मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|संकेत कोश|
संख्या ८

संकेत कोश - संख्या ८

हिंदू धर्मात असे अनेक संकेत आहेत ,जे आपल्या जीवनात मोलाचे कार्य बजावतात .


अष्टदुर्ग - १ गिरिदुर्ग , २ वनदुर्ग - निबिडअरण्य , ३ गव्हरदुर्ग , ४ गुहा , ५ जलदुर्ग , ६ ग्रामदुर्ग , ७ कर्दमदुर्ग - दलदल व ८ सभोंवती तटबंदी . असे संरक्षणाचे आठ प्रकार प्राचीनकालीं होते . " सप्तमं ग्राहदुर्गं स्थात् ‌‍ कोष्ठदुर्गं तथाष्टकम्‌६ " ( दैवज्ञविलास )

अष्ट द्वारपाल चंडिकेचे - १ वेताळ , २ कोटर , ३ पिंगाक्ष , ४ भुकुटी , ५ धुम्रक , ६ कंकट , ७ राकक्ष व ८ सुलोकन . ( Vastushastra VOL II )

अष्टद्वारपाल ( श्रीविष्णूचे )- ( अ ) १ चंड , २ पार्षदचंड , ३ मद्र , ४ सुमद्र ५ जय , ६ विजय , ७ धाता व ८ विधाता ( दु . श . को . ) ( आ ) १

जय , २ विजय , ३ प्रचंड , ४ चंड , ५ नंद , ६ सुनंद , ७ कुमुद आणि ८ कुमुदांक्ष .

नंदाः सुनंदः कुमुदः कुमुदाक्षस्तथैव च ।

अष्टौ हि द्वारपालाश्च कालाद्या अपि पार्षदाः ॥ ( गुरुड ब्रह्मकांड १७ - २ )

अष्ट द्वारपाल ( श्रीशिवाचे )- ( अ ) १ नंदी , २ भृंगी , ३ रिटी , ४ स्कंद , ५ गणेश , ६ उमामहेश्वर , ७ वृषम आणि ८ महाकाल . ( बृ . ना . पूर्व ६६ - ८३ ) ( आ ) १ नंदी , २ महाकाल , ३ हेरंब , ४ मृंगी , ५ दुर्मुख ६ पांडुर , ७ सित आणि ८ असित . ( Vastushatra. VOL II )

अष्ट दिक्पाल - आठ दिशा पालन करणार्‍या देवता , १ पूर्वेस - इंद्र , २ आग्नेयीचा - अग्नि , ३ दक्षिणेचा - यम , ४ नैऋत्येचा - निऋति , ५ पश्चिमेचा - वरुण , ६ वायव्येचा - मरुत् ‌‍ , ७ उत्तरेचा - कुबेर आणि ८ ईशान्येचा - ईश . हे अष्ट दिक्पाल होत . ( अमरकोश )

अष्ट दिग्गज - १ ऐरावत , २ पुंडरीक , ३ वामन , ४ कुमुद , ५ अंजन , ६ पुष्पदंत , ७ सार्वमौम आणि ८ सुप्रतीक , असे आठ दिशांस ज्यांच्या आधारावर हें सर्व ब्रह्मांड स्थिर होऊन राहिलें आहे . असे आठ हत्ती आहेत . ( बृहन्नारदीय़ )

अष्ट देवयोनि - ( अ ) १ ब्रह्मा , २ प्रजापति , ३ देव , ४ गंधर्व , ५ यक्ष , ६ राक्षम , ७ पितर आणि ८ पिशाच ; ( आ ) १ किन्नर , २ चारण , ३ यक्ष , ४ विद्याधर , ५ गंधर्व , ६ सिद्ध , ७ योगी आणि ८ मुनि . ( तुलसी शब्दप्रकाश ). ( इ ) १ अप्सरा , २ गंधर्व , ३ यक्ष , ४ राक्षस , ५ किन्नर , ६ पिशाच , ७ गुह्मक आणि ८ सिद्ध .

विद्याधरोप्सरा यक्षःअ रक्षो गंधर्वकिन्नराः ।

पिशाचो गुह्यकः सिद्धो भूतोऽमी देवयोनयः ॥ ( अमरकोश )

अष्टदेह - १ स्थूल , २ सूक्ष्म , ३ कारण , ४ महाकारण , ५ विराट , ६ हिरण्यगर्म , ७ अव्याकृत व ८ मूलप्रकृति . ( दा . बो . १७ - ८ ).

अष्ट दैवप्रकार व त्यांचे अधिपती ग्रह - १ स्वकर्म - शनि , २ कुलकर्म - राहु , ३ मातृकर्म - चंद्र , ४ पितृकर्म - रवि , ५ संततिकर्म - गुरु , ६ पत्नीसुख - शुक्र ७ बाह्य दैव - बुध व ८ गृहदैव - मंगल . ( दैवयोगविचार )

अष्ट दोष जैन धर्म - शंका , २ कांक्षा , ३ विचिकित्सा , ४ मूढ द्दंष्टि , ५ अनुपगूहन , ६ अवात्सल्य , ७ अस्मितिकरण आणि ८ अप्रभावना ,

अष्टद्रव्यें - १ अश्चत्थ , २ उदुंबर , ३ प्लक्ष , ४ न्यग्रोध , ५ समिध ‌‍ , ६ तिल , ७ पायस व ८ आज्य - हीं यज्ञीय अष्ट द्र्व्यें मानलीं आहेत .

( संस्कृति कोश )

अष्टधातु - १ सोनें , २ रुपें , ३ तांबें , ४ कथील , ५ शिसें , ६ पितळ , ७ लोखंड आणि ८ तिखें पोलाद किंवा पारा .

अष्ट धामें श्रीविष्णूचीं स्थानें - १ त्रिजुगी नारायण - हिमालय , २ मुक्तिनाथ - नेपाळ , ३ बद्रीनाथ , ४ जगन्नाथपुरी , ५ रंगनाथ - श्रीरंगम ‌‍ , ६ गया , ७ पंढरपूर आणि * तिरुपती ,

अष्टधा प्रकृति - १ प्रकृति , २ मह्त्तत्त्व , ३ अहंकार , ४ शब्द , स्पर्श , ६ रूप , ७ रस आणि ८ गंध . या अष्टधा प्रकृतीपासून व्रह्मांडकोश उत्पन्न झाला . ( भागवत , स्कंध , ३ अ . ११ तळटीप ) ( आ ) १ पृथ्वी , २ आप , ३ तेज , ४ वायु , ५ आकाश , ६ मन , ७ बुद्धि व ८ अहंकार . शरीर हें या आठ तत्त्वांचे बनलेलें आहे . ( भ . गी . ७ - ४ )

आप तेज गगन । महीं मारुत मन ॥

बुद्धि अहंकार हे भिन्न । आठै भाग ॥ ( ज्ञा . ७ - १८ )

अष्ट नाग - १ अनंत , २ वासुकि , ३ तक्षक , ४ कर्कोटक , ५ शंख , ६ कुलिक , ७ पद्म आणि ८ महापद्म , अशीं नागजातीचीं आठ कुलें .

अष्टनायिक ( अ ) ( श्रीकृष्ण स्त्रिया )- १ रुक्मिणी , २ सत्यभामा , ३ जांबवंती , ४ कालिंदी , ५ मित्रविंदा , ६ याज्ञजिती , ७ मद्राअ आणि ८ लक्ष्मणा ; ( आ ) साहित्यांतील - १ वासकसज्जा , २ विरहोत्कंठिता , ३ स्वाधीनभर्तृका , ४ कलहांतरिता , ५ खंडिता , ६ विप्रलब्धा , ७

प्रोषितभर्तृका आणि ८ अभिसारिका ; ( इ ) १ गुप्ताअ , २ विदग्धा , ३ लक्षिता , ४ कुलटा , ५ अनुसमना , ६ मुदिता , ७ कन्यका आणि ८ मानन्या ; ( ई ) १ स्वीया , २ परकीया , ३ वेश्या , ४ मुग्धा , ५ प्रौढा , ६ मध्या , ७ मानववती व ८ धीरा , ( शृंगारनायिका )

नायिकांचे एकंदर ११५२ प्रकार भानुभट्ट्कृत रसमंजिरींत बर्णिलेले असून त्यांतील या प्रमुख आठ प्रकारच्या नायिका होत .

( नाटयशास्त्र ) तथा अभिसारिका चैव इत्यष्टौ नायिकाः स्मृताः ॥ ( भ . ना . २२ - २०४ )

अष्ट निधि - १ पद्म , २ महापद्म , ३ मकरनिधि , ४ कच्छपनिधि , ६ मुकुंदनिधि , ६ नंदनिधि , ७ नीलनिधि व ८ शंखनिधि , हे आठ निधि म्हणजे मानवाच्या संपत्तींच्या देवता . या आठहि निधींची अधिकारी देवता लक्ष्मी आहे . ( मार्कंडेय पु . ६८ )

अष्ट नृत्यांगना देवलोकींच्या - १ घृताची , २ तिलोत्तमा , ३ ऊर्वशी , ४ रंभा , ५ मेनका , ६ सुकेशी , ७ मंजुघोषा आणि ८ पूर्वचिति .

" अष्टनायिका नृत्य करिती " ( शिवलीलामृत , अ ३ )

अष्ट पल्लवी भाषा - १ अकंपल्लवी , २ करपल्लवी , ३ नेत्रपल्लवी , ४ शब्दपल्लवी , ५ वाजिंत्रपल्लवी , ६ चातुर्यपल्लवी , ७ भाषापल्लवी आणि ८ ओष्ठपल्लवी ,

अष्ट पाश - ( अ ) १ घृणा ( किळस ), २ शंकर , ३ भय , ४ लज्जा , ५ जुगुप्सा ( निंदा ), ६ कुल , ७ शील आणि ८ जाती .

घृणा शङ्का भयं लज्जा जुगुप्सा चेति पञ्चमी ।

कुलं शीलं च मानं च अष्टौ पाशाः प्रकीर्तिताः ॥ ( सु . )

( आ ) १ आशा , २ भय , ३ लज्जा , ४ भीति , ५ जुगुप्सा , ६ काम , ७ क्रोध आणि ८ अतिलोभ . ( वेदान्तसूर्य ).

पाशबद्धो भवेज्जीवः पाशमुक्तः सदाशिवः ।

या पाशांनीं बद्ध असतो तो जीव आणि त्यांच्यापासूऊन मुक्त असतो तो सदाशिव होय . ( स्कंस्कृति - कोश )

अष्टपुत्रा सौभाग्यवती भव - विवाहित सौभाग्यसंपन्न स्त्रीस आशीर्वाद देण्याविषयींचा संकेत . स्त्रीस किमान आठ पुत्र व्हावेत अशी वैदिक ऋषींचि मागणी असे . अष्टपुत्रा भवत्यं च सुभगा च पतिव्रता । ( ऋग्वेद आठवें अष्टक )

अष्ट पुष्पें ( पूजेचीं )- १ अहिंसा , २ इंद्रियसंयम , ३ भूतदया , ४ क्षमा , ५ शम , ६ दम , ७ ध्यान , ८ सत्य , या आठ पुष्पांनीं केलेली पूजा भगवंताला प्रिय आहे .

अष्ट प्रकार ( गणिताचे )- १ संकलन - मिळवणी , २ वेवकलन - वजाबाकी , ३ गुणन - गुणाकार , ४ भाजन - भागाकार , ५ वर्ग , ६ वर्गमूळ , ७ घन व ८ घनमूळ . असे गणिताचे आठ प्रकार आहेत . त्यास गणिताचें परिकर्माष्टक म्हणतात .

अष्ट प्रतिमा - १ शिला . २ मृत्तिका , ३ धातु , ४ रत्न , ५ काष्ठ , ६ वालुका , ७ चित्रलेखन आणि ८ मनोमय . अशा आठ प्रकारांनीं प्रतिमापूजन करतां येतें . ( देवीमाहात्म्य )

अष्ट प्रधान ( शिवनिर्मित )- ( अ ) १ पंतप्रधान , २ पंत अमात्य , ३ पंतसचिव , ४ मंत्री , ५ सुमंत , ६ सेनापति , ७ न्यायाधीश आणि ८ पंडितराव , ( आ ) १ सुमंत्र - आयव्यय प्रविज्ञाता , २ पंडित - धर्मतत्त्ववित् ‌‍ , ३ मंत्री - नीतिकुशल , ४ प्रधान - सर्वदशीं , ५ सचिव - सेनावित् ‌ , ६ अमात्य , ७ प्राड् ‌‍- विवाक - लोकशासनतज्ज आणि ८ प्रतिनिधि - कार्याकार्य प्रविज्ञाता , ( शुक्रनीति )

अष्ट भाव ( आध्यात्मिक )- १ धर्म , २ ज्ञान , ३ वैराग्य , ४ ऐश्चर्य , ५ अधर्म , ६ अज्ञान , ७ अवैराग्य ( आसक्ति ) आणि ८ अनैश्चर्य .

( शांकरभाष्य )

अष्ट भूतगण - १ शाकिनी , २ यातुधान , ३ वेताळ , ४ ब्रह्मराक्षस , ५ भूत , ६ प्रेत , ७ पिशाच व ८ प्रमथ ( शिव , पु . अ . ४० )

अष्ट भैरव - भैर्व म्हणजे भयंकर , शिवाचें एक नांव आहे . ( अ ) असितांग . २ संहार , ३ रुरू भैरव , ४ काल , ५ क्रोध , ६ ताम्रचूड , चंद्रचूड आणि ८ महाभैरव . हीं शिवगणांतील देवतेचीं आठ स्वरूपें होत ; ( आ ) १ असितांग , २ रुरु , ३ चुणुभैरव , ४ क्रोध , ५ उन्मत्त भैरव , ६ कपाल भैरव , ७ भीषन आणि ८ संहार भैरव . ( ब्रह्मवैवर्त ) ( इ ) १ शंभुदेव , २ महादेव , ३ त्रिकाळी , ४ विष्णु , ५ काळींद्रि , ६ मणिवर्धन , ७ सुनाम व ८ आलेख ( सि . बो . अ . १९ )

अष्ट भोग - ( अ ) १ सुंगध , २ स्त्री , ३ वस्त्र , ४ गायन , ५ तांबूल , ६ भोजन , ७ शय्या आणि ८ पुष्पें .

सुगंधं वनिता वस्त्रं गीतं तांबूलभोअजनम् ‌‍ ।

शय्या च कुसुमं चैव भोगाष्टकमुदह्रतम् ‌ ॥ ( कायस्थप्रदीप ) ( आ ) १ अन्न , २ उदक , ३ तांबूल , ४ पुष्प , ५ चंदन , ६ वसन , ७ शय्या आणि ८ अलंकार , ( मुक्तेश्वर . सभा . ३ - ११२ )

अष्ट मद ( जैनधर्म )- ( अ ) १ ज्ञानमद , २ पूजामद , ३ शरीरमद , ४ कुलमद , ५ जातिमद , ६ तपोमद , ७ धनमद , आणि ८ बलमद ;

( आ ) १ कुंल , २ दुष्टपणा , ३ धन , ४ रूप , ५ यौवन , ६ विद्या , ७ अधिकार आणि ८ तपस्या .

कुलं छलं धनं चैव रूपं यौवनमेव च ।

विद्या राज्यं तपश्चैव एते चाष्टमदाःअ स्मृताः ॥ ( कर्णहंस ) ( इ ) १ धनमद , २ पुत्रमद , ३ राज्यमद , ४ यौवनमद , ५ स्त्रीमद , ६ विद्यामद , ७ स्थानमद आणि ८ पानमद ; ( ई ) १ देहमद , २ यौवनमद , ३ स्त्रीमद , ४ धनमद हे चार प्रापंचिकद्दया आणि ५ विद्यामद , ६ तपमद , ७ सिद्धिमद आणि ८ ज्ञानमद हे चार पारचार्थिकद्दष्टथा असे आठ मद होत . ( निर्पक्षसत्यज्ञानदर्शन )

अष्ट मधु - १ माक्षिक , २ भ्रामर , ३ रौद्र , ४ पौतिक , ५ छात्र , ६ आर्घ्य , ७ औद्दालक आणि ८ दाल . अशा मधाच्या आठ जाति आहेत . त्यांत माक्षिक मधु श्रेष्ठ मानिली जाते .

पित्तिकं भ्रामरं क्षौद्रं माक्षिकं छात्रमेव च ।

आर्ध्यं औद्दालकं दालंज इत्यष्टौ मधुजातयः ॥ ( सुक्षुत )

अष्टमुद्रा ( तंत्रशास्त्र )- १ पद्म , २ शंख , ३ श्रीवत्स , ४ गदा , ५ गुरुड , ६ चक्र , ७ खड्‌‌ग - व ८ शाङ्‌‍र्ग ( ब्रह्म . ६१ - ५५ )

अष्ट मंगल - ( अ ) १ ब्राह्मण , २ अग्नि , ३ गाय , ४ सुवर्ण , ५ घृत , ६ सूर्य , ७ जल आणि ८ राजा . या आठ गोष्टी मंगलप्रद होत ; ( आ )

१ सिंह , २ वृषभ , ३ गज , ४ पूर्णोदक कुभ , ५ व्यजन , ६ निशाण , ७ वाद्य आणि ८ दीप .

मृगराजो बृषो नागः कलशो व्यजनं तथा ।

वैजयंती तथा भेरी दीप इत्यष्टमंगलम् ‌‍ ॥ ( सु . )

N/A

References : N/A
Last Updated : April 20, 2015

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP