष्मीची पदे| सत्कवींची काव्ये भाग ६ श्रीमहालक्ष्मीची पदे मुक्तेश्वरांच्या वाङ्मयातील श्रीमहालक्ष्मी भाग १ मुक्तेश्वरांच्या वाङ्मयातील श्रीमहालक्ष्मी भाग२ मुक्तेश्वरांच्या वाङ्मयातील श्रीमहालक्ष्मी भाग ३ मुक्तेश्वरांच्या वाङ्मयातील श्रीमहालक्ष्मी भाग ४ जोशी घराण्याची श्रीमहालक्ष्मीभक्ती भाग १ जोशी घराण्याची श्रीमहालक्ष्मीभक्ती भाग २ श्रीमहालक्ष्मीसेवा भाग १ श्रीमहालक्ष्मीसेवा भाग २ श्रीमहालक्ष्मीसेवा भाग ३ श्रीमहालक्ष्मीसेवा भाग ४ सत्कवींची पदे भाग १ सत्कवींची पदे भाग २ सत्कवींची पदे भाग ३ सत्कवींची पदे भाग ४ सत्कवींची पदे भाग ५ सत्कवींची पदे भाग ६ सत्कवींची पदे भाग ७ सत्कवींची काव्ये भाग १ सत्कवींची काव्ये भाग २ सत्कवींची काव्ये भाग ३ सत्कवींची काव्ये भाग ४ सत्कवींची काव्ये भाग ५ सत्कवींची काव्ये भाग ६ सत्कवींची काव्ये भाग ७ सत्कवींची काव्ये भाग ८ सत्कवींची काव्ये भाग ९ स्त्रीगीतांतील श्रीमहालक्ष्मी भाग १ स्त्रीगीतांतील श्रीमहालक्ष्मी भाग २ स्त्रीगीतांतील श्रीमहालक्ष्मी भाग ३ स्त्रीगीतांतील श्रीमहालक्ष्मी भाग ४ स्त्रीगीतांतील श्रीमहालक्ष्मी भाग ५ स्त्रीगीतांतील श्रीमहालक्ष्मी भाग ६ श्रीमहालक्ष्मीची पदे भाग १ श्रीमहालक्ष्मीची पदे भाग २ श्रीमहालक्ष्मीची पदे भाग ३ श्रीमहालक्ष्मीची पदे भाग ४ श्रीमहालक्ष्मीची पदे भाग ५ श्रीमहालक्ष्मीची पदे भाग ६ सत्कवींची काव्ये भाग ६ देवीभागवत महापुराणात करवीर निवासिनी महालक्ष्मीला प्रथम स्थान दिले आहे, तिरूपति बालाजीच्या दर्शनानंतर महालक्ष्मीचे दर्शन भक्त घेतातच. Tags : lakshmimahalakshmiपदमहालक्ष्मीलक्ष्मी सत्कवींची काव्ये भाग ६ Translation - भाषांतर जय देवी विष्णुकांते, महालक्ष्मी ग माते ।आरती ओवाळीन तुज विज्ञानसरिते ॥ध्रु.॥मर्दिला कोल्हासुर, ख्याती केली कीं थोर ।श्रीलक्ष्मी नाम तुझें, दैत्य कापती फार ॥१॥धन्य तें कोलापुर. धन्य तेथींचे नर ।सकळही मुक्त होती तुजला पाहतां सत्वर ॥२॥रहिवास कोलापुरीं पंचगंगेच्या तीरीं ।सुविशाल सिंहासन, विराजसी तयावरी ॥३॥मागणें हेंचि माये, आतां दाखवी पाय ।उशीर नको लावूं, दास तुझा वाट पाहे ॥४॥सुखसदने, शशिवदने, अंबे, मृगनयने ।गजगमने, सुरनमने, कोल्हासुरमथने ॥सुरवर वर्षति सुमनें करुनीया नमनें ।भयहरणे, सुखकरणे, सुंदरि शिवरमणे ॥१॥जय देवी जय देवी जय वो जय अंबे ।कोल्हापुरस्वामिणी, तुज वो जगदंबे ॥ध्रु.॥मृगमदमिश्रित केशर शोभे कपाळीं ।कुंचित केश विराजित मुगुटांतुन भाळीं ॥रत्नजडित सुंदर अंगीं कांचोळी ।चिद्गगनाचा गाभा अंबा वेल्हाळी ॥२॥कंठीं विलसित सगुण मुक्ताविशेषें ।पीत पितांबर सुंदर कासियला कासे ॥कटितटिं कांचीकिंकिणि ध्वनी मंजुळ भासे ।पदकमळलावण्यें अंबा शोभतसे ॥३॥झळ झळ झळ झळ झळकतिं तानवडें कर्णीं ।तेजा लोपुनि गेले रवि-शशि निजकिरणीं ॥ब्रह्मा-हरि-हर सकळिक नेणति तव करणी ।अदभुत लीला लिहितां, न पुरे हो धणी ॥४॥अष्टहि भूजा सुंदर, शोभतसे शोभा ।झग झग झग झगझगीत लावण्यगाभा ॥म्हग म्हग म्हग म्हगम्हगीर सुमनांची शोभा ।त्र्यंबक मधुकर होउनि वर्णितसे अंबा ॥५॥ N/A References : N/A Last Updated : March 15, 2014 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP