मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|लोकगीते|वारली लोकगीते|गौरीची गाणी|
चंद्र हासला ग

गौरीची गाणी - चंद्र हासला ग

वारली गीते आजी आजोबांकडून मुलांना नातवंडांना आणि अशा प्रकारे पिढी दरपिढी चालत आलेली असतात.


चंद्र हासला ग
अशी नदीकिनारी ग कालीमोरी गायी ग
तिच्या संगती संगती पाराबती बाई ग
पाराबती बाई बसली आंघोलीला ग
तिनी अंगाचा मल असा काढीला ग
तिनी मलाचा गणपती बनवीला ग
गणपतीचा घोडा उंदीर बनला ग
तेही घोड्याचा पायसा मोडीला ग
गाणपती देव असा खालीसा पडीला ग
असा वरूनी चंद्र गदगदा हसला ग

चंद्र हासला ग
अशा नदीकिनारी ग, काळ्या ठिपक्यांची गाय ग
तिच्या सोबत चालत आली पार्वती बाय ग
पार्वती बाई बसली आंघोळीला ग
तिने अंगाचा मळ असा काढला ग
तिने मलाचा गनपती बनवला ग
गणपतीचे वाहन उंदीर बनला ग
त्या उंदराचा पाय मोडला ग
गणपती देव खाली पडला ग
पाहून वरून चंद्र खदखदून हसला ग

N/A

References : N/A
Last Updated : February 12, 2013

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP