मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|संकेत कोश|
संख्या २२

संकेत कोश - संख्या २२

हिंदू धर्मात असे अनेक संकेत आहेत ,जे आपल्या जीवनात मोलाचे कार्य बजावतात .


बावीस अक्षरी मंत्र - " श्रीकृष्णा गोविंद हरे मुरारे । हे नाथ नारायण वासुदेव ॥ "

बीवीस प्रेरणा इंद्रियांच्या - अठरा प्रत्याहार प्रेरणा ( वायुचाअ निरोध करून शरीरांतील मर्मस्थानांचे ठिकाणीं खिळून ठेवणें ) १९ ध्यान , २० धारण , २१ समाधि या तीन व २२ शुद्ध सत्त्वमय भाव , हीं मिळून बावीस होत . ( म . भा . शांति अ ३०६ )

बीवीस मनोधर्म - १ संकल्प , २ वासना , ३ इच्छा , ४ स्मृति , ५ धृति , ६ श्रद्धा , ७ उत्साह , ८ कारुण्य , ९ कळकळ , १० प्रेम , ११ दया , १२ कृतज्ञता , १३ काम , १४ लज्जा , १५ आनंद , १६ भीति , १७ राग , १८ द्वेष , १९ लोभ , २० मद , २१ सत्सर व २२ क्रोध , ( देहसार्थकता )

बीवीस श्रुति ( गायनोपयोगी नाद )- १ गायनोपयोगी नादास श्रुति हा पारिभाषिक शब्द शास्त्रकारांनीं योजिला आहे . नाद हा गायनाचा आत्मा आहे . असे नाद अथवा श्रुति बावीस आहेत . त्या - १ तीब्रा , २ कुमुद्वती , ३ मंदा , ४ छंदोवती , ५ दयावती , ६ रंजनी , ७ रतिका , ८ रौद्री , ९ क्रोधी , १० वज्रिका , ११ प्रस्तरिणी , १२ प्रीति , १३ मार्जिनी , १४ क्षिति , १५ रक्ता , १६ संदीपनी , १७ आलापिनी , १८ मदन्ती , १९ रोहिणी , २० रम्या , २१ उग्रा आणि २२ क्षेभिणी . ( नारदप्रणीत )

N/A

References : N/A
Last Updated : April 20, 2015

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP