मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|लोकगीते|वारली लोकगीते|गौरीची गाणी|
आरळीची काडी

गौरीची गाणी - आरळीची काडी

वारली गीते आजी आजोबांकडून मुलांना नातवंडांना आणि अशा प्रकारे पिढी दरपिढी चालत आलेली असतात.


आरळीची काडी
आरळीची काडी वाढली डीगाडीगा
वाढली डीगाडीगा मोडीला हिचा टिगा

-आरं माझे बापा मला कसां काय रं देशी?
-देईन लेकी तुला शंभर पुतळ्यालं!
-आरं माझे बापा काय करू त्या पुतळ्यालं?
(आरळी-एक झाड, पुतळ्यांचा हार-सोन्याचा गोल चकत्या जोडून केलेला अलंकार)

आरळीची काडी
आरळीची काडी वाढली तडातडा
वाढली तडातडा तसा मोडीला हिचा शेंडा

-अरे माझ्या बापा मला अशा घरी कसा देतोस?
-देतो आहे मुली तुला शंभर पुतळ्या घेऊन!
-अरे माझ्या बापा काय उपयोग त्या पुतळ्यांचा?

N/A

References : N/A
Last Updated : February 12, 2013

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP