गौरीची गाणी - एरंड
वारली गीते आजी आजोबांकडून मुलांना नातवंडांना आणि अशा प्रकारे पिढी दरपिढी चालत आलेली असतात.
एरंड
असा एरंड माजला
वईचे उच्च गेला गं
असा पाटलाचे पोरा
तू धमकावसी कोन्हाला रं
असा धरीन हिप्पीला
न् फ़िरवीन गरगरा रं
असा पाटलाचे पोरा
तू धमकावसी कोन्हाला रं
असा धरीन सेंडीला
न् फ़िरवीन गरगरा रं
असा पाटलाचे पोरा
तू धमकावसी कोन्हाला रं
असा धरीन मानंला
न् फ़िरवीन गरगरा रं
(वई-कुंपण, हिप्पी-मानेवर लांब वाढलेले केस, सेंडी-शेंडी)
एरंड
अस्सा एरंड माजला
कुंपणाहून उंच झाला ग
...तशा पाटलाच्या पोरा
तू धमकावतोस कोणला रे
अस्सा धरील हिप्पीला
न् फ़िरवीन गरगरा रे
...तशा पाटलाच्या पोरा
तू धमकावतोस कोणला रे
अस्सा धरील शेंडीला
न् फ़िरवीन गरगरा रे
...तशा पाटलाच्या पोरा
तू धमकावतोस कोणला रे
अस्सा धरील मानेला
न् फ़िरवीन गरगरा रे
N/A
References : N/A
Last Updated : February 12, 2013

TOP