मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|संकेत कोश|
संख्या ७

संकेत कोश - संख्या ७

हिंदू धर्मात असे अनेक संकेत आहेत ,जे आपल्या जीवनात मोलाचे कार्य बजावतात .


सप्तविध स्वप्रें - १ द्दष्ट - पाहिलेल्या गोष्टी स्वप्रांत दिसणें , २ श्रुत - ऐकलेल्या दिसणें , ३ अनुभूत - मनानें अनुभविलेल्या , ४ प्रार्थित - इच्छिलेल्या , ५ संकल्पित , ६ भाविक - पुढील गोष्टी सुचविणारीं आणि ७ दोषज - वात , पित्त , कफ इत्यादि दोषांमुळें पडणारीं .

द्दष्टं श्रुतानुभूतं च प्रार्थितं कल्पितं तथा।

भाविकं दोषजं चैव स्वप्नं सप्तविधं विदुः ॥ ( अष्टांगसंग्रह )

सप्तशती - ( अ ) सातशें श्लोकांचा ग्रंथ - भगवद्नीता . ती गीता हे सप्तशती । मंत्र प्रतिपाद्या भगवती । ( ज्ञा . १८ - १६ - ६६ )

( आ ) मार्कंडेय पुराणांतर्गत देवीस्तुति . यांत सातशें मंत्र आहेत . आश्चिनमासांतील देवीनवरात्रांत याचें पठण केलें जातें ; ( इ ) राजा हाल यानें रचिलेला ग्रंथ , यांत सातशें गाथा आहेत , म्हणून त्यास गाथासप्तशती म्हणतात . त्यावरून मध्ययुगीन भारतांतील सामाजिक स्थितीचें सम्यक् ‌‍ ज्ञान होंतें .

सप्त संपत्ति - १ जनसंपत्ति , २ धनसंपत्ति , ३ पुत्रसंपत्ति , ४ कलत्र्ससंपत्ति , ५ विद्यासंपत्ति , ६ इष्टफलसंपत्ति आणि ७ शरीरसंपत्ति .

सप्त सम्राट् ‌‍- १ भरत , २ श्रोणिक , २ चन्द्रगुप्त , ४ बिंदुसार , ५ अशोक , ६ खारवेल , आणि ७ कुमारपाल . हे सात जैनधमींय सम्राट् ‌ भारतांत होऊन गेले . ( सप्त सम्राट् ‌‍ )

सप्त सरस्वती - १ सुप्रभा - पुष्कर , २ कांचनाक्षी - नेमिश , ३ विशालागया , ४ मनोरमा - उत्तर कोसल , ५ ओघवती - कुरुक्षेत्र , ६ सुरेणु - हरिद्वार ७ विमलोदका - हिमालया . जज्ञ प्रसंगीं ऋषींनीं आमंत्रण केल्यावरून . सरस्वती या सांत रूपांनीं अवतीर्ण झाली , त्या या सात नद्या होत .

( म . भा . शल्य . अ . ३८ )

सप्त सागर - १ लवणाब्धि , २ इक्षुसागर , ३ सुरार्णव , ४ आज्यसगार , ५ दधिसमुद्र , ६ क्षीरसागर आणि ७ स्वादुजल ( शुद्धोदक ). असे सात सागर प्राचीनांनीं सांगितले आहेत . आजहि तांबडा समुद्र , काळा समुद्रा अशीं आश्चयोंत्पादक नांवें रूढ आहेतच .

’ सप्तमः स्यात्स्वादु जलं इत्येते सप्तसागरः ॥ ( विश्वब्रह्मपुराण १० - २२ )

’ क्षीरसमुद्र क्षारसमुद्र । दधि मधु घृत समुद्र ।

सहावा तो इक्षुसमुद्र । सुरासमुद्र सातवा ॥ ’ ( भा . रा . किष्किंधा १० - ९ )

सप्त सिंधु - १ स्वात , २ गोमती , ३ वितस्ता , ४ चंद्रभागा , ५ इरावती , ६ सरस्वती व ७ सिंधु . या सात नद्यांना सप्तसिंधु अशी संज्ञा आहे .

सप्त सोमयज्ञसंस्था - १ अग्निष्टोम , २ अत्यग्निष्टोम , ५ उक्थ्य , ४ षोडशी , ५ वाजपेय , ६ अतिरात्र आणि ७ आप्तोर्याम .

सप्त स्मर्तृगामी - १ दत्तत्रेय , २ नारद , ३ व्यास , ४ शुक्र , ५ मारुति , ६ कार्तवीर्य आणि ७ गोरक्ष . हे सात स्म्रर्तृगामी म्हणजे स्मरण करणाराकडे जाणारे म्हणून प्रसिद्ध आहेत .

सप्त स्नानें - १ मांत्र - मंत्रानें जलप्रोक्षण , २ भौम्र - मृत्तिका स्नान , ३ आग्नेय - भस्मधारण करण्यानें , ४ वायव्य - गोधूलीचा स्पर्श , ४ दिव्यवृष्टिजलानें ( पाऊस पडत असतां उन्हडि पडतें अशा वृष्टिजलांत ), ६ वारुणपाण्यांत बुडून आणि ७ मानस - परमेश्वरस्वरूपाचें ध्यान हें मानस स्नान होय .

मांत्रंज भौमं तथाग्नेयं बायव्यं दिव्यमेव च ।

वारुणं मानसं चैव सप्तस्नानं प्रकीर्तितम् ‌‍ ॥ ( योगसंहिता )

सप्त स्वर - १ षड्‌‍ज , २ ऋषम , ३ गांधार , ४ मध्यम , ५ पंचम , ६ धैवत व ७ निषाद . हे गायनशास्त्रांतील सात स्वर . यांचेच संक्षिप्त पर्याय - सा - रे - ग - म - प - ध - नी हे होत . अहोबल नांवाचा गीतशास्त्रज्ञ होऊन गेल . त्यानेंच श्रुति व स्वर निश्चित केले असें म्हणतात .

सप्त हविर्यज्ञसंस्था - १ अग्न्याधान , २ अग्निहोत्र , ३ दर्शपूर्णमास , ५ चेतकी , ६ अभया आणि ७ जीवंती , अशा हिरडयाच्या सात जाती आहेत ’ यस्य नास्ति गृहे माता तस्य माता हरीतकी । ’ इतकें हिरडयाचें महत्त्व मानलें आहे . इंद्रानें अमृत प्राशन केलें . तेव्हां त्या अमृताचा एक थेंब जमिनीवर पडला . त्यापासून सात प्रकारचे हिरडे उत्पन्न झाले अशी पौराणिक कथा आहे . ( भावप्रकाश )

सप्त क्षार - १ तिल , २ अपामार्ग , ३ करंज , ४ पालाश . ५ अर्क , ६ यव आणि ७ चिंचा .

सप्ताक्षरी मंत्र - ( अ ) " श्रीगणेशाय नमः " हा मंगलबाचक आहे . कोणत्याहि कार्यारंमीं गणेश देवतेस नमन करण्याची रूढी आहे .

( आ ) " ॐ नमो नारायण " ( प्रकाश सांप्रदाय ), ( इ ) " सर्व खल्विंद ब्रह्म " हा उपनिषत् ‌‍ प्रणीत महामंत्र ( छां , ३ - १४ - १ ) ( ई ) ॐ श्री विष्ण्वे नमः , ( ड )" ॐ श्री सूर्याय नमः ( ऊ ) " श्रीगुरुदेवदत्त ", ( ए ) " त्र्यंबकं यजामहे " हा एक महामृत्युंजय मंत्र आहे . ( ऋग्वेद . ७ - ५ ९ - १२ )

सप्त क्षेत्रें - १ कुरुक्षेत्र , २ हरिहरक्षेत्र ( सोनपूर ), ३ प्रभासक्षेत्र ( वेरावळ ), ४ रेणूकाक्षेत्र - मथुरेजवळ , ५ भृगुक्षेत्र - भडोच , ६ पुरुषोत्तमक्षेत्र व ७ सूकरक्षेत्र - सोरों . ( कल्याण तीर्थांक )

सात अंगें ( चिकित्सेचीं )- १ रोगी , २ दूत , ३ विद्य , ४ दीर्घायुष्य , ५ द्रव्य , ७ चांगला नोकर आणि ७ उत्तम औषध .

रोगी दूतो भिषग् ‌‍ दीर्घमायुर्द्रव्यं सुसेवकः ।

सदौष्रधं चिकित्साया इत्यङ्‌‌गानि बुधा जगुः ॥ ( नि . र . )

सात अंगें राज्याचीं - १ राजा ( राष्ट्रपती ), २ मंत्री , ३ प्रजा , ४ किल्ले ( दुर्गमस्थानें , ) ५ कोश , ६ सैन्य व ७ मित्र - मित्रराष्ट्रें . हीं प्राचीन सात अंगें आजहि थोडयाशा फरकानें आहेत .

सप्तप्रकृतयो हयेताः सप्तङ्‌‍गं राज्यमुच्यते । ( मनु . ९ - २९४ ) खेरीज राज्यांत दूतांचा सचार हें एक आवश्यक अंग आहे असें अथर्व - वेदांत सांगितलें आहे .

" अजिरः दूरः संचरातैःअ ॥ ( सर्थव , मंडल ३ )

सात अर्थ ज्ञानाचे ( गीतोक्त )- १ तत्त्वज्ञान , २ सांख्यज्ञान , ३ परोक्षज्ञान , ४ साधनज्ञान , ५ विवेकज्ञान , ६ लौकिकज्ञान आणि ७ शास्त्रज्ञान . ( तत्त्वचितामणि )

सात अनुष्ठानें ( देवीचीं )- १ नवरात्र विधान , २ नित्यचंडी विधान , ३ नवदुर्गानुष्ठान , ४ कालरात्रि , ५ नवचंडी , ६ शतचंडी आणि ७ सहस्त्रचंडी ( देवीमाहात्म्य अ . १५ )

सात अरण्यवासी प्राणी - १ सिंह , २ वाघ , ३ डुक्कर , ४ रेडे , ५ ह्त्ती , ६ रीस आणि ७ वानर . ( म . भा . भीष्म . ४ - १७ )

सात अवतार दुर्गा देवतेचे ( भविष्यकालीन )- १ विंध्याचल - वासिनी , २ रक्तदंतिका , ३ शताक्षी , ४ शाकबरी , ५ दुर्गा , ६ भीमा आणि ७ भ्रामरी . ( कल्याण शक्ति अंक )

सात अवयव विश्चाचे - १ शिर - द्युलोक , २ नेत्र - सूर्य , ३ प्राण - वायु , ४ मध्यस्त्थान - आकाश , ५ मूत्रस्थान - अन्न व पाणी , ६ व ७ दोन - चरण - पृथ्वी . आत्मा शरीर धारण करतो त्याप्रमाणें ईश्वर हें विश्व धारण करतो . अशी कल्पना करून ऋषींनीं हे विश्वाचे सात अवयव सांगितले आहेत . ( मांडूक्य )

सात अवस्था चिदाभासाच्या ( विदांतशात्र )- १ अज्ञान , २ आवरण , ३ विक्षेप , ४ परोक्षज्ञान , ५ अपरोक्षज्ञान , ६ शोकनाश व ७ आनंदावाप्ति ( विचार . सा . रह्स्य )

सात अस्तित्व तत्त्वें अथवा प्राचीन ऋषींनीं ऐकलेले महान् ‌‍ शब्द - १ सत् ‌‍ , २ चित् ‌‍, ३ आनंद , ४ विज्ञान , ५ मन , ६ प्राण आणि ७ अन्न ( जडद्रव्य ). या सात वस्तु एकाच सत्य वस्तूचीं विविध रूपें आहेत . ( दिव्यजीवन खंड . २ रा )

सात अक्षौहिणी सैन्याचे सात सेनापति ( पांडव पक्षीय )- १ द्रुपद , २ विराट , ३ धृष्टद्युम्न , ४ शिखण्डी , ५ सात्यकि , ६ चेकितान व ७ भीमसेन .

सात्यकिश्चेकितानश्च भीमसेनक्ष वीर्यवान् ‌‌ ।

एते सेनाप्रणेतारो वीराः सर्वे तनुत्यजः ॥ ( म . भा . उद्योग . १५ १ - ५ )

श्रीकृष्णाच्या मताप्रमाणें पांडवाकडील सरसेनापति पद धृष्टद्युम्नास देण्यांत आलें होतें .

सात आखाडे बैराग्यांचे - १ वस्त्रधारी , २ निरंजनी , ३ निर्वाणी , ४ निमोंदी , ५ दिगंबरी , ६ ताटंबरी आणि ७ खाकी ( ऐ . गोष्टी . भाग . ३ रा )

सात आचार तांत्रिकांचे - १ वेदाचार , २ वैष्णवाचार , ३ शैवाचार , ४ दक्षिणाचार , ५ वामाचार , ६ सिद्धान्ताचार व ७ कौलाचार . असे तंत्रशास्त्रांत सात प्रकारचे आचार मानले आहेत . ( नाथसंप्रदाय )

" सात आश्चर्यें " ( प्राचीन जगांतील )- ( अ ) १ इजिप्तमधील मनोरे , २ एफिसस येथील डियाना देवतेचें मंदिर , ३ बाबिलोन मधील भिंती ( उंची ३३५ फूट , जाडी ८५ फूट ) व इष्टिका लेख , ४ ऑलिंपिया येथील ज्युपिटरचा पुतळा ( ग्रीस ), ६ हॅलिकानेंस येथील कबर

( आशिया मायनर ), र्‍होडस येथील सूर्यदेवतेचा पुतळा आणि ७ अलेक्झांड्रिया बंदराच्या प्रवेशद्वारावरील दीपगृहः ( आ )

( मध्ययुगीन )- १ रोम येथील अँफी थिएटर , २ रोम येथील शववापिका , ३ चीनमधील मोठी मिंत ( लांबी २५०० मैल ), ४ इंग्लंडमधील पाषाणवलय , ५ पिसा येथील झुकता मनोरा , ६ ईजिप्तमधील पिरामिड अगर राजांचीं थडगीं आणि ७ कॉन्स्टँटिनोपल येथील सेंट सोफियाचें मंदिर हीं जगांतील सात आश्चर्यें होत ; ( इ ) ( अर्वाचीन )- १ बिनतारी संदेश यंत्र , २ दूरध्वनि यंत्र ( रेडिओ ), ३ टेलिव्हिजन व बोलपट , ४ विमान , ५ रेडियमचा शोध , ६ विच्छिन्न किरणद्वारा पृथक्करण आणि ७ ’ क्ष ’ किरण आणि अतिनील किरण यांचा शोध ; ( ई ) १ एम्पायर स्टेट बिल्डंग ( न्यूयॉर्क ), २ पनामा कालवा , ३ लंडनमधील तळघरें , ४ गोल्डन गेट ब्रिज

( सॅन्‌‍फॉन्सिस्को ), ५ अस्वान धरण ( ईजिप्त ), ६ वॉशिंग्टनचें स्मारक ७ सिंधु नदीवरील लॉइड बराज .

सात आश्चर्यें ( भारतांतील )- ( अ ) आग‍र्‍याचा ताजमहाल , २ वेरूळचीं लेणीं , ३ विजापुरचा गोलघुमुट , ४ कुतुबमिनार - दिल्ली ५ मीनाक्षी मंदिर - मदुरा , ६ श्रवणबेळगोळ ( म्हैसूर राज्य ) येथील गोमटेश्वारचा प्रचंड पुतळा उंची ७० फूट ( या पुतळ्यावर असलेल्या आद्य ज्ञाअ मराठी लेखांतील ’ श्री ’ ची उंची सुमारें दीड फूट आहे ) आणि ७ चितोडा येथील जयस्तंभ ( १२२ फूट उंची व ९ मजल्याचा ). इतका भव्य स्तंभ जगांत कोठेंहि नाहीं . ( वैदिक संस्कृतीचा विकास ). ब्राह्मणांनीं वेदग्रंथ मुखोद्नत करून वेदांचें रक्षण केलें हें आठवें आश्चर्य आहे ; ( आ ) १ अम्रृतसरचें सुवर्णमंदिर , २ म्हैसूरचें बृंदावन उद्यान , ३ काश्मीरमधील शालीमार बगीचा , ४ गिरसप्पा धबधबा ( म्हैसूर राज्य ), ५ अजिंठा लोणीं , ६ बावनगजा येथील ऋषभ - देवमूर्ति ( अखंड शिळेंत कोरलेली . उंची ८४ फूट , बडवानीहून ५ मैल - म्ध्यभारत ) व ७ भाकरानानगल धरण . ( पूर्व पंजाब ).

सात आसरा ( अप्सरा ) अथवा जलदेवता - १ मच्छी , २ कूर्मी , ३ कर्कटी , ५ दर्दुरी , ५ जतुपी , ६ सोमपा व ७ मकरी , ( प्रसाद )

सात आचार्य - बारा अळवारीच्या नंतरच्या कालांत ( दहावें शतक ) दक्षिण भारतांत सात आचार्य होऊन गेले तेः - १ शठकोपमुनि

( नम्माळवार ), २ नाथमुनि ३ पुंडरीकाक्षु , ४ राममिश्र , ५ यामुनाचार्य , ६ महापूर्ण व ७ रामानुजाचार्य . ( रहस्यत्रयसार )

N/A

References : N/A
Last Updated : April 20, 2015

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP